$type=ticker$snippet=hide$cate=0

मदत वाटपातील अक्षम्य दिरंगाई

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं देशात हाहाकार माजविला आहे. जगभरातून कोरोनाच्या हाताळणीच्या व्यवस्थापनावर टीका होत आहे. व्यवस्था अतिशय धीम्या गतीन...


कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं देशात हाहाकार माजविला आहे. जगभरातून कोरोनाच्या हाताळणीच्या व्यवस्थापनावर टीका होत आहे. व्यवस्था अतिशय धीम्या गतीनं काम करीत आहे, असा अनुभव पदोपदी येत असतो. जगभरातून आलेल्या मदतीचं वाटप तातडीनं करणं अपेक्षित असताना सहा-सात दिवस ती पडून राहत असेल, तर ती अक्षम्य आहे. देशात कोरोनामुळं दररोज सरासरी चार हजार मृत्यू होत आहेत. बेडस् नाहीत, औषधं नाहीत. प्राणवायूसाठी श्‍वास कोंडलेले. चिता सातत्यानं जळत आहेत. आरोग्य व्यवस्थेतील कमरतता मृत्यूच्या तांडवात भर घालीत आहे. पहिल्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी बाहेर आल्या होत्या, तर आता आरोग्य व्यवस्था किती कोलमडून पडली आहे, हे . 


    राज्यं केंद्र सरकारच्या दारात दररोज भिकेचा कटोरा घेऊन उभी आहेत, यावरून दिसतं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात भारतानं जगाला केलेली मदत जग विसरलेलं नाही. आता दुसर्‍या लाटेनं भारताच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली जात असताना त्यातून सावरण्यासाठी जगातून भारताला मदत पाठविली जात आहे. काही मदत विमानांनी तर काही मदत जहाजातून येत आहे. मदत मिळूनही ती राज्यांपर्यंत पोहोचलेली नाही. केंद्र सरकारचा हा हलगर्जीपणा वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी उघडकीस आणला आहे. केंद्र सरकार जरी अहोरात्र मदत वाटप वितरीत करण्याचे काम चालू असल्याचं सांगत असलं, तरी विदेशी मदत कोणत्याही राज्याला अद्याप पोचलेली नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जेव्हा देशात ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स यांसारख्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवायला लागला, तेव्हा इतर अनेक देशांनी भारताला मदत पाठवायला सुरुवात केली. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया यांसारख्या अनेक देशांनी व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर, वैद्यकीय उपकरणं पाठवली; पण तरीही राज्यांना हा पुरवठा पोहोचलाच नाही अशी राज्यांची ओरड आहे. संकटाच्या वेळी आलेली मदत राज्यांपर्यंत पोहोचली का? नसेल तर ती कुठं आहे? केंद्र सरकारकडं ही मदत पुढं पोहोचती करण्याची योजना वेळेवर तयार होती की नाही? असे अनेक प्रश्‍न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. केंद्र सरकारचं स्पष्टीकरण मदत वाटपाला विलंब झाल्याचं मान्य करणारं आहे. देशभरातील हॉस्पिटल्स मदतीसाठी विनवणी करत असताना परदेशातून आलेली मदत बरेच दिवस विमानतळावरच पडून होती. एक मे पर्यंत 300 टन वैद्यकीय पुरवठा घेऊन जवळपास 25 विमानं दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. इमर्जन्सी मेडिकल सप्लायची पहिली खेप एप्रिलच्या शेवटाला दाखल झाली; पण त्यानंतर साधारण आठवडाभरानं ही मदत पुढं निघाली असं विविध राज्य सरकारांनी सांगितलं. केंद्र सरकारनं बातम्यांचं खंडन करताना म्हटलं आहे, की हे काम ’सुसूत्र आणि पद्धतशीररीत्या’ केलं जात आहे आणि ’वस्तूंना फास्ट ट्रॅक पद्धतीनं मार्ग मोकळा करण्यासाठी अहोरात्र काम सुरू आहे; परंतु विविध राज्य सरकारांच्या अधिकार्‍यांनी त्यांच्यापर्यंत ती मदत, त्या वस्तू पोहोचल्याच नाहीत, असं सांगितलं आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात केरळनं कोरोना बाधितांचा नवा उच्चांक गाठला. चार मे रोजी केरळमध्ये 37 हजार 190 नवे रुग्ण आढळले. बुधवारी रात्रीपर्यंत केरळला केंद्राकडून कोणतीही मदत प्राप्त झाली नव्हती, असं राज्याचे आरोग्य सचिव डॉ. राजन खोब्रागडे यांनी सांगितलं.

    केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला परदेशातून आयात केलेल्या ऑक्सिजन साठ्यातून तातडीनं मदत मिळावी, असं आवाहन पंतप्रधानांना केलं. केरळमध्ये देशातील सर्वांत जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्यानं प्राधान्यानं हा पुरठा व्हावा, असं त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलं. आरोग्य कर्मचारी सांगतात, की हा पुरवठा कसा आणि कधी मिळेल, याबद्दल केंद्र सरकारकडून जवळपास काहीच कळवण्यात आलेलं नाही. देशातल्या काही बड्या खासगी रुग्णालयांचं प्रतिनिधित्व करणार्‍या ’हेल्थकेअर फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. हर्ष महाजन यांनी सांगितलं, की हा पुरवठा कुठं वितरित केला जातो, याबद्दल काहीच माहिती नाही. लोकांना काही माहितीच नाही. मी दोन-तीन ठिकाणांहून ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला; पण काही कळलं नाही. मदतकार्यात सहभागी झालेल्या काही बिगर-सरकारी गटांनीही अशाप्रकारच्या माहितीच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त केली. ज्या देशांनी भारताला मदत पाठवली आहे, त्या देशांमध्येही त्या त्या सरकारांना त्यांनी पाठवलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचत आहे, की नाही याबद्दलच्या चौकशांना सामोरं जावं लागत आहे. भारतातही विरोधी पक्षांनी सरकारनं याबद्दल अधिक माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी परकीय मदत कुठं आहे? त्याचा कुणाला फायदा होतो, त्यात पारदर्शकता का नाही असा सवाल सरकारला केला. या सगळ्या साहित्याचा पुरवठा राज्यांना करण्यासाठी सुसूत्र अशी यंत्रणा उभी करण्यासाठी भारत सरकारला एका आठवड्याचा कालावधी लागला असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. 26 एप्रिलला यासंदर्भात काम सुरू झालं आणि दोन मे रोजी राज्य सरकारांना ’स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिडर’ म्हणजे ’एसओपी’ देण्यात आल्या. प्रत्यक्ष पुरवठा कधीपासून सुरू केला गेला, याबद्दल आरोग्य मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात माहिती दिलेली नाही. भारतात जेव्हा परदेशातून मदत येते, तेव्हा त्याची वितरण व्यवस्था हे एक गुंतागुंतीचं काम असते. यात अनेक पायर्‍या, अनेक मंत्रालयं आणि इतर संस्थांचा सहभाग असतो. विमानं भरून आलेला मदत पुरवठा आधी ’इंडियन रेड क्रॉस सोसायटी’कडं दिला जातो. रेड क्रॉस हा पुरवठा कस्टममधून सोडवून आणतं, असं सरकारनं सांगितलं. त्यानंतर ही सर्व सामग्री ’हिंदुस्तान लाईफकेअर लिमिटेड’कडे सुपूर्द केली जाते. त्यांच्यामार्फत या सामानाची देशभरात वाहतूक केली जाते. येणारा पुरवठा अनपॅक करून पुन्हा पॅक करावा लागतो, यामुळं ही संपूर्ण प्रक्रिया मंदावते हे सरकारनं मान्य केले. सरकारचं म्हणणं आहे, की परदेशातून येणारे साहित्य वेगवेगळ्या संख्येनं, विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या वेळी येतं. अनेकदा आलेल्या सामानात आणि त्याबरोबर जोडलेल्या यादीत तफावत असते. कधी माल कमी-जास्त भरतो, हे सगळे विमानतळावर सुरळीत करून घ्यावं लागतं.

    अत्यवस्थ रुग्णांची संख्या जिथं जास्त आहे आणि जिथं गरज सर्वाधिक आहे, अशा भागांना हा पुरवठा आधी केला जातो. विविध अडचणींवर मात करत दोन मे च्या संध्याकाळपर्यंत 31 राज्यांमधील 38 संस्थांना ही मदत पाठवली गेली होती, असं सरकार म्हणत असलं, तरी मदत मिळालीच नाही, असं राज्य सरकारं म्हणत असतील, तर नेमकं खरं कुणाचं मानायचं, असा प्रश्‍न उरतोच. दोन मे नंतर मदत मिळाली असली, तरी मदत बराच काळ पडून होती, हे केंद्र व राज्य सरकारच्या माहितीतून स्पष्ट होते. अडचणी असूनही केंद्र सरकार गरजू प्रदेशांना मदत करण्यासाठी अहर्निश काम करतं आहे, असं अधिकारी सांगतात. भारतातील अनेक हॉस्पिटल्स अजूनही वैद्यकीय पुरवठा आणि खासकरून ऑक्सिजनसाठी धडपडत आहेत. सहा मे ला भारतात चार लाख 12 हजारांपेक्षा जास्त रुग्ण नोंदवले गेले. गेल्या आठवड्यात जगातील नव्या संसर्गग्रस्तांच्या एकूण संख्येपैकी निम्मी संख्या भारतातून आली. एकूण मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू भारतात नोंदवले गेले, असं जागतिक आरोग्य संस्था म्हणते. आरोग्य कर्मचारी म्हणतात, की परकीय मदतीपेक्षाही आत्ता हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवणं अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक वस्तूंची प्रतीक्षा फ्रंटलाईनवर काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांच्या संयमाची कसोटी पाहत आहे.


 


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मदत वाटपातील अक्षम्य दिरंगाई
मदत वाटपातील अक्षम्य दिरंगाई
https://1.bp.blogspot.com/-Qbp74OFS_3E/YJYcVy0PthI/AAAAAAABqFg/I44lLiXj3U8lu8B74gytgDEWaIJH5E6uACLcBGAsYHQ/s0/Dakhal.png
https://1.bp.blogspot.com/-Qbp74OFS_3E/YJYcVy0PthI/AAAAAAABqFg/I44lLiXj3U8lu8B74gytgDEWaIJH5E6uACLcBGAsYHQ/s72-c/Dakhal.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_288.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_288.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content