$type=ticker$snippet=hide$cate=0

मृत्यू दाखला हवाय...द्या रोख 600 रुपये ; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा नगरमध्ये आणखी एक प्रकार

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनामुळे मृत झालेल्यांचे व त्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याचे दुःख सहन करणारांची आर्थिक लूटमार थांबायचे नाव घेत नाही....


अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोनामुळे मृत झालेल्यांचे व त्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याचे दुःख सहन करणारांची आर्थिक लूटमार थांबायचे नाव घेत नाही. मृत झालेल्यांच्या नावावरील बँक खाती, कर्ज पॉलिसी, विमा भरपाई, गॅस नोंदणी वा अन्य कामांसाठी आवश्यक असलेला मृत्यू दाखला मिळण्यासाठी नगरमध्ये चक्क 600 रुपये रोकडा मोजावे लागत आहेत. मनपाच्या ज्या सेतू कार्यालयाद्वारे डिजीटल मृत्यू दाखले दिले जातात, ते कार्यालय कोविड निर्बंधांमुळे बंद आहे. त्यामुळे तेथून मृत्यूदाखला मिळणे दुरापास्त आहे. पण गरजवंतांनी पैसे मोजले की, काही वेळातच दाखला मिळतो. मनपा यंत्रणेच्या सहभागाशिवाय हे होणे अशक्य असल्याने दोषींवर कारवाई करणार का व ही लूटमार रोखणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 


कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या जिल्ह्यातील वा पर जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्यावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होतात. या मृत्यूंची माहिती संबंधित रुग्ण, ज्या रुग्णालयात उपचार घेत होता, तेथून मनपाला कळवली जाते व दुसरीकडे अमरधाममधूनही अंत्यसंस्कार झालेल्यांची माहिती मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागाला दिली जाते. या दोन्ही माहितींची पडताळणी होऊन या विभागाद्वारे मृत्यूदाखले ज्यांनी मागणी केली, त्यांना डिजीटल स्वरुपात नाममात्र शुल्क आकारून दिले जातात. डिजीटल असल्याने यावर कोणाची सही नसते तर फक्त मनपाचा शिक्का असतो. या पार्श्‍वभूमीवर मागील 8 एप्रिलपासून मनपाचे सेतु कार्यालय व जन्म-मृत्यू विभाग बंद आहेत. त्यामुळे मृत्यू दाखल्यांचे वितरण अधिकृतपणे बंद आहे. पण अनधिकृतपणे गरजवंतांना लुबाडून असे दाखले दिले जातात. मनपाच्या सेतू कार्यालयामागील बोळात व नगर-कल्याण रस्त्यावर हा गोरखधंदा सुरू आहे. मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते. पण मनपात व मनपाच्या बाहेर मनपाच्या नावाने घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची माहिती सर्वांना असते. शिवाय, असे बाहेर घडणारे प्रकार लपणारे नसतात, त्यांची कोठे ना कोठे वाच्यता होतेच. त्यामुळे कोणाला काही माहीत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे व त्यामुळेच मनपातील काही उद्योगी मंडळींनी हा उद्योग सुरू केला तर नाही ना, असा संशयही बळावू लागला आहे.

नातेवाईकांची नवी लूटमार

कोरोना रुग्णांसाठी औषध व रेमडेसिविर इंजेक्शनसह ऑक्सिजनसाठी त्यांचे नातेवाईक भगीरथ प्रयत्न करतात, परंतु या कष्टदायक प्रयत्नांना पैशांची फोरणी द्यावी लागते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक कफल्लक होण्याच्या वाटेवर आहेत. औषधे, हॉस्पिटलचे बिल, रेमडेसिविर यासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असतानाच आता मनपा प्रशासनातील काहीजणांकडून रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना टोपी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेतून मिळणारा मृत्यूचा दाखला हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. परंतु हा मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हॉस्पिटल अथवा घरी मृत झालेल्यांची नोंदणी महापालिका कार्यालयात होते व नाममात्र शुल्क घेऊन नागरिकांना मृत्यू दाखला देण्यात येतो. परंतु कोरोनाच्या लाटेमध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घेणार्‍यांची संख्या कमी नसल्याने म्हणूनच की काय मृत्यूचा दाखला काढण्यासाठीही नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागते. मृत्यू दाखल्यासाछठी मोजावे लागतात सहाशे रुपये.

