$type=ticker$snippet=hide$cate=0

हगाम्याबाहेरचा निकाल

रेवड्यावरच्या कुस्त्यापासून ऑलिंपिकपर्यंतच्या कुस्त्यांचा एक प्रेक्षक वर्ग असतो. कुस्ती निकाली व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा असते. कुस्ती निक...

रेवड्यावरच्या कुस्त्यापासून ऑलिंपिकपर्यंतच्या कुस्त्यांचा एक प्रेक्षक वर्ग असतो. कुस्ती निकाली व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा असते. कुस्ती निकाली निघण्यापेक्षा त्यात राजकारण आणि बाह्य हस्तक्षेपानं वाद निर्माण होत आहेत. ऑलिपिंकपदक विजेत्या सुशील कुमार याचे पायही मातीचेच निघाले आणि खूनप्रकरणात त्याला अखेर अटक झाली. भारताला अगोदरच ऑलिंपिक पदकाचा वावडं. जी काही मोजकी ऑलिंपिक वाट्याला आली, ती ही कुस्ती आणि हॉकीमध्ये; परंतु ऑलिपिंक मिळवणार्‍यालाही वारंवार पदांचा आणि प्रशिक्षण शिबिरांचा मोह व्हावा, याला काय म्हणावं? 


     यशानं हुरळून जायचं नसतं आणि पराभवानं नाउमेद व्हायचं नसतं; परंतु आपल्याकडं यश लवकर डोक्यात जातं. त्यातही कुस्तीगीरांकडं विनयशीलता कमी असते, असं म्हणतात. त्यांचा तापट स्वभाव त्यांना अडचणीत आणीत असतो. सुशील कुमारचंही तसंच झालं. प्रतिस्पर्ध्याला कुस्तीत सहभागी होता येणार नाही, यासाठी त्यानं मैदानाबाहेर खेळलेले डावपेच कायम वादात राहिले. पैलवान सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं पैलवान सागर राणाच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता. सात राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशातून तो वारंवार पोलिसांना चकवा देत फिरत होता. त्याच्यावर एक लाख रुपयांचं बक्षिस होतं. सुशील कुमारला दिल्लीतील मुंडका येथून अटक केली. सुशील कुमार आणि वाद काही नवीन नाहीत. यापूर्वी तो अनेकवेळा वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे; पण गेल्या काही दिवसांचा हा घटनाक्रम एखाद्या बातमीपेक्षा वेबसीरिज किंवा चित्रपटाचा थ्रिलर सिक्वेन्स म्हणून जास्त शोभेल असाच आहे. या घटनेतला नायक किंवा खलनायक दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार हा आहे. त्याच्यावर खुनासारखा गंभीर आरोप आहे. मुलांमध्ये आपला दरारा किंवा दहशत ठेवण्याचाही आरोप सुशीलवर आहे. भारतात ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू खूप कमी तयार झाले आहेत. त्यात एका ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि पुढच्या ऑलिम्पिकमध्ये ते रौप्यात परिवर्तित करण्याची कामगिरी सुशील कुमारनं केली. त्यामुळं फक्त कुस्तीच नाही तर भारतीय क्रीडा जगतात त्याच्याविषयी आदर दुणावला; पण सुशील कुमारच्या या यशाबरोबरच दिल्लीच्या कुस्ती वर्तुळातील सत्ताही काही प्रमाणात त्याच्या हातात आली. वरिष्ठ क्रीडा अधिकारी म्हणून सुशील कुमार कार्यरत आहे आणि ते कार्यालयही छत्रसालमध्येच आहे. या सत्तेचाच गैरवापर सुशील कुमारनं केला असा आरोप आता होत आहे. ज्या सागर राणाचा खून झाला, तो पूर्वनियोजित होता असं म्हणण्याला वाव आहे, अशी नोंद  दिल्ली न्यायालयानं केली आहे. म्हणूनच सुशीलचा जामीन नाकारला गेला. हा खून मारहाणीतून झाला आहे. म्हणजे इतकी अमानुष मारहाण या तिघांना झाली. छत्रसाल स्टेडिअमबाहेर मिळालेल्या काही सीसीटीव्ही आणि इतर फुटेजमध्ये सुशील कुमारच्या हातात हॉकी स्टिक सदृश एक काठी दिसत आहे आणि तिनं तो अधूनमधून सागर राणाला मारताना दिसत आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

