$type=ticker$snippet=hide$cate=0

आता फक्त दूध पुरवठा व मेडिकल सुरू राहणार ;

  अहमदनगर/प्रतिनिधी-आगामी काळात आपल्याला कडकच लॉकडाऊन करावा लागणार असून फक्त मेडिकल व दुधाची दुकाने चालू ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांन...

 

अहमदनगर/प्रतिनिधी-आगामी काळात आपल्याला कडकच लॉकडाऊन करावा लागणार असून फक्त मेडिकल व दुधाची दुकाने चालू ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे सांगितले. कोविडच्या दुसर्‍या लाटेमध्ये आपण बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात आणू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. उपाययोजना केल्या असत्या तर एवढा मोठा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला नसता. शिवाय, आता तिसरी लाट येणार असे बोलले जात आहे. पण आताच जर आपण औषधे व इंजेक्सन सुविधा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा जर वेळेत करू शकलो नाही तर आपण राज्य चालवण्यामध्ये अपयशी ठरलो, असे म्हटल्या शिवाय राहणार नाही, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.



येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, लहू कानडे, किरण लहामटे व आशुतोष काळे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित उपस्थित होते. नगर जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यु करून देखील रुग्ण संख्या कमी झाली नाही त्यामुळे आता कडक जनता कर्फ्यूशिवाय आपल्याला पर्याय नाही. करोनाच्या आगामी तिसर्‍या लाटेमध्ये रुग्ण संख्येवर नियंत्रण आणणे महत्त्वाचे असल्याचे सांगून ते म्हणाले, केवळ दूध व मेडिकल सेवाच सुरू ठेवल्या जाणार आहेत. भाजीपाला व अन्य अत्यावश्यक सुविधांवर निर्बंध आणले जाणार आहे, असे ते म्हणाले. याबाबत जिल्हाधिकारी आदेश जारी करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरा लॉकडाऊन हा कोणीच गांभीर्याने घेतला नाही. वरपासून खालपर्यंत सर्व गाफील राहिले. देशामध्ये ही परिस्थिती झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, निवडणुका या सर्व पाहिल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


 


 


नफेखोरीवर कारवाई करणार


 


फॅबीफ्ल्यू गोळ्या व टेस्टिंग कीटसंदर्भात नफेखोरी कंपन्यांनी सुरू केली आहे. 6 रुपयाची गोळी 26 रुपयाला तर 57 रुपयांचे कीट 120 रुपयांना दिले जाते. कंपन्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अशा पद्धतीने अडवणूक करून पैसे कमावणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. त्यामुळे कंपन्यांच्या नफेखोरीसंदर्भात आता राज्य सरकारने संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली असून, याबाबत अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी आपण बोललो असून, त्यांनीही अशा कारवाईला सुरुवात करण्याची ग्वाही दिली आहे, असे ते म्हणाले.


 


इंजेक्शन भाजपवाल्यांना कसे मिळते


 


रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा निर्यातबंदी नंतर कमी झाला आहे. पूर्वी राज्याला 50 हजार मिळत होते व आता 26 हजार मिळतात, ही वस्तुस्थिती आहे. कच्चा माल येथे तयार करणे व इंजेक्शन सेटिंगला 10 दिवस लागत असल्याचे कारण सांगितले जाते. पण दुसरीकडे भाजपच्या लोकाना इंजेक्शन कसे मिळते, असा सवाल करून ते म्हणाले, येथील भाजपच्या खासदारांना इंजेक्शन मिळाल्याबाबत न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, मागेही दरेकर, लाड व फडणवीस यांच्याकडेच इंजेक्शन होते. त्यामुळे केंद्र सरकारने भाजपवाल्यानाच इंजेक्शन पुरवले आहेत का, असा माझ्या मनामध्ये आता प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.


 


दोन दिवसात इंजेक्शन येणार


रेमडीसिविर इंजेक्शन नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नगर जिल्ह्यामध्ये 14 एप्रिलपासून आत्तापर्यंत 13800 इंजेक्शन येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहेत व त्याचे वाटप शहर व ग्रामीण भागामध्ये करण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


 


ऑक्सिजन तुटवडा कायम


नगर जिल्ह्यामध्ये 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. सध्या आपल्याकडे ते 35 टन ऑक्सिजन मिळत आहे. स्थानिक पातळीवर आपण दहा टन ऑक्सिजन मिळवत आहोत. त्यामुळे आता आगामी काळामध्ये ऑक्सिजन प्लान्ट करण्यावर भर देणार आहोत. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कर्जत व नगर शहरातील जिल्हा रुग्णालय या ठिकाणी 11 कोटी रुपयांचे ऑक्सिजनच्या प्लान्ट तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अनेक रुग्णालयांचे ऑडिट होणे गरजेचे आहे व त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ या संदर्भातला निर्णय घेऊन खासगी रुग्णालयाच्या बिलांचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून आम जनतेला त्याचा फटका बसू नये याची खबरदारी सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. लसीकरणाच्या संदर्भामध्ये मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यांना पहिले डोस दिले आहेत, त्यांनाच आता दुसर्‍या लसीसाठी बोलवले जाणार आहे. अठरा वर्षाच्या पुढे लस 15 मे पासून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.


तालुकास्तरावर गॅस दाहिन्या

कोरोना काळामध्ये मृत्यमुखी पडलेल्यावर नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येतात व त्यामुळे नगरवर ताण आला आहे. आता तिसर्‍या फेजमध्ये तसे होऊ नये यासाठी आता तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी गॅस दाहिन्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा. आपापल्या तालुक्यांच्या ठिकाणी या दाहिन्या बसवून घ्याव्यात, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.


थोरातांना सूचक सल्ला

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्याच्या सद्य परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे व त्यामध्ये यंत्रणेतील त्रुटींचा उल्लेख केलेला आहे, याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी, मी हे पत्र वाचले नाही व पत्र वाचल्यानंतर निश्‍चितपणे महसूलमंत्र्यांना मी फोन करेल, असे सांगून, महसूल मंत्री आमचे नेते आहेत, पण महसूल मंत्र्यांच्या अंडर जिल्हाधिकारी येतात त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगून त्यामध्ये सुधारणा करून घ्यायच्या असतात, असा सूचक सल्लाही दिला.

Name

] ब्रेकिंग,8,] ब्रेकिंग,878,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,9,Latest News,6013,Latest News Maharashtra sangli,2,Latest News Maharashtra satara,4,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,4,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,446,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,325,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11150,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,771,देश,4642,नाशिक,836,पुणे,917,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17898,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,180,महाराष्ट्र,15277,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4307,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1690,सातारा,3223,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: आता फक्त दूध पुरवठा व मेडिकल सुरू राहणार ;
आता फक्त दूध पुरवठा व मेडिकल सुरू राहणार ;
https://1.bp.blogspot.com/-aWiSyyNv7dQ/YIzMhESPioI/AAAAAAABp7Y/zwJ1pNB7shQYn7gsdHcX2c2GTAbboROawCLcBGAsYHQ/s320/30-palakmantri%2Bmiting.jpg
https://1.bp.blogspot.com/-aWiSyyNv7dQ/YIzMhESPioI/AAAAAAABp7Y/zwJ1pNB7shQYn7gsdHcX2c2GTAbboROawCLcBGAsYHQ/s72-c/30-palakmantri%2Bmiting.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_54.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_54.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content