$type=ticker$snippet=hide$cate=0

मनपाचे कोविड सेंटर होणार, पण महासभेच्या मान्यतेनंतर ; काँग्रेसकडून पाठपुरावा सुरू ठेवणार-काळे

  अहमदनगर /प्रतिनिधी- महापालिकेने नगर शहरात 1 हजार बेड सुविधांचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी शहर काँग्रेसने केली असली तरी ते सुरू होण्या...

 

अहमदनगर /प्रतिनिधी- महापालिकेने नगर शहरात 1 हजार बेड सुविधांचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी शहर काँग्रेसने केली असली तरी ते सुरू होण्यास अजून काही काळ जावा लागणार आहे. कारण, मनपाचे प्रशासन तसा प्रस्ताव तयार करणार असून, त्या प्रस्तावास मनपाच्या महासभेने मंजुरी दिल्यानंतर असे कोविड सेंटर प्रत्यक्षात येणार आहे. दरम्यान, महापालिकेद्वारे 1 हजार बेडचे कोविड सेंटर सुरू होण्यासाठी काँग्रेसचा पाठपुरावा सुरू राहील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. 


शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी नगर शहरामध्ये महापालिकेच्यावतीने जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाच्या जिल्हा आढावा बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशावरून बुधवारी जुन्या महापालिकेमध्ये आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, क्रीडा सचिव मच्छिंद्र साळुंखे उपस्थित होते.

प्रस्ताव करण्याची ग्वाही

काँग्रेसने जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटरची मागणी लावून धरली आहे. यासाठी काँग्रेसने तिसर्‍यांदा मनपा आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने 1000 ऑक्सीजन बेडची उभारणी करा असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये महापालिकेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये काँग्रेसने आक्रमकपणे शहरातील नागरिकांची बाजू मांडली. यावेळी आयुक्त गोरे यांनी या संदर्भामध्ये तातडीने बजेट तयार केले जाईल व ते महापालिकेच्या सभागृहामध्ये मान्यतेसाठी ठेवले जाईल व त्यास मान्यता घेऊन उभारणी केली जाईल, असे आश्‍वासन दिले. या बजेटला महापालिका सभागृहाने तात्काळ मान्यता द्यावी असा मुद्दा यावेळी काळे यांनी महापौर वाकळे यांच्या समोर मांडला. वाकळे यांनी यावेळी बोलताना, महापालिकेकडे मर्यादित यंत्रणा आहे व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये अडचणी आहेत, असा मुद्दा उपस्थित केला. काळे यांनी त्यावर बोलताना, आपण राजकीय जोडे बाजूला ठेवत एकत्रितपणे सर्व मिळून मार्ग काढू, असे महापौर यांना सांगितले. त्यानंतर महापौरांनी प्रशासनाकडून प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्यास मान्यता देऊ तसेच जागेसाठी मी देखील पाहणी करेल, असे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी काळे म्हणाले की, 1000 बेड एकाच वेळी, एकाच ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न महापालिकेने करावा. तो करत असताना जर काही तांत्रिक अडचणी समोर आल्या तर टप्प्याटप्प्याने बेडची संख्या वाढवत न्यावी. परंतु शहरातील नागरिकांना मनपाने तात्काळ दिलासा द्यावा, असे सुचवले.


त्यांच्या नकाराला उत्तर

या चर्चेमध्ये उपायुक्त यशवंत डांगे यांनी मात्र विविध अडचणी मांडत ना चा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यांच्या ना च्या पाढ्याला काळे यांनी आक्षेप घेतला व अधिकार्‍यांनी काम करावे. अडचणींवर मार्ग सांगावा. प्रश्‍नांना प्रश्‍न विचारून जबाबदारी झटकू नये व कामे रोखून धरू नये, असे सुनावले. काळे यांचा आक्रमकपणा पाहून डांगे यांनी माघार घेत, मी देखील या कामासाठी सकारात्मक असून आपण हे उभे करू, अशी भूमिका नंतर घेतली.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मनपाचे कोविड सेंटर होणार, पण महासभेच्या मान्यतेनंतर ; काँग्रेसकडून पाठपुरावा सुरू ठेवणार-काळे
मनपाचे कोविड सेंटर होणार, पण महासभेच्या मान्यतेनंतर ; काँग्रेसकडून पाठपुरावा सुरू ठेवणार-काळे
https://1.bp.blogspot.com/-wNg_zbA0gbQ/YJFQqr0m28I/AAAAAAABp_4/jWuXHSLW1WALtmEcrN5UXNzEuDtdoFh1gCLcBGAsYHQ/s320/Kiran%2Bkale.jpg
https://1.bp.blogspot.com/-wNg_zbA0gbQ/YJFQqr0m28I/AAAAAAABp_4/jWuXHSLW1WALtmEcrN5UXNzEuDtdoFh1gCLcBGAsYHQ/s72-c/Kiran%2Bkale.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_113.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_113.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content