$type=ticker$snippet=hide$cate=0

शहर काँग्रेसने केला लॉकडाऊनला विरोध

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनला नगर शहर जिल्हा काँग्रेसने विरोध केला आहे. व्यापारी, फेरीवाले, प...

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनला नगर शहर जिल्हा काँग्रेसने विरोध केला आहे. व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, सलून व्यावसायिक यांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी त्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी काँग्रेसने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या कडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निवेदन दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की,  मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले, हातावर पोट असणारे, सलून व्यावसायिक यांचे कंबरडे मोडले. त्यातून सावरत असतानाच दुसर्‍या लॉकडाऊनला सामोरे जाण्याची दुर्दैवाने वेळ आली आहे. असे असले तरी कोरोना संदर्भातील आवश्यक ती खबरदारी घेत या सर्व घटकांना आर्थिक संघटनातून वाचविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापार्‍यांना, दुकानदारांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यात करण्यात आली असून, आम्ही व्यापार्‍यांसमवेत आहोत. व्यापारी असोसिएशनशी देखील आम्ही चर्चा केली आहे. काँग्रेस पक्षाचा व्यापारी वर्गाला संपूर्ण पाठिंबा आहे, असे काळे यांनी सांगितले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला उपस्थित होते. अनेक व्यवसायिक,व्यापारी, फेरीवाले, पथारीवाले,  सलून व्यवसायिक आदींनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधला आहे. मागील लॉकडाऊननंतर अनेकांचे बँकांचे कर्जांचे हप्ते थकलेले आहेत. किरकोळ व्यापार्‍यांनी घाऊक व्यापार्‍यांकडून माल उचललेला आहे. तर घाऊक व्यापार्‍यांनी मोठ्या कंपन्यांकडून माल उचललेला आहे. या खरेदीची देणी या व्यापार्‍यांची बाकी आहेत. बाजारात माल विकलाच गेला नाही तर ही देणी कशी फेडायची असा प्रश्‍न व्यापार्‍यांसमोर उभा असल्याचे यात म्हटले आहे.

काँग्रेसने सुचवले पर्याय

व्यापार्‍यांना त्यांची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. -बाजारपेठेतील तसेच ज्या-ज्या ठिकाणी व्यापारी संकुल, दुकाने आहेत अशा ठिकाणी सम-विषम प्रणालीचा उपयोग करत दुकानांच्या रांगेतील एक आड एक दुकाने सम व विषम तारखांना किमान सहा ते सात तासांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात यावी. अशाच पद्धतीने फेरीवाले, हातगाडीवाले, पथारीवाले यांचे देखील नियोजन करण्यात यावे.

-व्यापार्‍यांना तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कामगारांच्या वयोगटाचा निकष शिथिल करत सरसकट लसीकरण करण्यात यावे. जिल्हाधिकार्‍यांनी बँका, पतसंस्था तसेच फायनान्स कंपन्या यांना लेखी पत्राद्वारे आदेश काढीत पुढील किमान तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली न करण्याबाबतच्या सक्त सूचना द्याव्यात. सलून व्यावसायिकांचे पोट हातावर आहे. त्यामुळे सलून व्यावसायिकांना ठराविक कालावधीनंतर कोरोना चाचणी करून दुकानातील कारागीर निगेटिव्ह असल्याचा अहवाल दुकानात दर्शनी भागात चिकटवण्याचा सूचना द्यावी व दुकानात असणार्‍या क्षमतेपेक्षा 50 टक्के क्षमतेने दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शहर काँग्रेसने केला लॉकडाऊनला विरोध
शहर काँग्रेसने केला लॉकडाऊनला विरोध
https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/images/story/202104/lockdown-pti_1200x768.jpeg?0nmrWen4fvpx44kq7VKyIstBVWUGbx08&size=770:433
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_478.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_478.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content