$type=ticker$snippet=hide$cate=0

भाजपच्या खासदार, नेत्यांनाही ’नारदा’ भोवणार

  कोलकाताः नारदा स्टिंग प्रकरणामध्ये सीबीआय सध्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह चार नेत्यांवर खटला चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष...

 


कोलकाताः नारदा स्टिंग प्रकरणामध्ये सीबीआय सध्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह चार नेत्यांवर खटला चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबतची ाहिती दिली. दरम्यान, सीबीआयच्या या कारवाईविरोधात पश्‍चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून केंद्र व पश्‍चिम बंगाल सरकारमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.  


सीबीआयने सुवेंदू अधिकारी यांच्यासह सौगत रॉय, प्रसून बॅनर्जी आणि काकोली घोष दस्तीदार यांच्यावर खटला दाखल कऱण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली होती. ज्या वेळी हे स्टिंग ऑपरेशन झाले होते, तेव्हा हे चारही नेते तृणमूल काँग्रेसचे खासदार होते. दरम्यान, या प्रकरणात 2017 मध्ये भाजपमध्ये दाखल झालेल्या मुकुल रॉय यांचे नाव नाही, हेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोमवारी झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सौगत रॉय हे भाजपमध्ये दाखल झाले असल्याने त्यांना सोडले असा दावा केला होता, तर केंद्रातील भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीमधील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आमदार तापस रॉय यांनी केला होता.

दरम्यान, 2014 मध्ये हे स्टिंग ऑपरेशन करणारे नारद समाचार पोर्टलचे संपादक मॅथ्यू सॅम्युएल यांनीही अधिकारी यांच्याविरोधात कारवाई का होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी निष्पक्षपाती चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी बंगालमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना अशा प्रकारे सीबीआयने कारवाई करणे हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. नारदा स्टिंग ऑपरेशन खटल्यात अडकलेल्या तृणमूल काँग्रेससच्या नेत्यांना आज जामीन मिळू शकला नाही. आता या प्रकरणातील चारही आरोपींच्या जामीनावर उद्या पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसकडून थेट सीबीआयविरोधातच तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. तृणमूलकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर कोलकाता पोलिसांनी सीबीआयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना सीबीआयने केलेली अटक ही अवैध असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्री चंद्रिका भट्टाचार्य यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना करण्यात आलेली अटक अवैध होती. कारण या अटकेच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडून कुठल्याही प्रकारची परवानगी मागण्यात आली नव्हती. एका आमदाराच्या अटकेसाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असते. या तक्रारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशार्‍यावरून नेत्यांना अटक करणार्‍या सीबीआयच्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भाजपच्या खासदार, नेत्यांनाही ’नारदा’ भोवणार
भाजपच्या खासदार, नेत्यांनाही ’नारदा’ भोवणार
https://akm-img-a-in.tosshub.com/indiatoday/images/story/202105/narada.jpg?yeQJVak.q_QHMTG4GUUEm9q.PPSKqegP&size=770:433
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_148.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_148.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content