$type=ticker$snippet=hide$cate=0

पतसंस्थांना मिळणार अवघ्या महिनाभरात वसुली दाखला ; राज्य पतसंस्था फेडरेशनला मिळाला अधिकार

अहमदनगर/प्रतिनिधी- पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीला आता वेग येणार आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनला वसुली दाखला देण्याचा अधिकार शासनाने दिल्याने आता...


अहमदनगर/प्रतिनिधी- पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीला आता वेग येणार आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनला वसुली दाखला देण्याचा अधिकार शासनाने दिल्याने आता केवळ महिनाभरात 101चा वसुली दाखला मिळून पतसंस्थांना आता त्याआधारे थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे सोपे होणार आहे. 


राज्यातील पतसंस्थांना थकीत कर्ज वसुली व कारवाईसाठी लागणारे 101 चे दाखले सहकार खात्याकडून मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे वसुली होण्याच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे 101 चे वसुली दाखले त्वरित मिळावे यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करणारे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रयत्नास यश आले असून शासनाने नुकतीच राज्य पतसंस्था फेडरेशनला 101चे वसुली दाखले देण्याची परवानगी दिली आहे.  नगर जिल्ह्यात पतसंस्थांना 101 चे दाखले मिळण्यासाठी स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या जुन्या कोर्टाजवळ असलेल्या कार्यालयात नव्याने जिल्हास्तरीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उदघाटन जिल्हा बँकेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी.मंत्री यांच्या हस्ते झाले. शासनाने सहाय्यक निबंधक प्रदीप सानप यांची याठिकाणी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे संचालक वसंत लोढा, स्थैर्यनिधी संघाचे संचालक अजिनाथ हजारे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे महासचिव नरेंद्र बागडे, बाळासाहेब खताडे, स्थैर्यनिधी संघाचे व्यवस्थापक महेश जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी लोढा म्हणाले, उपनिबंधक कार्यालयातून पतसंस्थांना 101 चे दाखले मिळण्यास 6 महिन्यांहून अधिक काळ लागत असे. पतसंस्थांना हे दाखले त्वरित मिळावेत यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आंदोलने केली. आता या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनला 101 चे दाखले देण्याची परवानगी शासनाने दिल्याने राज्यातील सर्व पतसंस्थांना आता केवळ एक महिन्यात व पाचशे रुपये अत्यल्प दरात 101 चे दाखले मिळणार आहेत. शासनाच्या या महत्वाच्या निर्णयामुळे पतसंस्था चळवळीला मोठी चालना मिळणार आहे. आता वेगाने थकीत कर्ज वसुली पतसंस्थांना करता येणार असल्याने पतसंस्थांना अधिक बळकटी व स्थैर्य मिळणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे व स्थैर्यनिधीचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने हा अधिकार मिळाल्याचे लोढा यांनी सांगितले.


लगेच प्रस्ताव दाखल

नव्या जिल्ह्य कार्यालयात स्थैर्यनिधी संघाचे संचालक अजिनाथ हजारे यांची प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  या नूतन कार्यालयात लगेचच जिल्ह्यात अग्रणी असलेल्या समता पतसंस्था, दीनदयाळ पतसंस्था, प्रेरणा पतसंस्था, ज्योतीक्रांती पतसंस्था, लक्ष्मीनारायण पतसंस्था आदी संस्थांनी आपले 101 वसुली दाखल्यासाठीचे प्रस्ताव दाखल केले. यावेळी विशेष अधिकारी प्रदीप सानप यांनी माहिती देताना सांगितले की, नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी आपले 101 चे दावे यापुढे या नव्याने सुरु झालेल्या जिल्हास्तरीय कार्यालयात दाखल करावेत. येथे आता या दाव्यांवर वेगाने काम होणार असल्याने कमी अवधीत 101 चे दाखले मिळणार असल्याने सर्व पतसंस्थांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पतसंस्थांना मिळणार अवघ्या महिनाभरात वसुली दाखला ; राज्य पतसंस्था फेडरेशनला मिळाला अधिकार
पतसंस्थांना मिळणार अवघ्या महिनाभरात वसुली दाखला ; राज्य पतसंस्था फेडरेशनला मिळाला अधिकार
https://1.bp.blogspot.com/-7ay9dXse198/YKO5dazTuLI/AAAAAAABqRY/Q46xjHfv1uUH5LqeNDfFeQbKO6c7eXpCgCLcBGAsYHQ/s320/18%2BMAY-%2BPATSANSTHA%2BVASULI.jpg
https://1.bp.blogspot.com/-7ay9dXse198/YKO5dazTuLI/AAAAAAABqRY/Q46xjHfv1uUH5LqeNDfFeQbKO6c7eXpCgCLcBGAsYHQ/s72-c/18%2BMAY-%2BPATSANSTHA%2BVASULI.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_351.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_351.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content