$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबई पोलिसांकडून मानसिक छळ ; रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई /प्रतिनिधी : मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांन...


मुंबई /प्रतिनिधी : मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 


    मुंबई उच्च न्यायायालही त्यांनी याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांचे सायबर सेल महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरण आणि गोपनीय माहिती लिक झाल्याप्रकरणी चौकशी करत आहे. यासंदर्भात सायबर सेलने दोन वेळा आयपीएस अधिकारी आणि गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना दोन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी समन्स बजावले होते. याच समन्स विरोधात शुक्ला यांनी हैदराबाद उच्चल न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्ला यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांनी धाडलेले समन्स अवैध असल्याचे म्हटले आहे. शुक्ला यांनी न्यायालयाला या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांना मानसिक छळ न करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. शुक्ला यांचे म्हणणे आहे, की तपास अधिकारी एकापाठोपाठ एक समन्स पाठवून त्यांना त्रास देत आहेत. शुक्ला सध्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

या याचिकेत प्रतिवादी म्हणून सहा लोकांना सहभागी करण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि सायबर क्राईमचे सहायक पोलिस आयुक्त यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने गेल्या सोमवारी हैदराबादमध्ये शुक्ला यांनी समन्स जारी केले होते आणि बुधवारी 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत असताना शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल आणि फोन टॅपिंग प्रकरणाची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, शुक्ला यांनी सायबर पोलिसांना एक ई-मेल पाठवून कोरोना प्रादूर्भावामुळे चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर सायबर सेलने शुक्ला यांना 28 एप्रिल रोजी दुसरे समन्स पाठवत तीन मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शुक्ला यांना भीती आहे, की तपास यंत्रणा त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना अटक करू शकते. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,770,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1689,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबई पोलिसांकडून मानसिक छळ ; रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयात याचिका
मुंबई पोलिसांकडून मानसिक छळ ; रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयात याचिका
https://images.indianexpress.com/2021/04/Rashmi-Shukla-1-1.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_133.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_133.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content