$type=ticker$snippet=hide$cate=0

भांबुचीवाडी बंधार्‍याला लागलेली गळती काढण्याची मागणी

कराड / प्रतिनिधी : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तीन वर्षा पुर्वी पुर्ण होऊन मोठ्या उत्साहात जलपुजन कार्यक्रम झालेल्या  भांबुचीवाडी बंधार्‍य...


कराड / प्रतिनिधी : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तीन वर्षा पुर्वी पुर्ण होऊन मोठ्या उत्साहात जलपुजन कार्यक्रम झालेल्या  भांबुचीवाडी बंधार्‍याला गळती सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन जात असून बंधार्‍यातील पाण्याची गळतीची दुरूस्ती करण्याची मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.                           

दक्षिण वांग नदीवरील वांग-मराठवाडी धरणाच्या खालील भांबुचीवाडी बंधार्‍याचे  काम अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तीन वर्षापुर्वी पुर्ण झाले. या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, विभागातील सरपंच, प्रमुख कार्यकर्ते, महिलांनी मोठ्या उत्साहात भांबुचीवाडी  बंधार्‍याचे जलपूजन केले. या परिसरातील गाव, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तर सुटला. परंतू बागायती क्षेत्रात वाढ होऊन सिंचनाचा प्रश्‍नही निकालात निघाला होता.

ढेबेवाडी विभाग हा डोंगराळ दुर्गम असा विभाग आहे. पावसाळ्यामध्ये या विभागात सरासरी 1700 ते 1800  मिलीमीटर  पाऊस पडतो. ढेबेवाडी विभागाच्या जिंती खोर्‍यातुन दक्षिण वांग नदी वाहते तर सनबुर खोर्‍यातून उत्तर वांग नदी वाहते. मात्र उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे पडून अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. 

सन 1997 मध्ये दक्षिण वांग नदीच्या पात्रात वांग मराठवाडी धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली. 2.73 टीएमसी क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे 4 गावे पुर्ण बाधित व 5 गावे अंशत: बाधित झाली. मात्र, धरणग्रस्तांची आंदोलने, निधीचा अभाव  यामुळे 23-24 वर्षे या धरणाचे काम रखडले होते. सन 2011 मध्ये अंशत: घळभरणी करून 0.60 टिएमसी पाणीसाठा करण्यात येत होता. सध्या तो दुप्पट झाला आहे. प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असुन लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्णत्वाकडे चालला आहे.                                                              

धरण बांधकामाच्या खालील नदीच्या पात्रात 10  को. प. बंधार्‍याचे बांधकाम करून 6500 हे. इतके सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. पाटण तालुक्याच्या हद्दीतील भांबुचीवाडी, मालदन, खळे काढणे येथील बंधार्‍यांची कामे काही वर्षांपूर्वी पुर्ण झाली तर भोसगाव बंधारा नुकताच पुर्ण झाला आहे.

वांग मराठवाडी धरण पुर्ण झाल्यानंतर 2.73 टीएमसी पाणी साठा करण्यात येणार आहे. सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून सोडलेले पाणी बंधार्‍यात अडवून त्या-त्या परिसरातील शेती सिंचन, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.                                              भांबुचीवाडी बंधार्‍यातील पाण्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ होऊन शेतकर्‍याचे जीवनमान उंचाले आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकालात निघाला आहे. या पाण्याच्या भरोशावर येथील शेतकर्‍यांचे शेतीचे नियोजन अवलंबून आहे. तीन वर्षांतच या बंधार्‍याच्या गळतीला सुरवात झाल्याने शेतकर्‍यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गळतीमध्ये वाढ होऊन बागायती शेतीचे नुकसान होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर बंधार्‍याची गळतीची दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.   


Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: भांबुचीवाडी बंधार्‍याला लागलेली गळती काढण्याची मागणी
भांबुचीवाडी बंधार्‍याला लागलेली गळती काढण्याची मागणी
https://1.bp.blogspot.com/-daXIF9YOD7I/YJFPEsHUVkI/AAAAAAABp_Y/y0bWyTBzAvMuqZ-VMNe0mx3xgaJfwFKNwCLcBGAsYHQ/s320/4-4.jpg
https://1.bp.blogspot.com/-daXIF9YOD7I/YJFPEsHUVkI/AAAAAAABp_Y/y0bWyTBzAvMuqZ-VMNe0mx3xgaJfwFKNwCLcBGAsYHQ/s72-c/4-4.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_41.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_41.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content