$type=ticker$snippet=hide$cate=0

मुख्यमंत्र्यांमुळे नगरला मिळाला ऑक्सिजन

 अहमदनगर/प्रतिनिधी- नगरला येणारे ऑक्सिजनचे टँकर मध्येच रस्त्यात अडवले गेल्याने नगरला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता कमी होती. पण प्रत्यक्ष मुख्यमं...

 अहमदनगर/प्रतिनिधी- नगरला येणारे ऑक्सिजनचे टँकर मध्येच रस्त्यात अडवले गेल्याने नगरला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता कमी होती. पण प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच यात लक्ष घातल्याने व नगरचे ऑक्सिजन टँकर तातडीने नगरला रवाना करण्याच्या सूचना दिल्याने अखेर पोलिस बंदोबस्तात मंगळवारी सायंकाळी दोन टँकर नगरला सुख़रूप पोहोचले.


मंगळवारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली होती. मात्र, ऑक्सिजन जर संपला तर करायचे काय हा पेच निर्माण झाला होता. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रात्रीतून फोन केल्यानंतर नगर शहरासाठी दोन टँकर उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना त्याचा दिलासा मिळाला. त्यानंतर खासदार डॉ. विखे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले.

गेल्या आठवडाभरापासून नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक तेवढा औषधाचा साठा व ऑक्सिजन साठा उपलब्ध होता. नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा अचानकपणे कमी झाला व सर्व रुग्णालये हतबल झाली. आयएमए संघटना व विविध डॉक्टरांनी एकत्रितपणे येऊन  जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची सर्व परिस्थिति सांगितली व प्रशासनानेसुद्धा ऑक्सिजन कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे डॉ. भोसले यांनी त्यांना सांगितले. मंगळवारी केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा नगर जिल्ह्यामध्ये होता. ज्या रुग्णालयात ऑक्सिजन संपले होते, त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. वरिष्ठ पातळीवरून ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी या उद्देशाने प्रशासनासह लोकप्रतिनिधीही राज्य सरकारच्या संपर्कामध्ये होते.


उद्योजकही आले पुढे

नगर जिल्ह्यात साधारणतः 60 ते 70 टन ऑक्सिजन सध्या लागत आहे. पण, अवघा दहा ते पंधरा टन साठा शिल्लक राहिल्यामुळे पेच निर्माण झाला होता. जे रुग्ण उपचार घेत होते, त्यांना दुसरीकडे हलवण्यासाठी धावपळ सुरू होती. अनेक नातेवाईकांनी जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे तक्रारी करून त्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी भोसले यांनी स्वतः संबंधित रुग्णालयांमध्ये थेट संपर्क करून परिस्थिती नेमकी कशी आहे याची विचारणा केली व ऑक्सिजन जर संपलेला असेल तर तुम्हाला उपलब्ध करून देतो, असे आश्‍वासनही दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयातून काही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवला गेला. विशेष म्हणजे अनेक उद्योजक सुद्धा पुढे आले होते. नगर जिल्ह्यातील काही उद्योजकांनी ऑक्सिजनच्या दहा ते पंधरा टाक्या त्वरित रुग्णालयांना पुरवल्या होत्या त्यामुळे अनेकांना तात्काळ उपचार मिळू शकले.

नगर शहरातील कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे अखेरीला मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संपर्क करून त्यांना नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याविषयी माहिती  दिली व तात्काळ ऑक्सिजनची व्यवस्था करा, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगर जिल्ह्यासाठी पुणे जिल्ह्यातून दोन टँकर पाठवले. पोलीस बंदोबस्तामध्ये हे टँकर नगर जिल्ह्यामध्ये दाखल झाले व तात्काळ हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा त्यामधून मिळाला व रुग्णालयांचे काम सुद्धा रात्रीतून सुरळीत सुरू झाले.



बागवान यांच्या कौशल्याने बंद टँकर अखेर सुरू झाला

 शहरात ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येत असताना मंगळवारी मध्यरात्री अनेक अडथळ्यांची शर्यत पार करुन पुणे येथून आलेला ऑक्सिजनचा टँकर दिल्लीगेट रोड येथील हुतात्मा स्मारकासमोर बंद पडल्याने अनेकांची त्रेधा उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने बंद पडलेला ऑक्सिजनचा टँकर दुरुस्त करुन जिल्हा रुग्णालय व एमआयडीसी येथील ऑक्सिजन प्लान्टला रवाना करण्यात आला. टँकर बंद पडल्याचे माहिती मिळताच रात्री 2 वाजता राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व माजी नगरसेवक विपुल शेटीया घटनास्थळी आले. तर तोफखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मेढे व त्यांचे सहकारी देखील मदतीला धावून आले. यावेळी शोएब शेख, जुनेद शेख, इमरान शेख मदतीला होते. जहागीरदार यांनी टँकरला धक्का देऊन घेऊन जाण्यासाठी मध्यरात्री जेसीबी उपलब्ध केला. मात्र, ऑक्सिजन टँकरचे वजन 20 टनापेक्षा अधिक असल्याने वाहन चालू करण्याशिवाय पर्याय उरला नाही. प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यांंना फोन लावला असता कोणीही उचलला नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी या प्रसंगाची माहिती आमदार संग्राम जगताप यांना फोनवर दिली. त्यांनी तातडीने हालचाल करुन टँकर सुरु करण्यासाठी सूचना केल्या. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व पोलिसांनी सर्जेपुरा येथील अ‍ॅटोमोबाईलचे दुकानचालक व फिटर असलेले मुनाफ बागवान यांच्याशी संपर्क करून मशीन बेल्ट उपलब्ध केला. बागवान यांनी ऑक्सिजनचा बंद पडलेला टँकर दुरुस्त केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. नंतर ऑक्सिजनचा टँकर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेथे अर्धा टँकर रिकामा करुन उर्वरीत अर्धा टँकर एमआयडीसी ऑक्सिजनच्या प्लँटमध्ये पाठविण्यात आला. शहरातील हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपत असताना शेवटच्या क्षणाला युवक व पोलिसांच्या प्रयत्नाने संजीवनीरुपी ऑक्सिजन मिळाल्याने अनेक कोरोना रुग्णांचे जीव वाचले. तर शहरात ऑक्सिजन अभावी मोठी जीवीत हानी होण्याचे टळले.


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra satara,17,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11221,औरंगाबाद,382,क्रीडा,681,दखल,776,देश,4662,नगर,1,नाशिक,836,पुणे,947,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17976,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,7,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,124,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15383,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4336,विदेश,667,संपादकी,2,संपादकीय,1700,सातारा,3225,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुख्यमंत्र्यांमुळे नगरला मिळाला ऑक्सिजन
मुख्यमंत्र्यांमुळे नगरला मिळाला ऑक्सिजन
https://1.bp.blogspot.com/-rcLrRVKi_Uo/YIA28VOy2VI/AAAAAAABp1I/qg4tD0mY5rskgP5R6jzm5ZxZ0DcO-uoGwCLcBGAsYHQ/s320/Nagar%2B22.jpeg
https://1.bp.blogspot.com/-rcLrRVKi_Uo/YIA28VOy2VI/AAAAAAABp1I/qg4tD0mY5rskgP5R6jzm5ZxZ0DcO-uoGwCLcBGAsYHQ/s72-c/Nagar%2B22.jpeg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_699.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_699.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content