$type=ticker$snippet=hide$cate=0

परिवारातील अस्वस्थता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात एक प्रतिमा तयार झाली होती. जगातील टाईमसह मोठ्या वृत्तपत्रांची मुखपृष्ठे मोदी यांच्या छायाचित्रांनी सजत ह...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात एक प्रतिमा तयार झाली होती. जगातील टाईमसह मोठ्या वृत्तपत्रांची मुखपृष्ठे मोदी यांच्या छायाचित्रांनी सजत होती. मोदी हे चांगले इव्ह्ेंट मॅनेजर असल्याने प्रत्येक घटनेचा वापर ते संधी म्हणून करीत. अमेरिका, इस्त्राईल, जर्मनीच्या त्यांच्या दौर्‍यात त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि जगातील नेत्यांशी त्यांचे सौहादपूर्ण संबंध त्यांची प्रतिमा आणखी उंचावत होते. भारतात जसे त्यांचे पाठिराखे होते,  


    तसेच जगभर त्यांचे पाठिराखे तयार झाले आहेत. समाज माध्यमांचा अतिशय चपखल वापर ते करीत होते. मोदी आणि शाह यांचे संघ परिवार आणि भाजपतील स्थान अतिशय वरचे होते. सत्ता आणि परिवारात चांगला समन्वय असल्याने त्यांना फारसा विरोध होत नव्हता. निवडणूक जिंकून देणारे म्हणूनही मोदी-शाह यांना विरोध करण्याचे धाडस कुणी दाखवू शकत नव्हते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील पराभव हे अपवाद होते, असे परिवार मानत होता. त्यातही फोडातोडीच्या राजकारणामुळे कर्नाटक, मध्य प्रदेशसारखी राज्ये भाजपने परत घेतली. मोदी यांनी नोटाबंदी, जीएसटी, टाळेबंदीच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम देशाला भोगावे लागले; परंतु खासदार सुब्रम्हण्यम स्वामी वगळता अन्य कुणी त्याविरुद्ध ब्र काढला नाही. जनता पाठिशी असल्याने चुकीच्या निर्णयाचीही पाठराखण करण्याची परिवाराला सवय लागली; परंतु कोरोनाची दुसरी लाट आणि या काळात आरोग्य व्यवस्थापन करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. विरोधकांनी सुचविलेल्या उपाययोजना अंमलात आणण्याऐवजी त्यांना कचर्‍याची टोपली दाखवित त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्यात धन्यता मानण्यात भाजप नेते मश्गूल होते. बेडस्ची वाणवा, ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू, रुग्णालयांना वारंवार लागणार्‍या आगी, औषधांचा काळाबाजार, राज्यांना मदत पुरविताना होणारा आपपरभाव, सातत्याने जळणार्‍या चिंता यामुळे जगाला चिंता करावी वाटली; परंतु त्यावर उपाय करण्याऐवजी निवडणुकीचे मैदान मारण्यात मोदी-शाह यांना जास्त रस होता. मतांचे राजकारण करण्यात आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात मोदी जेवढे रमले, तेवढे कोरोनावर उपाययोजना करण्यात नाही. भारतातील विरोधक हे म्हणत नव्हते, तर ज्यांनी मोदी यांच्यावर सातत्याने स्तुतीसुमने उधळली, त्या जगातील वृत्तपत्रांनी मोदी यांच्या एकूण नेतृत्व आणि क्षमतेवरच प्रश्‍न केले. विज्ञान विषयाला वाहिलेल्या ’लान्सेन्ट’ नावाच्या एका नियतकालिकानेही मोदी यांच्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या हाताळणीवरून जोरदार प्रहार केले. जगात कुणी चांगले म्हणेना आणि देशातील आतापर्यंत खूशमस्करे असलेल्या माध्यमातूनही टीकेचा स्वर उंचावायला लागलेला अशा कात्रीत मोदी सरकार सापडले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशातील स्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे. कोरोनाच्या या संकटात राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा ढासळल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकावर याचा परिणाम दिसून येत असल्याने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. पंतप्रधान मोदींच्या आतापर्यंतच्या सात वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी नव्हे, ते इतका सध्या चिंतेत आहे. कोरोनासंबंधी योग्य व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याने भाजप आणि संघाच्या विचारांचे समर्थन करणारा प्रत्येक वर्ग चिंतेत आहे. विशेष करून मध्य वर्गीयांना कोरोनाच्या या संकटाचा मोठा फटका बसला आहे. आता कोरोनाचा संसर्ग हा गावांमध्ये वाढत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या ग्रामीण भागांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे भाजप आणि संघ परिवाराची चिंता वाढली आहे. आपण एखाद्या जीवलग व्यक्तीला गमवल्याचे दुःख आणि संताप हा दीर्घकाळ असतो. तो कुठल्याही स्वरुपात समोर येऊ शकतो. कोरोनाच्या संकटाचा निवडणुकीत भाजपवर काय परिणाम होऊ शकतो? यावरून वरिष्ठ नेतृत्व चिंतेत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील ढेपाळलेली आरोग्य यंत्रणा आणि सरकारच्या तयारीतील त्रुटी समोर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी आहे. लोकसभेची पुढील निवडणूक ही 2024 मध्ये होणार आहे; पण उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका संकेत म्हणून बघितल्या तर भाजपसाठी ही चिंता वाढवणारी बाब ठरणार आहे. असंतोष आता उफाळून येऊही लागला आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून बरेलीत वैद्यकीय उपकरणांचा होत असलेला काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा आणि कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दा मांडला. त्यांनी आदित्यनाथ यांना लिहिलेले पत्र ’सोशल मीडिया’वर व्हायरल झाले. डॅमेज कंट्रोलसाठी आता सरकारला आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. काही मंत्र्यांना हटवले पाहिजे आणि त्यांच्या जागी नवीन चेहर्‍यांना संधी दिली पाहिजे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. आरोग्य हा राज्यांचा विषय आहे; पण हा तर्क पुरेसा नाही. कारण गेल्या वर्षी कोरोनाविरोधी लढाईचे नेतृत्व केंद्र सरकारने केले होते. केंद्रीय नेतृत्वावरून नागरिकांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने योग्य पावले न उचलल्यामुळे आता ही बिकट स्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी पश्‍चिम बंगालमध्ये हे निवडणुकीचा प्रचार करत होते. यामुळे चुकीचा संदेश गेला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पश्‍चिम बंगालमधील प्रचारादरम्यान मुखपट्टी घातले नाही. रोड शो आणि मोठ्या प्रचारसभांमध्ये फारशी काळजी घेतली गेली नाही. तसेच सरकारमध्ये संवादाचा अभाव आहे. सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला; पण दुसर्‍या लाटेबाबत कधी माहिती दिली नाही, असे नेत्याचे म्हणणे आहे.

Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11716,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,808,देश,4760,नगर,4,नाशिक,850,पुणे,1047,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18666,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16232,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4535,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1768,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: परिवारातील अस्वस्थता
परिवारातील अस्वस्थता
https://1.bp.blogspot.com/-92P7VItyUSE/YJylHpmXjUI/AAAAAAABqIc/BDGZ_J-Mz0IWoErJHWM03MQzQOiE8Rn-gCLcBGAsYHQ/s320/images.jpg
https://1.bp.blogspot.com/-92P7VItyUSE/YJylHpmXjUI/AAAAAAABqIc/BDGZ_J-Mz0IWoErJHWM03MQzQOiE8Rn-gCLcBGAsYHQ/s72-c/images.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_32.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_32.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content