सुशील फरार असताना त्याचा सहकारी प्रिन्स दलाल हा पोलिसांच्या अटकेत होता. त्यानं जबानीत म्हटलं आहे, की सुशीलला सागर आणि त्याच्या साथीदारांना धडा शिकवायचा होता. सुशीलचा अनादर केल्याबद्दल आणि त्याच्याबद्दल स्टेडिअममध्ये वाईट साईट बोलल्याबद्दल त्यांना अद्दल घडवायची होती. थोडक्यात, वैयक्तिक वैमनस्यातून कायदा हातात घेण्यापर्यंत आणि युवा सहकार्‍याला जीवानिशी मारण्यापर्यंत सुशील कुमारची मजल गेली. खूपच कमी बोलणारा, आपले वस्ताद सतपाल सिंग यांचा एकही शब्द खाली न पडू देणारा शागीर्द सुशील कुमार मैदानाबाहेर मारहाणीत का उतरला? वेगवेगळ्या वादात कसा अडकत गेला? याचं गूढ आता उलगडेल. लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळवल्यानंतर सुशीलच्या नावाला वलय प्राप्त झालं; पण त्यामुळे तो राष्ट्रीय स्पर्धा, परदेशात खेळाडूंसाठी आयोजित केलेली प्रशिक्षण शिबिरं यासाठी स्वत:चं नाव गृहित धरत होता की काय अशी शंका येते. शिबिरं आणि स्पर्धांमध्ये आपली वर्णी लागावी, म्हणून सुशील दडपशाही करत होता, असाही आरोप होतो. खरंतर दोन कुस्तीपटूंची लढाई मॅटवर नाहीतर कुस्तीच्या आखाड्यातच चांगली रंगते; पण सुशीलनं आखाडा सोडून नको तो मार्ग स्वीकारला. नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकला जाता येऊ नये, म्हणून सुशील कुमारच्या माणसांनी नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करून उत्तेजक चाचणीत त्याला फेल करवलं, असा आरोप सुशील कुमारवर झाला. पाच वर्षांपूर्वी त्यावरून भरपूर वादळ झालं होतं. 2016च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा सुरू होत्या. आधीच्या 70 किलो वजन गटातून सुशील आता 74 किलो गटात खेळायला लागला होता. या गटात त्याची स्पर्धा होती राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आशादायी वाटणार्‍या महाराष्ट्राच्या नरसिंग यादवशी. स्वत: सुशील काही वैयक्तिक कारणं आणि दुखापतींमुळं 2014पासून कुस्तीच्या आखाड्यापासून दूर होता. फारशा स्पर्धा तो खेळला नाही; पण नरसिंग यादवनं राष्ट्रीय विजेतेपदाबरोबरच 2015च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून ऑलिम्पिक कोटा पटकावला. खेळाडूनं जिंकलेला कोटा हा त्या खेळाच्या राष्ट्रीय संघटनेचा मानला जातो. म्हणजे भारतानं एक जागा पटकावली असा त्याचा अर्थ धरला जातो. या जागी कुणाला खेळवायचं हे राष्ट्रीय संघटना ठरवू शकते, असा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा नियम आहे. या नियमावर बोट ठेवून सुशील कुमारनं रिओ ऑलिम्पिक कोट्यावर आपला हक्क सांगितला आणि नरसिंग यादवबरोबर ऑलिम्पिक ट्रायल आयोजित करण्याचं आवाहन कुस्ती संघटनेला केलं. न्यायालयातव वाद-प्रतिवाद झाले, तेव्हा कुस्ती संघटनेनं आपली बाजू मांडताना, सुशील कुमार राष्ट्रीय शिबिराला हजर राहिला नाही आणि स्वतंत्रपणे आपला सराव करत राहिला. त्यामुळं सुशील किती फिट आहे आणि त्याची ऑलिम्पिकदृष्ट्या किती तयारी आहे, याची चाचपणी राष्ट्रीय कोच जगमिंदर सिंग यांना करता आली नाही, अशी बाजू मांडली होती. सुशील कुस्तीसाठी नाही, तर अन्य काही आर्थिक लाभांसाठी सुशील ट्रायल मागत असल्याचं संघटनेनं तेव्हा म्हटलं होतं. ही केस सुशील न्यायालयात हरला. ट्रायलची मागणी मान्य झाली नाही. त्यापूर्वीच सुशीलनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं प्रतिस्पर्धी नरसिंग यादवच्या जेवणात अंमली पदार्थांची भेसळ केल्याचा आरोप तेव्हा झाला होता. कारण, नरसिंग यादव काही दिवसांतच उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. त्याच्या ऑलिम्पिक वारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं. सुशील कुमारनं अन्नात भेसळ घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. आपल्याला जाता आलं नाही, तर आपल्या स्पर्धकालाही ऑलिम्पिकमध्ये खेळता आलं नाही पाहिजे, हा देशद्रोही विचार त्यानं केला होता.अखेर, रिओ ऑलिम्पिकमध्ये ना नरसिंग यादव जाऊ शकला, ना सुशील कुमार; पण बेकायदेशीर मार्गानं नरसिंगचा ऑलिम्पिक मार्ग बंद केल्याचा आरोप मात्र सुशील कुमारवर झाला आणि नरसिंग यादववर चार वर्षांची आंतरराष्ट्रीय बंदी येऊन त्याची कारकीर्दही घसरली. 2018च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी खेळाडूंच्या ट्रायल्स सुरू होत्या आणि सुशील कुमारची लढत त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रवीण राणाशी होती. सेमी फायनलची ही लढत सुशील जिंकला खरा; पण त्या दरम्यान त्याचा प्रवीणशी वाद झाला आणि दोघांमध्ये झालेली हमरीतुमरी क्षणार्धात त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचली. मॅट बाहेर समर्थक एकमेकांना भिडले आणि दिल्ली पोलिसांना हस्तक्षेप करून एफआयआर नोंदवावा लागला. तेव्हा प्रतिस्पर्धी प्रवीण राणाचा आरोप असा होता, की सुशीलनं त्याला आपल्याविरोधात लढण्याची हिंमत दाखवल्याबद्दल दमदाटी आणि मारहाण केली.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: हगाम्याबाहेरचा निकाल
हगाम्याबाहेरचा निकाल
https://1.bp.blogspot.com/-gOASnXjSZW4/YKxvacXkTCI/AAAAAAABqYg/Yi945orskBMZikDJaBiEqd-KAzEdNrPvACLcBGAsYHQ/s0/Dakhal.png
https://1.bp.blogspot.com/-gOASnXjSZW4/YKxvacXkTCI/AAAAAAABqYg/Yi945orskBMZikDJaBiEqd-KAzEdNrPvACLcBGAsYHQ/s72-c/Dakhal.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_360.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_360.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content