$type=ticker$snippet=hide$cate=0

रिक्षाचालकांनी केला अवयव दानाचा संकल्प ; प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी- प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फाउंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प...

अहमदनगर/प्रतिनिधी- प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फाउंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण, फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, लक्ष्मण बोरकर, अतुल वाघ, कैलास ढवळे, सचिन कोतकर, बब्बू सय्यद, दादा येणारे, बाबासाहेब चन्ने, बबलू शेख, नागेश बागल उपस्थित होते. अवयव दानातून इतरांचे जीवन समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा बोरुडे यांनी यावेळी व्यक्त केली. 



छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी अर्पण केले. रयतेची जुलमी राजवटीपासून सुटका करुन स्वराज्याची निर्मिती केली. अशा थोर राजांचा इतिहास आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याच प्रेरणेने फिनिक्स सोशल फाउंडेशन कार्य करत आहे, असे सांगून बोरुडे म्हणाले, मोफत नेत्र शिबिराच्या माध्यमातून लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेऊन या चळवळीत अनेकांना सहभागी करुन घेत आहोत. आपल्यानंतर आपल्या अवयवांचा इतरांना उपयोग होऊन त्यांचे जीवन समृद्ध होऊन कायम स्मरणात राहावे, असे हे कार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीदिनी सत्कार्य घडावे या हेतूने रिक्षा संघटनेने सामाजिक दायित्व जपून राबविलेला उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असाच आहे, असे ते म्हणाले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भैय्या पठाण म्हणाले, फिनिक्स फाउंडेशनचे सामाजिक कार्यातून समाजातील वंचित घटकांसाठी काम होत आहे. या कार्यात आपलाही छोटासा हातभार लागावा, या हेतूने रिक्षाचालकांनी अवयव दानाचा संकल्प करुन अर्ज भरुन दिलेले आहे. संघटनेच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम सहभागी होऊन अशा उपक्रमात सहभागी झालो आहोत, असे सांगितले.यावेळी संतोष बिचकुल, प्रशांत शिंदे, शेख सुलतान, शेख कलिम, शहारुख पठाण, जमिर पठाण, राजेंद्र बोरुडे उपस्थित होते. अमोल पतंगे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. शेवटी बाबासाहेब धिवर यांनी आभार मानले.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10902,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17561,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14884,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रिक्षाचालकांनी केला अवयव दानाचा संकल्प ; प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फाउंडेशनचा उपक्रम
रिक्षाचालकांनी केला अवयव दानाचा संकल्प ; प्रजा रिक्षा संघटना व फिनिक्स फाउंडेशनचा उपक्रम
https://1.bp.blogspot.com/-yuUIL6Q3Bmc/YGmEvQCvqsI/AAAAAAABpfc/0AphHmulnDYSQfJWbQIbWSr04PyrkCktQCLcBGAsYHQ/s320/Rikshaw%2BChalak.JPG
https://1.bp.blogspot.com/-yuUIL6Q3Bmc/YGmEvQCvqsI/AAAAAAABpfc/0AphHmulnDYSQfJWbQIbWSr04PyrkCktQCLcBGAsYHQ/s72-c/Rikshaw%2BChalak.JPG
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_4.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_4.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content