$type=ticker$snippet=hide$cate=0

डाव्यांच्या विजयाचा अर्थ

केरळ विधानसभेच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं इतिहास रचला. मुख्यमंत्री विजयन पिनराई यांच्यावर जनतेनं विश्‍वास दाखविला. असं असलं...

केरळ विधानसभेच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं इतिहास रचला. मुख्यमंत्री विजयन पिनराई यांच्यावर जनतेनं विश्‍वास दाखविला. असं असलं, तरी पिनराई यांच्यापुढं मंत्रिमंडळ रचनेचं मोठं आव्हान आहे. अननुभवी नेत्यांना सोबत घेऊन त्यांना कारभार करावा लागणार आहे. 


    केरळमध्ये गेल्या 40 वर्षांत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या आघाडीकडं आलटून पालटून सत्ता जात असते. गेल्या वेळी डाव्यांची सत्ता होती. त्यामुळं या वेळी काँग्रेसची सत्ता येईल, असं सांगितलं जात होतं; परंतु तसं झालं नाही. त्याची कारणं अनेक आहेत. एकतर काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर पराकोटीचे वाद होते. ते मिटविण्यात राहुल गांधी यांना यश आलं नाही. प्रदेशाध्यक्ष राहिलेले नेते काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. वादळं, कोरोनाची हाताळणी अशा काळात मुख्यमंत्री विजयन यांचं काम अतिशय चांगलं होतं. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्यांनी ग्रामीण भागात, तर शहरी भागात काँग्रेसनं चांगलं यश मिळविलं होतं. त्यातही डाव्यांनी मिळविलेलं यश पाहता खरंतर काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याची चांगली संधी होती; परंतु काँग्रेसनं ती दवडली. लेफ्ट डेमॉक्रटिक फ्रंट या  डाव्या आघाडीला आतापर्यंत कधीही जेवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, तेवढ्या जागा या वेळी मिळाल्या. 140 पैकी 99 जागा डाव्या आघाडीला मिळाल्या. त्यातही मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला 62 जागा जिंकता आल्या. या पक्षानं आतापर्यंत जिंकलेल्या जागांचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे 2016 च्या तुलनेत सात जागा कमी लढवूनही मिळालेलं यश उल्लेखनीय आहे. भारतीय जनता पक्षानं केरळमध्ये किमान दहा जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठरवून व्यूहनीती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष दिलं. त्यातही देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वाधिक शाखा असलेलं राज्य म्हणून केरळची ओळख. त्यामुळं तिथं दहा जागा मिळणं अवघड नाही, असं भाजपला वाटत होतं; परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्री विजयन यांनी जाहीर केल्याप्रमाणं भाजपला एकही जागा मिळू दिली नाही. 2016 मध्ये भाजपला एक जागा मिळाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही बर्‍यापैकी जागा मिळाल्या होत्या; परंतु विधानसभेत भाजप शून्यावर आला. पश्‍चिम बंगालमध्ये जे काँग्रेस, डाव्यांचं झालं, ते केरळमध्ये भाजपचं झालं. डाव्यांच्या विरोधातील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटला 41 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्यांत दोन्ही आघाड्यांत इतका फरक राहील, असा अंदाज कुणालाही आला नव्हता. या आघाडीतील काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. गेल्या वेळेपेक्षा काँग्रेसला एक जागा कमी मिळाली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्ष असले, तरी केरळमध्ये मात्र हे दोन पक्ष परस्परांच्या विरोधात होते. सत्ताधारी डाव्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होती. तीन जागा लढवून त्यापैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठं बंड झालं होतं.

