सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 दि. 11 एप्रिल 2021 रोजी सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड...
सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 दि. 11 एप्रिल 2021 रोजी सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड, वाई तालुक्यामधील महाविद्यालये व विद्यालयांमध्ये 39 उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली.
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 घेण्यात येणार्या केंद्रांची (शाळा/महाविद्यालयांची नावे) नावे पुढीलप्रमाणे :- सातारा : अभयसिंह राजे भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेंद्रे, आण्णासाहेब कल्याणी हायस्कूल सदरबझार, लालबहादूर शास्त्री कॉलेज, कन्या शाळा भवानी पेठ, महाराजा सयाजीराव विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज कर्मवीर समाधी परिसर, न्यू इंग्लिश स्कूल सोमवार पेठ (भाग-अ), न्यू इंग्लिश स्कूल सोमवार पेठ (भाग-ब), यशोदा टेकनिकल कॅम्पस फॅक्लटी ऑफ इंजिनिअरींग राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जवळ वाढे फाटा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सदरबझार कॅम्प (भाग-अ), यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सदरबझार कॅम्प (भाग-ब), पोदार इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नं 43 प्लॉट नं. 1 व 2 पंडीत पार्क तामजाईनगर करंजे पेठ, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पानमळेवाडी, पो. वर्ये, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेकनिक पानमळेवाडी, पो. वर्ये, धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज सदरबझार, छत्रपती शाहु अॅकॅडमी अॅण्ड ज्युनिअर कॉलेज 19/20 अ, विसावा नाका, भारत विद्यामंदिर संभाजीनगर कोडोली एमआयडीसी, भवानी विद्यामंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेज 17 मल्हार पेठ, कला व वाणिज्य महाविद्यालय 117 अ/1,2,3 कोटेश्वर मैदानसमोर शुक्रवार पेठ, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आरटीओ ऑफिसजवळ सदरबझार, श्रीपतराव पाटील हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज करंजे पेठ, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, छत्रपती शिवाजी कॉलेज सदरबझार, सातारा, भवानी विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज, सातारा. कोरेगाव : दि मॉडर्न इंग्लिश स्कूल, डी. पी. भोसले कॉलेज.
कराड : शासकीय तंत्रनिकेतन विद्यानगर, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज विद्यानगर (भाग-अ), सदगुरु गाडगे महाराज कॉलेज विद्यानगर (भाग-ब), सेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला 483 मंगळवार पेठ, टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्लॉट नं. 222 मंगळवार पेठ, यशवंत हायस्कूल, विठामाता विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज 303 बुधवार पेठ, श्री. शिवाजी विद्यालय 313, बुधवार पेठ, सरस्वती विद्यालय, एस. एम. एस. इंगिल्श मिडीयम स्कूल, कराड. वाईमध्ये कन्या शाळा, महर्षि कर्वे रोड, मधली आळी, द्रविड हायस्कूल सोनगिरवाडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, ब्राम्हणशाही, किसन वीर महाविद्यालय, वाई (भाग-अ)/ (भाग-ब).
या परीक्षा केंदाच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात परिक्षार्थी परिक्षेसाठी नेमलेले अधिकारी / कर्मचारी सुरक्षा अधिकारी / कर्मचार्यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई आहे. तसेच दोन किंवा पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच शाळा / महाविद्यालये परिसरातील सार्वजनिक टेलिफोन / एसटीडी बुथ/आय. एस. डी बुथ / फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडीओ, कॅलक्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंदाच्या 100 मीटर पर्यर्ंत वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे.