$type=ticker$snippet=hide$cate=0

कचरा वजन वाढवण्याचा नामी फंडा ; घंटागाडीतील सिमेंट गोण्यात सापडले दगड व गोटे, शिवसेना नगरसेवकाने केला पर्दाफाश

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेच्या घंटागाड्यांतून कचरा संकलन होते व हा कचरा वजनावर स्वीकारून त्याचे पैसे ठेकेदाराला मनपाकडून अदा केले जातात. पण...

अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेच्या घंटागाड्यांतून कचरा संकलन होते व हा कचरा वजनावर स्वीकारून त्याचे पैसे ठेकेदाराला मनपाकडून अदा केले जातात. पण ठेकेदार चक्क सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांतून दगड-गोटे भरून व ते कचर्‍यात मिसळून कचर्‍याचे वजन वाढवण्याचा फंडा राबवत आहे. शिवसेनेचे शिवाजीनगर (कल्याण रोड) परिसरातील नगरसेवक सचिन शिंदे यांनी केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये ही बनवाबनवी उघड झाली असून, त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


यासंदर्भात नगरसेवक शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेतील ठेकेदाराकडून कचर्‍याच्या गाडीत वजन वाढवण्यासाठी दगड-गोटे सिमेंटच्या गोण्यात भरण्याचा सपाटा सुरू असल्याचे सांगितले.  ते म्हणाले की, गेल्या 2 वर्षी पासून शहरातील कचरा उचलण्यासाठी स्वयंभू संस्थेला महापालिकेच्यावतीने ठेका देण्यात आला आहे. मात्र, ठेकेदाराचे कर्मचारी शहरातील कचरा उचलण्याऐवजी जुने तोडफोड झालेले बांधकाम साहित्य उचलण्यास प्राधान्य देतात. यामध्ये रिकाम्या सिमेंटच्या गोण्या, तसेच त्यात दगड-गोटे व फुटक्या विटा उचलण्याचा सपाटा शहरामध्ये सुरू आहे. कारण कचर्‍यापेक्षा या बांधकाम साहित्याचे वजन जास्त असते. त्या माध्यमातून कचरा गाडीचे वजन जास्त भरल्यामुळे ठेकेदारामार्फत जास्त बिलाची आकारणी करून महापालिकेची लूट केली जाते, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. कचरा ठेकेदाराकडून सुरू असलेल्या या प्रकारामध्ये जो कोणी महापालिकेच्या संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असेल, त्याच्यावर कारवाई करा तसेच ठेकेदाराला जाब विचारावा व त्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी नगरसेवक शिंदे यांनी केली आहे.

अधिकार्‍यांना नेऊन दाखवले

कल्याण रोड वरील रेल्वेब्रीज येथे ठेकेदाराची कचरा उचलणारी गाडी सिमेंटच्या गोण्या भरीत असताना नगरसेवक शिंदे यांनी प्रत्यक्षदर्शी महापालिकेच्या अधिकार्‍यांना तेथे घेऊन जाऊन ही घटना उघडकीस आणून दिली व ठेकेदाराचा चालू असलेल्या अनधिकृत कामाचा केला पर्दाफाश केला.

कचर्‍याचे गौडबंगाल कायम

नगर शहरात रोज सुमारे सव्वाशे टन कचरा होतो. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने बाजारपेठा बंद असल्याने रस्त्यावर कचरा पडण्याचे प्रमाणही कमी आहे. अशा स्थितीत मनपाकडील नोंदीनुसार रोज सुमारे दीडशे ते पावणे दोनशे टन कचरा संकलन होत असल्याचे समजते. ठेकेदाराला त्याने आणलेल्या कचर्‍याच्या वजनानुसार मनपाकडून पैसे दिले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात संकलित होणारा कचरा व ठेकेदाराला दिले जात असलेले पैसे यात तफावत असते व यावर नगरसेवकांकडून आवाज उठवला जातो. मनपा हद्दीबाहेरील भिंगार येथून संकलित केलेला कचरा मनपाच्या हिशेबात दाखवला जातो, मनपाच्या कचरा गाड्यांचे भाडे दिले जात नाही, अशा तक्रारीही नगरसेवक करतात. पण बैठकांतून स्वच्छ भारत अभियानात जुना व खूप वर्षे पडून असलेला कचरा व माती उचलली गेली तसेच शहराचा विस्तार वाढल्याने कचर्‍याचे प्रमाण वाढल्यासारखी कारणे देऊन विषय गुंडाळला जातो. अशा स्थितीत आता कचर्‍याचे वजन वाढवण्यासाठी सिमेंट गोण्यांतून दगड-गोटे भरण्याच्या प्रकारावर मनपा प्रशासनाची भूमिका उत्सुकतेची झाली आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कचरा वजन वाढवण्याचा नामी फंडा ; घंटागाडीतील सिमेंट गोण्यात सापडले दगड व गोटे, शिवसेना नगरसेवकाने केला पर्दाफाश
कचरा वजन वाढवण्याचा नामी फंडा ; घंटागाडीतील सिमेंट गोण्यात सापडले दगड व गोटे, शिवसेना नगरसेवकाने केला पर्दाफाश
https://1.bp.blogspot.com/-0H-YzIjzq0E/YJYWmvcr51I/AAAAAAABqFA/8BM0g_rKZ8c1kywAHPtfLDPlsRNIt5M1wCLcBGAsYHQ/s320/Manpa.jpg
https://1.bp.blogspot.com/-0H-YzIjzq0E/YJYWmvcr51I/AAAAAAABqFA/8BM0g_rKZ8c1kywAHPtfLDPlsRNIt5M1wCLcBGAsYHQ/s72-c/Manpa.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_40.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_40.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content