    गेल्या शतकातील सर्वांत मोठा महापूर, वादळं आणि कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारकडून अपेक्षेइतकी मदत मिळाली नाही, तरी विजयन यांनी हार मानली नाही. त्यांनी संकटाच्या काळात यंत्रणा अतिशय प्रभावीपणे राबविली. कोरोनामुळं आखाती राष्ट्रातील केरळचे नागरिक मोठ्या संख्येनं केरळमध्ये परतले. भारतातही देशभरात विखुललेले केरळी नागरिक परतले. त्यांच्या उपचाराचा आणि अन्य खर्च सरकारनं केला. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील केरळची कामगिरी देशाला अभिमान वाटावी, अशी होती. दुसर्‍या लाटेत देशभर बेडस्, ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी कोरोनाबाधितांचे हाल झाले. केरळमध्ये कोरोनाबाधितांचे फारसे हाल झाले नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही त्यांच्या कामाचं कौतुक करावं लागलं. आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली. त्यांचा राज्यात सर्वाधिक मतांच्या फरकानं म्हणजे साठ हजार मतांनी विजय झाला. केरळमधील अतिवृष्टीत मसाल्याची शेती उद्ध्वस्त झाली. घरं गेली. नागरिकांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्‍न होता. केरळ सरकारनं मात्र मसाल्याची शेती अल्पकाळात उभी केली. भाजपनं केरळमध्ये आक्रमक प्रचार केला. त्यामुळं तिथल्या ख्रिश्‍चन आणि मुस्लिम नागरिकांना काँग्रेस हा समर्थ पर्याय वाटला नाही. त्याऐवजी डाव्यांच्या हाती सत्ता देणं या दोन प्रमुख घटकांनी पसंत केलं. त्याचं कारण शबरीमला प्रकरणात तसंच अन्य ठिकाणी भाजपनं आक्रमक हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. काँग्रेस देशभर सौम्य हिंदुत्त्वाची भूमिका घेत असल्यानं तसंच शबरीमला प्रकरणात काँग्रेसनं घेतलेली भूमिका लक्षात घेऊन तिथल्या निर्णायक दोन समाजांनी काँग्रेसला दूर करून, डाव्यांना पुन्हा पसंती दिली. काँग्रेसची मतपेढी असलेल्या अल्पसंख्याक समाजाला आपलेसं केलं. केरळ मणी काँग्रेसनं डाव्या आघाडीशी हातमिळवणी केली. मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांची सुमारे 35 टक्के मतं डाव्या आघाडीला मिळाली. इंडियन मुस्लिम लीग या काँग्रेसप्रणीत आघाडीतील दुसर्‍या क्रमांकाच्या पक्षाला 1970 नंतर प्रथमच नीचांकी जागा मिळाल्या. या पक्षाला 15 जागा जिंकता आल्या. त्यातील एक जागा तर अवघ्या 38 मतांनी निवडून आली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची कधी हातमिळवणी होत नाही, असा एक गोड गैरसमज आहे. राजस्थानातील एका जिल्ह्यात स्थानिक प्रादेशिक पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं एकी केली होती. केरळमध्येही भाजपला जेव्हा आपल्या हाती काही येत नाही, असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा आपली मतं काँग्रेसकडं वळविण्याची व्यूहनीती केली. ते डाव्यांच्या लक्षात आल्यानंतर या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर डाव्यांनी कुरघोडी करीत धर्मनिरपेक्षतेचा आणि लव जिहादचा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडला. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा थेट आरोपच केला. गेल्या वेळेपेक्षा 15 जागा जास्त जिंकूनही भाजपची मतांची टक्केवारी घसरल्याचं हे एक प्रमुख कारण आहे.

    केरळमध्ये दोनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या आमदारांना या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळं डाव्या लोकशाही आघाडीला सरकार स्थापन करताना अनुभवी आमदारांची वाणवा जाणवेल. मंत्रिमंडळात विजयन यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या पाच वरिष्ठ मंत्र्यांना या वेळी पक्षाच्या नियमानुसार तिकीट मिळालं नाही. जुन्या, जाणत्या नेत्यांऐवजी नवीन चेहर्‍यांना आता मंत्रिमंडळात संधी द्यावी लागेल. कडकपल्ली सुरेंद्रन (पर्यटन), एमएम मणी (उर्जा), एसी मोईडिन (स्थानिक स्वराज्य संस्था), टी.पी. रामकृष्णन (उत्पादन शुल्क) आणि के.के. शैलजा (आरोग्य) हे मंत्री विजयी झाले. मत्स्यव्यवसाय मंत्री जे.जे. मर्सीकट्टी अम्मा यांचा पराभव झाला. माकपचे नसलेले; परंतु उच्चपदस्थ शिक्षणमंत्री केटी जलील यांना निवडणूक जिंकता आली. नव्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे विजयनचे निकटचे विश्‍वासू एमव्ही गोविंदन यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. पी. राजीव आणि के.जे. एन. बालागोपाल या दोघांनीही विजय मिळविला आहे. बी. बी. राजेशही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. फिल्मस्टार-सीपीआय-आमदार मुकेश यांनी सलग दुसर्‍यांदा कोल्लम जिंकले. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. के. के शैलजा, आमदार वीणा जॉर्ज, यू. प्रतिभासुद्धा रांगेत आहे. या वेळी सर्वांच्या नजरा विजयनचे जावई मोहम्मद रियाजकडं आहेत. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळेल का, याची उत्सुकता आहे. माजी सभापती व माजी मंत्री के. राधाकृष्णन यांना मंत्रिपदासाठीही योग्य मानलं जाऊ शकतं.


 

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: डाव्यांच्या विजयाचा अर्थ
डाव्यांच्या विजयाचा अर्थ
https://1.bp.blogspot.com/-rlPXBJuVWvQ/YJYcwYy9rhI/AAAAAAABqFo/GqbF1Z3Z_0srac4bGMQDZtEPtiI65PBHQCLcBGAsYHQ/s320/New%2BVindo%2Blogo.jpg
https://1.bp.blogspot.com/-rlPXBJuVWvQ/YJYcwYy9rhI/AAAAAAABqFo/GqbF1Z3Z_0srac4bGMQDZtEPtiI65PBHQCLcBGAsYHQ/s72-c/New%2BVindo%2Blogo.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_410.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_410.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content