$type=ticker$snippet=hide$cate=0

कथित टूलकिट प्रकरणावरून भाजप तोंडघशी

जल्पकांच्या फौजा पदरी असल्या म्हणजे काहीही करता येतं, असा भाजपचा समज असतो. एकच गोष्ट वारंवार सांगितली, की लोकांना ती खरी वाटू लागते. भाजपचा ...

जल्पकांच्या फौजा पदरी असल्या म्हणजे काहीही करता येतं, असा भाजपचा समज असतो. एकच गोष्ट वारंवार सांगितली, की लोकांना ती खरी वाटू लागते. भाजपचा या गृहीतकावर विश्‍वास आहे. कथित टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण्यात आलं; परंतु ट्विटरनंच आता भाजपच्या संबित पात्रा यांचा संदेश कपोलकल्पित असल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षावर टीका करणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. 


    कोरोनाच्या हाताळणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अपयशाचं खापर केवळ काँग्रेस आणि विरोधकच नाही, तर जागतिक माध्यमंही सरकारच्या माथी फोडत आहे. त्यातून सुधारणा करण्याऐवजी आपल्यावरील टीका कशी चुकीची आहे, हे ठरविण्यातच सरकार आणि भाजपचा वेळ जातो आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकरण, कोरोनाची दुसरी लाट, लसीकरणातील गोंधळ आदींवरून सरकारवर वेगवेगळ्या स्तरावरून टीका होत आहे. मोदी सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेसनं टूलकिट बनविल्याचा आरोप भाजप करीत होता. काँग्रेसनंच या टूलकिटविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळं हे टूलकिट काँग्रेसचं असण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.  मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसनं बनवलेल्या कथित टूलकिट प्रकरणी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी टाकलेला संदेश हा दिशाभूल करणारा असून फेरफार करून हा संदेश तयार करण्यात आला आहे, असं आता ट्विटरनं म्हटलं आहे. ट्विटरनं या संदेशातील दृश्यचित्र, ध्वनी, छायाचित्रं यांचा समावेश ‘फेरफार’ या गटात केला असून तो कपोलकल्पित तसंच तथ्यहीन संदेश असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसनं गुरुवारी ट्विटरला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं, की भाजप अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची ट्विटर खाती निलंबित करण्यात यावीत. ते गैरमाहिती पसरवून समाजात अशांतता निर्माण करीत आहेत. विरोधी पक्षांनी म्हटलं आहे, की टूलकिट कागदपत्रं भाजपनं टाकली असून ती खोटी आहेत, त्यामुळं छत्तीसगड येथे त्याबाबत पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. काँग्रेसनं भाजप  व मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी टूलकिट केलं, असं भाजपचं म्हणणं असून त्यानंतर या कथित टूलकिटमधील आशयावर भाजप नेते संबित पात्रा व इतरांनी टीका करणारं ट्वीट संदेश टाकले होते. त्यावर ट्विटरनं म्हटलं आहे, की पात्रा यांनी केलेला ट्वीट संदेश कपोलकल्पित गटात टाकला जाणार आहे. ‘कोरोनाची साथ चालू असताना काँग्रेसनं तयार केलेल्या टूलकिटकडे बघा, त्यात त्यांनी गरजूंना मदत करण्याची तयारी दर्शवली आहे; पण प्रत्यक्षात काँग्रेसनं त्यांचे मित्र पत्रकार व इतरांच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान चालवल्यासारखंच आहे. काँग्रेसची ही विषयसूची तुम्ही वाचू शकता,’ असं संबित पात्रा यांनी या संदेशात म्हटलं होतं.

