$type=ticker$snippet=hide$cate=0

औषध विक्रेते लसीकरणाच्या प्रतीक्षेत ; मनपाच्या आरटीपीसीआर चाचणी सक्तीने अस्वस्थता

 अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील दीड-दोन हजारावर औषध विक्रेते कोविड लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील दीड वर्षांपासून जीव धोक्यात घालून 24 ता...


 अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील दीड-दोन हजारावर औषध विक्रेते कोविड लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील दीड वर्षांपासून जीव धोक्यात घालून 24 तास मेडिकल दुकाने सुरू ठेवून नागरिकांची औषध गरज भागवली असतानाही त्यांच्या लसीकरण मागणीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, महापालिकेने येत्या 25 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवसायांना आरटीपीसीआर चाचणीची सक्ती केल्याने त्याची नवी अस्वस्थता औषध विक्रेत्यांमध्ये आहे. 




औषध विक्रेते व दुकानातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून 24 तास सेवा देत असल्याने संपूर्ण देशासह राज्यात औषध पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत होत आहे. त्यामुळे अग्रक्रमाने काम करणार्‍यांंच्या कोविड योद्ध्यांच्या यादीत त्यांचा समावेश होणे अत्यावश्यक होते. मात्र, करोना प्रतिबंधक लसीकरण करताना केंद्र व राज्य सरकारने औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचीही दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे सरकारने आपली भूमिका बदलली नाही तर नाईलाजास्तव कठोर निर्णय घेत संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन औषध विक्रेत्यांना आपली दुकाने बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या या इशार्‍यास अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चेतनकुमार कर्डिले व सचिव राजेंद्र बलदोटा, खजिनदार संजय वाव्हळ यांनी पाठिंबा दिला आहे.

औषध विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोविड पेशंट अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी जवळून येत असल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रासह देशात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनाला बळी पडले असून, 1000 च्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झाले आहेत. तरीही केंद्र व राज्य सरकारने कोविड योध्दा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही, याची खंत सर्व औषधी विक्रेते व्यक्त करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नगर शहरात दोन हजारावर तर जिल्ह्यात पाच हजारावर औषध विक्रेते आहेत. त्यांच्यासह त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारीही लसीकरणापासून अजून वंचित आहेत. 24 तास वैद्यकीय सेवा व औषधे सेवा देऊनही शासनाकडून या घटकाकडे होत असलेले दुर्लक्ष या क्षेत्रात काम करणारांना अस्वस्थ करीत आहे.


त्या प्रमाणपत्राची सक्ती

महापालिकेने नगर शहरात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने चालवणारांना आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे बंधनकारक केले आहे. येत्या 26 मे पासून मनपाच्या पथकांद्वारे मेडिकल दुकानांची अशी तपासणी होणार आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये अधिक अस्वस्थता असून, या पार्श्‍वभूमीवर शासनाने आमचे लसीकरण तातडीने करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: औषध विक्रेते लसीकरणाच्या प्रतीक्षेत ; मनपाच्या आरटीपीसीआर चाचणी सक्तीने अस्वस्थता
औषध विक्रेते लसीकरणाच्या प्रतीक्षेत ; मनपाच्या आरटीपीसीआर चाचणी सक्तीने अस्वस्थता
https://static.langimg.com/thumb/msid-79704324,width-1200,height-900,resizemode-75/maharashtra-times.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_478.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_478.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content