$type=ticker$snippet=hide$cate=0

मनपातील दिवानासह सहकार्‍यांना कारणे दाखवा

अहमदनगर/प्रतिनिधी- स्वतःच्या कार्यालयात एक हसीना थी...एक दिवाना था... गाणे सुरेल आवाजात गाणारे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे...

अहमदनगर/प्रतिनिधी- स्वतःच्या कार्यालयात एक हसीना थी...एक दिवाना था... गाणे सुरेल आवाजात गाणारे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एवढेच नव्हे तर डॉ. बोरगेंच्या गाण्याला टाळ्यांची दाद देणार्‍या त्यांच्या कार्यालयीन सहकार्‍यांनाही या नोटिसीचा दणका बसला आहे. अर्थात, या सर्वांना ही नोटीस गाणे म्हटले वा दाद दिली म्हणून नाही तर कोविड नियम धाब्यावर बसवले म्हणून दिली गेली असून 24 तासात खुलासा करण्याचे बजावण्यात आले आहे. 


    27 मे रोजी डॉ. बोरगे यांचा वाढदिवस झाला व यानिमित्ताने त्यांच्या कार्यालयीन सहकार्‍यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले तसेच यावेळी डॉ. बोरगे यांनी कर्ज चित्रपटातील एक हसीना थी...गाणेही कराओके म्युझिक सिस्टीमवर सुरेल आवाजात सादर केल्याचे वृत्त सोशल मिडियातून व्हायरल झाले होते. त्यांचे हे गायन तसेच वाढदिवसानिमित्तचा शुभेच्छांचा वर्षावाचे फोटो सोशल मिडियातून आल्यावर येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आक्षेप घेताना, डॉ. बोरगे आणि त्यांचे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स तसेच मास्क न वापरता वाढदिवस पार्टी कशा पद्धतीने सादर केली आहे व सर्वसामान्य नागरिकांनी असा प्रकार केला असता तर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली असती, असे स्पष्ट करून, आयुक्त साहेब या लोकांविरोधात आपण कारवाई करणार का? असा सवाल विचारला होता. याशिवाय सोशल मिडियातूनही गायन व फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर टीकाटिपण्णी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त गोरे यांनी डॉ. बोरगे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.

...तर, शिस्तभंगाची कारवाई

आयुक्त गोरे यांनी डॉ. बोरगे यांना कारणे दाखवा नोटिस दिली असून, त्यात म्हटले आहे की, कोरोना विषाणू (कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना सुरु आहेत. तथापी, दि. 28 मे रोजी समाज माध्यमामध्ये आपण दि. 27 मे रोजी आपल्या कार्यालयात कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत मास्क न वापरता व सोशल डिस्टसिंगचे पालन न करता गर्दी जमवून वाढदिवस साजरा केल्याबाबतची व आपण कार्यालयात गाणे गात असल्याबाबतची बातमी व्हायरल झालेली आहे. यावरुन आपणास सदरबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केलेले आहे व आपले सदरचे वर्तन हे कार्यालयीन शिस्तीस सोडून अत्यंत गैर, बेजबाबदारपणाचे, कामकाजामध्ये अक्षम्य असे दुर्लक्ष करणारे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणारे, अत्यावश्यक सेवेमध्ये अडथळा निर्माण करणारे व महापालिकेची जनमानसात प्रतिमा मलिन करणारे आहे. यास्तव सदरकामी आपणास वैयक्तीकरित्या जबाबदार धरुन तुमच्याविरुध्द साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 56 नुसार कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा 24 तासाच्या आत सादर करावा. मुदतीत खुलासा सादर न केल्यास उक्त तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल, असे या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अशीच नोटिस या वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित असणारे डॉ. बोरगे यांच्या मिश्रक सतीश मथुकर मिसाळ, भाऊसाहेब बबनराव सुडके, विकास भानुदास गिते, महंमद जावेद गुलमोहंमद रंगरेज व किरण बलभीम खरात आणि लिपीक टंकलेखक धोंडीबा देवजी भाकरे, या सहा कार्यालयीन सहकार्‍यांनाही देण्यात आली आहे.

ती तक्रार हेतुपुरस्सर : डॉ. बोरगे

शासन दप्तरात माझी जन्मतारीख 1 जून आहे. त्यामुळे 27 मे रोजी मी वाढदिवस साजरा केल्याची तक्रार खोटी व हेतुपुरस्सर आहे. त्याबाबतच्या नोटिसीचा योग्य खुलासा मी करणार आहे, असे डॉ. बोरगे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, त्यादिवशीचा कार्यक्रम हा पब्लिक फंक्शन नव्हता. काही अडचणी, तक्रारी व कामे घेऊन कार्यालयीन सहकारी माझ्या कार्यालयात आले होते. यानिमित्ताने त्यांना चहापाणी केले तसेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवण्याच्यादृष्टीने गायन व गप्पाटप्पा झाल्या. गायन हा माझा छंद आहे व सहकार्‍यांनी आग्रह केल्याने मी गायन केले. तसेच तेथे उपस्थित सर्वांचे व्हॅक्सिनेशनही झालेले आहे, सर्व कोरोनायोद्धे आहेत आणि मागील दीड वर्षांपासून आम्ही कोविड नियम पाळत आहोत व त्याची जनजागृतीही करीत आहोत. त्यामुळे त्यादिवशी तेथेही ते नियम आम्ही पाळले, असेही डॉ. बोरगे यांनी स्पष्ट केले.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मनपातील दिवानासह सहकार्‍यांना कारणे दाखवा
मनपातील दिवानासह सहकार्‍यांना कारणे दाखवा
https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/06154044/Ahmednagar-Municipal-Corporation.jpg?impolicy=abp_images&imwidth=720
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_398.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_398.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content