$type=ticker$snippet=hide$cate=0

भारतीय जैन संघटनेने सुरू केल्या पुन्हा कोरोना चाचण्या

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील वर्षी कोरोना काळात शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर कोरोना चाचण्याचा आलेला ताण कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने मोफत कोर...

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील वर्षी कोरोना काळात शासकीय वैद्यकीय यंत्रणेवर कोरोना चाचण्याचा आलेला ताण कमी करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने मोफत कोरोना चाचणी उपक्रम राबवला होता. आता पुन्हा त्यांनी कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहून हा उपक्रम पुन्हा हाती घेतला आहे. बीजेएस व फोर्स मोटर्सद्वारे नगरमध्ये पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर अभियान सुरू करण्यात आले असून, यात मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था केली गेली आहे. या उपक्रमाचे उदघाटन करताना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग महत्वाच्या असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्पष्ट केले. 


    राज्यासह नगरमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग व बाधित रुग्णांचे विलगीकरण आवश्यक आहे. भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महापालिकेने करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर अभियान सुरू केले आहे. यात महापालिकेच्या केंद्रांवर मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमातून रुग्णांचे निदान लवकर होऊन करोना लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महापौर वाकळे यांनी केले.


बीजेएस व फोर्स मोटर्सने नगर शहरात पुन्हा एकदा मिशन झिरो अहमदनगर मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत बुरुडगाव रोडवरील जिजामाता दवाखान्यात मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, नगरसेविका मीनाताई चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, अजय ढोणे, मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिजामाता आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ.आएशा शेख, सिस्टर खिलारी, योगेश तांबे, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, बीजेएसचे शहराध्यक्ष प्रशांत गांधी, गिरीश अग्रवाल, महेश गुंदेचा, महेश गुगळे, संतोष कासवा, नितीन शिंगवी, रोशन चोरडिया, खिलारी सिस्टर, बीजेएसचे टेक्निशियन प्रतिक्षा जगदाळे, किर्ती नवले, प्रतिक जगदाळे, अशोक वनवे, ज्ञानेश्‍वर वायभासे, अक्षता शर्मा, अक्षय कानडे, बाबासाहेब गिते, अतुल वैरागर आदी उपस्थित होते. मर्चंट बँकेचे संचालक व माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. तर मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी या टेस्ट सुरु करण्यासाठी बीजेएसकडे पाठपुरावा केला.


यावेळी सभापती अविनाश घुले म्हणाले की, मागील वर्षी करोना महामारीचे आगमन झाल्यापासून बीजेएसने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुरुवातीच्या काळात मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन सुरू करून शहरात नगरसेवकांच्या सहकार्याने प्रत्येक प्रभागात जाऊन आरोग्य तपासणी केली व संशयित रुग्णांच्या विलगीकरणास मदत केली. याशिवाय लॉकडाऊन काळात विविध हॉस्पिटलला ऑक्सिजन युनिट देणे, मोफत रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था, गरजूंच्या जेवणाची व्यवस्था, करोना योद्ध्यांना मास्क, सॅनिटाजरचा पुरवठा अशी अनेक कामे बीजेएसने केली. आदेश चंगेडिया व त्यांची टीम झपाटून काम करीत असल्याचे पाहायला मिळाले. नगरसेविका मीनाताई चोपडा म्हणाल्या की, भारतीय जैन संघटनेने करोना काळात अतिशय मोलाचे योगदान दिले आहे. जिथे जिथे मदतीची आवश्यकता असेल, तिथे बीजेएसची टिम धावून जाते. हे काम आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.


आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, मागील वर्षी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने नगरमध्ये मिशन झिरो अहमदनगरची सुरुवात करण्यात आली होती. आता नव्याने हे मिशन हाती घेण्यात आले आहे. सध्या टेस्टिंगचे प्रमाण वाढले असले तरी रिपोर्ट येण्यास तीन-चार दिवस लागतात. मधल्या काळात संशयित रुग्ण सगळ्यांमध्ये मिसळत असल्याने संसर्ग वेगाने वाढत आहे. आरटीपीसीआर टेस्ट महत्वाची असली तरी रॅपिड अँटीजेन टेस्टने लवकर निदान होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णाचे लवकर विलगीकरण करणे शक्य होते. लक्षणे असूनही रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधिताला आरटीपीसीआर टेस्टसाठी पाठवले जाते. यासाठी मनपाने स्वॅब संकलन केंद्रही सुरू केले आहे. बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये मनपाच्या जिजामाता दवाखान्यासह केडगावला संदीप हॉटेलसमोरील मनपाचे आरोग्य केंद्र येथे रॅपिड अँटीजेन टेस्टची व्यवस्था असून लवकरच सावेडी व नागापूर येथेही असे केंद्र सुरू करत आहोत, असे त्यांनी सांगितले. 


शहराध्यक्ष प्रशांत गांधी यांनी सांगितले की, येत्या काळात या टेस्टसाठी मोठ्या प्रमाणात किट उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास किंवा करोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास न घाबरता या केंद्रावर येऊन टेस्ट करून घ्यावी. ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीनुसार आपण मिशन झिरो अहमदनगर अभियान यशस्वी करू असा विश्‍वास गांधी यांनी व्यक्त केला.

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10891,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,748,देश,4610,नाशिक,828,पुणे,860,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17548,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14865,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4197,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1641,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भारतीय जैन संघटनेने सुरू केल्या पुन्हा कोरोना चाचण्या
भारतीय जैन संघटनेने सुरू केल्या पुन्हा कोरोना चाचण्या
https://1.bp.blogspot.com/-fFkErwX4YlA/YGmFlhYHrWI/AAAAAAABpfk/_Q1g_BihyvcC-4wnzPuYl7uKgGMhMuwXQCLcBGAsYHQ/s320/Jain%2BONG.jpg
https://1.bp.blogspot.com/-fFkErwX4YlA/YGmFlhYHrWI/AAAAAAABpfk/_Q1g_BihyvcC-4wnzPuYl7uKgGMhMuwXQCLcBGAsYHQ/s72-c/Jain%2BONG.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_98.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_98.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content