    काँग्रेसनं तयार केलेल्या कथित टूलकिटवर भाजपनं केलेल्या टिप्पणीवर आक्षेप घेण्याच्या ट्विटरच्या निर्णयास केंद्र सरकारनं अयोग्य ठरविलं आहे. केंद्र सरकारनं कोरोनाबाबतची कामगिरी खराब पद्धतीनं हाताळल्याबाबत काँग्रेसनं टूलकीट तयार केल्याच्या प्रकरणी भाजपनं ट्वीट संदेश टाकला होता. त्यावर ट्विटरनं आक्षेप घेत तो ‘तथ्य नसलेली बाब’ या गटात समाविष्ट केला होता. त्यावर सरकारनं म्हटलं आहे, की एखाद्या प्रकरणात चौकशी चालू असताना त्याबाबत ट्विटर त्यांचं मत लादू शकत नाही. त्यामुळं हा संदेश तथ्यहीन व कपोलकल्पित असल्याच्या वर्गवारीतून मागं घेण्यात यावा, असं ट्विटरला सांगण्यात आलं आहे. मुळात एखाद्या पक्षानं दुसर्‍या पक्षावर घेतलेल्या आक्षेपावर संबंधित पक्षानं तक्रार करायला हवी होती. सरकारनं त्यात पडण्याचं काहीच कारण नव्हतं; सरकार किती खालच्या पातळीवर गेलं आहे, हे यातून दिसतं. कुठल्याही आशयातील सत्यासत्यता चौकशीत निष्पन्न होईल, ते ट्विटरनं ठरवण्याचं कारण नाही. चौकशी प्रक्रियेत ट्विटरनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये, असंही सरकारनं बजावलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ट्विटरटच्या जागतिक चमूकडं याबाबत आक्षेप नोंदवला असून भाजपच्या ट्वीट संदेशाला तथ्यहीन गटात टाकण्याचं कारण नव्हतं असं म्हटलं आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचं टूलकीट हे मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठीच आहे असा टी्वट संदेश टाकला होता. त्यावर ट्विटरनं हा संदेश दृश्यफिती, प्रतिमा, ध्वनिफिती यासह तथ्यहीन असल्याचं सांगून तो कपोलकल्पित असल्याचं म्हटलं होतं. टूलकिट संदर्भात काही राजकीय नेत्यांनी ट्वीट संदेश पाठवलं असून त्यामुळे कोरोना साथीविरोधातील सरकारच्या प्रयत्नांना कमी लेखलं गेलं आहे. टूलकिट प्रकरणी कायदा अंमलबजावणी संस्थेकडं संबंधित व्यक्तींकडून तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची शहानिशा व  चौकशी सुरू आहे. स्थानिक चौकशी संस्था याची चौकशी करील. ट्विटरनं एखादा संदेश तथ्यहीन असल्याचा एकतर्फी निष्कर्ष काढणं चुकीचं, द्वेषमूलक व पूर्वग्रहदूषित असून चौकशीला वेगळाच रंग देण्यासारखं आहे. ट्विटरनं मर्यादा ओलांडून त्यांच्याकडून अपेक्षित नसलेली अनाठायी कृती केली आहे. ट्विटरनं या प्रकरणी चौकशी प्रलंबित असताना संबंधित ट्वीटची विशिष्ट वर्गवारी करणं हे त्या समाजमाध्यम मंचाच्या निष्पक्षतेला बाधा आणणारे आहे. संदेश मध्यस्थ म्हणूनही ट्विटरच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह लागणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. कोरोना संकट हाताळणीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये बराच काळ आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होत आहेत; पण काँग्रेस मोदी यांना बदनाम करण्यासाठी अगदी पद्धतशीरपणे एका ’टूलकिट’चा वापर करीत आहे, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. भाजप खोटं बोलत आहे, असं म्हणत काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भारतात रुग्ण आणि मृत्यूही वाढत गेले. देशात हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, औषधं, लसी अशा अनेक गोष्टींचा तुटवडा भासायला लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपापल्या सूचना, चिंता व्यक्त केल्या. या सगळ्या पत्रांना भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांनी उत्तरं दिली. अशातच भाजप अध्यक्ष जे पी नड्डांपासून ते अनेक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे विविध राज्यांतले प्रवक्ते अशा अनेकांनी काँग्रेसवर आरोप करायला सुरुवात केली. काँग्रेसचं कौतुक आणि मोदी यांची बदनामी अशी काँग्रेसची रणनीती असलेलं ’टूलकिट’ एक्सपोज झाल्याचा दावा हे भाजप नेते करत होते. टूलकिट हा शब्द ’सोशल मीडिया’च्या बाबतीत प्रकर्षानं वापरतात. त्याची सोपी व्याख्या म्हणजे एखाद्या आंदोलनाच्या/मोहिमेच्या संदर्भातली ’सोशल मीडिया’वरील रणनीती आणि प्रत्यक्षपणे करण्याच्या गोष्टींची माहिती त्यात दिलेली असते. हे टूलकिट काँग्रेसच्या अधिकृत लेटरहेडवर होतं आणि काँग्रेस पक्षाच्या संशोधन विभागानं ते तयार केलं होतं असा दावा भाजपनं केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यात आघाडीवर होते. भारतात सापडणार्‍या कोरोनाच्या स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणा असं काँग्रेसनं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचं, तसंच भारताची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा पात्रा यांनी केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस भारतविरोधी भूमिका का घेतंय असा प्रश्‍न उपस्थित केला. अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटनं भाजपच्या या दाव्यांचा फॅक्ट चेक केला. ’अल्ट न्यूज’नं आपल्या फॅक्ट चेकमध्ये म्हटलं, की काँग्रेस पक्षाचं लेटरहेड आणि टूलकिट ज्या कथित लेटरहेडवर होतं, या दोन्हीचे फाँट वेगवेगळे आहेत, त्यांच्यातली तारीख लिहिण्याची स्टाईल वेगळी आहे, तसंच या टूलकिटमध्ये स्ट्रेटेजी म्हणून दिलेल्या घटना यापूर्वीच घडून गेलेल्या आहेत. टूलकिट हे भविष्यात करण्याच्या गोष्टींबद्दल असतं. ’अल्ट न्यूज’नं आपल्या फॅक्ट चेकमध्ये भाजपनं शेअर केलेलं टूलकिट फेक असल्याचं म्हटलं. मोदी सरकारची वारंवार पाठराखण करणार्‍या वेबसाईटनं अल्ट न्यूज ही काँग्रेस समर्थक वेबसाईट असून काँग्रेसला क्लीन चिट देण्यासाठी त्यांनी कोलांटउड्या मारल्याचं म्हटलं; परंतु या सर्वांत ट्विटरनं घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कथित टूलकिट प्रकरणावरून भाजप तोंडघशी
कथित टूलकिट प्रकरणावरून भाजप तोंडघशी
https://1.bp.blogspot.com/-5cGxSgUtpcw/YKngaQ-o4wI/AAAAAAABqXI/U-W3Ef2rmiUleB4BJZeXm04tMGuFNTa6ACLcBGAsYHQ/s0/Dakhal.png
https://1.bp.blogspot.com/-5cGxSgUtpcw/YKngaQ-o4wI/AAAAAAABqXI/U-W3Ef2rmiUleB4BJZeXm04tMGuFNTa6ACLcBGAsYHQ/s72-c/Dakhal.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_164.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_164.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content