दीड महिन्यांपासून बंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कार्यालयांतून कर्मचार्‍यांची पंधरा टक्के उपस्थिती ठेवून कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश आहे, परंतु महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळील सेतू कार्यालय आठ एप्रिलपासून बंद आहे. त्यामुळे या कार्यालयातून मिळणारे सर्व प्रकारचे दाखले देणेही बंद आहे. कोरोनाने मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना आधीच मोठी आर्थिक झळ बसलेली असताना आता मृत्यूचे दाखले मिळण्यासाठीही मोठी रक्कम देण्याची वेळ आली आहे. सेतू कार्यालय बंद असल्याने मनपा कार्यालयातून दाखले देणे बंद असल्याचा गैरफायदा घेऊन काही संधीसाधूंनी मनपा कार्यालयासमोरच दाखला देण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. यामध्ये दाखला काढून देण्यास 600 रुपयांची मागणी केली जाते. नव्हे तर 600 रुपये घेतलेच जातात. त्यामुळे गरज असलेले नागरिक नाईलाजाने त्यास बळी पडतात. असे असताना मनपा प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. महत्त्वाच्या कामाला लागत असलेल्या या दाखल्यासाठी नागरिकांचे शोषणच केले जाते.

दोन ठिकाणी मिळतात दाखले?

सेतू कार्यालय बंद असल्याचा गैरफायदा घेत काहीजणांनी मनपा इमारतीच्या बाहेर आपली पथारी टाकली असून, गरजवंत नागरिक हेरला जातो व त्याकडून कोरा फॉर्म भरून घेऊन दाखल्या पोटी सहाशे रुपयाची रक्कम घेतली जाते. मनपाचे कोरे फॉर्मही त्यांच्याकडे कसे उपलब्ध होतात, हाही प्रश्‍नच आहे. त्यामुळे अशा संधीसाधूंवर मनपाने कारवाई करावी, अशी नागरिकातून मागणी होत आहे. एका दाखल्यासाठी कार्यालयात वारंवार खेटे घालून नागरिक जेरीस आले आहे. अशा वेळेस साहजिकच त्यांची पावले कमी वेळेत झटपट काम होण्यासाठी या गैरमार्गाचा अवलंब करण्याकडे वळतात व त्यांची लूट होते, याबाबत अधिक चौकशी केली असता नगर-कल्याण रोडवर असलेल्या एका इमारतीमध्येदेखील मृत्यू दाखला मिळण्याची सुविधा असल्याची माहिती मिळाली. मृत्यू दाखला मिळण्याची ही अवैधरित्या सुविधा सुरू करणार्‍यांच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे, याचादेखील आता शोध घेऊन त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गाचे संकट

मनपा अधिकारी-पदाधिकार्‍यांकडे चौकशी केली असता, त्यांनी सेतू कार्यालय एक जूननंतर सुरु होणार असल्याचे सांगितले. परंतु प्रश्‍न असा उपस्थित होतो की, एक तारखेनंतर सेतू कार्यालय सुरू झाल्यास जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठी या कार्यालयावर प्रचंड गर्दी होऊन व झुंबड उडून कोरोना सोेशल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शासन आदेशाप्रमाणे पंधरा टक्के उपस्थितीवर कार्यालय सुरू होत असतील तर सेतू कार्यालय देखील आतापासूनच सुरू करण्यास हरकत नाही. जेणेकरून भविष्यात होणारी संभाव्य गर्दी व पुढील धोका टाळला जाईल. याबाबत मनपा प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन कार्यालय त्वरित सुरू करावे, अशीही मागणी होत आहे.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मृत्यू दाखला हवाय...द्या रोख 600 रुपये ; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा नगरमध्ये आणखी एक प्रकार
मृत्यू दाखला हवाय...द्या रोख 600 रुपये ; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा नगरमध्ये आणखी एक प्रकार
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQwH8-WGqTcZEAa8WnVZzlKBNNBzmVQWxRZHg&usqp=CAU
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/600.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/600.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content