$type=ticker$snippet=hide$cate=0

संपदा संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा ; वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या आदेशाने संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याच्या आदे...

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या आदेशाने संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याच्या आदेशात उच्च न्यायालयात दिले गेलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे आता संपदा पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता नगर तालुक्याचे तहसीलदार यांना संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिलाव प्रक्रिया पार पाडून ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्या लागणार आहे, असे येथील ज्येष्ठ वकील अ‍ॅड.सुरेश लगड यांनी म्हटले आहे. 


संपदा पतसंस्थेत ठेवी अडकलेल्या ठेवीदारांचे वकील म्हणून अ‍ॅड. सुरेश लगड काम पाहतात. ठेवीदारांचे अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या लिलाव प्रक्रियेबद्दल माहिती देताना ते म्हणाले, संपदाचे माजी पदाधिकारी ज्ञानदेव सबाजी बाफारे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अहमदनगर येथील संपदा नागरी सहकारी पतसंस्थेकडे जवळपास 32 कोटींच्या ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवी व्याजासह मिळाव्यात म्हणून संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार संध्या चंद्रकांत खुळे, चंद्रकांत रामकृष्ण खुळे, धनंजय मधुकर पांडकर, अमरसिंग गोपालसिंग परदेशी, शेख करीम गनी, अशोक विठ्ठछल सोनार, मंगल अशोक सोनार, माणिक जगन्नाथ कळसकर आदींनी अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन ज्ञानदेव वाफारेंसह इतर पदाधिकार्‍यांविरुध्द ठेवी मिळणेबाबत दाद मागितलेली होती. त्यात जिल्हा ग्राहक तक्राकर निवारण न्यायमंचाने सर्व तत्कालीन संचालकांना दोषी धरून व्याजासह ठेवी देण्याचा आदेश केलेला होता. या आदेेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगर तहसीलदार यांच्याकडे आर.आर.सी. वसुलीसाठी (संपत्तीचा लिलाव करण्यासाठी) हे प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने पाठवलेले होते. त्यानुसार नगर तहसीलदार यांनी संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन संचालकांच्या नगर तालुक्यातील स्थावर मालमत्ता जप्त करून लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या संपत्तीची विक्री करण्याचा निर्णय नगर तहसीलदार यांनी घेऊन पुढील कारवाई सुरू केली. लिलाव प्रक्रिया सुरू करून लिलावधारकाकडून स्थावर मालमत्ता विक्रीच्या 25 टक्के रकमा भरून घेतल्या. पण ही बाब मान्य नसल्याने ज्ञानदेव वाफारे व इतर संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यात उभय बाजूचा युक्तीवाद ऐकुन घेऊन औरंगाबाद खंडपीठाने ज्ञानदेव वाफारे व इतरांंचे अपिल नुकनेच फेटाळलेले आहे, अशी माहिती अ‍ॅड.सुरेश लगड यांनी दिली.



चौकट

...तर, त्यांच्यावरही कारवाई

आता उच्च न्यायालयाच्या या आदेशाचे प्रालन करणे जिल्हाधिकारी व नगर तहसीलदार यांना बंधनकारक झाले आहे. जर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाहीतर महसूल अधिकार्‍यांवर देखील न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता नगरच्या तहसीलदारांना संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांच्या जप्त मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पार पाडून ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्या लागणार आहे, असेही अ‍ॅड. लगड यांनी सांगितले.




Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17476,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14785,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4161,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1635,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: संपदा संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा ; वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
संपदा संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा ; वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
https://gumlet.assettype.com/deshdoot/2020-07/592d7134-0262-4c53-b131-c3a5bc127349/92402961_221043695783053_8937289320444723200_n.jpg?w=1200&h=750&auto=format%2Ccompress&fit=max
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_99.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/04/blog-post_99.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content