$type=ticker$snippet=hide$cate=0

रामभरोसे आरोग्यसेवा

उत्तर प्रदेशात कोरोनामुळे आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. कोरोना बाधितांना बेडस् मिळत नाहीत. त्यामुळे काहींनी हजारो किलोमीटर अंतर पार करू...

उत्तर प्रदेशात कोरोनामुळे आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. कोरोना बाधितांना बेडस् मिळत नाहीत. त्यामुळे काहींनी हजारो किलोमीटर अंतर पार करून उत्तर प्रदेशातून काही जण थेट मुंबईत उपचारासाठी येत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकांना ऑक्सिजन मिळत नाही. औषधे मिळत नाहीत. सामान्यांचे जाऊ द्या, केंद्रीय मंत्र्यांच्या भावालाही उत्तर प्रदेशात उपचार मिळत नाहीत. आमदारांनाही उपचार मिळत नाही. आतापर्यंत मंत्र्यांसह पाच आमदारांचा योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.  


    हजारो मृतदेहांवर नीट अंत्यसंस्कार होत नाहीत. मृतदेह गंगा किनारी फेकून दिले जात आहेत. त्यामुळे गंगाकिनारची गावे भयंकित झाली आहेत. सरकार केवळ इशार्‍यावर इशारे देण्यात मग्न आहे. उच्च न्यायालयांनी सरकारची वारंवार पिसे काढली असली, तरी प्रशासनावर कुणाचाही अंकुश नसल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे. मेरठमधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक रुग्णच बेपत्ता झाल्याच्या मुद्द्यावरुन अलहाबाद उच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये सरकारी कारभारावर नाराजी व्यक्त केली. मेरठसारख्या शहरामधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेणार्‍यांची ही परिस्थिती असेल तर छोटी शहरे आणि गावांसंदर्भात बोलायचे झाल्यास राज्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे काम करत असल्याचे म्हणावे लागेल, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने राज्यातील कोरोना प्रादुर्भावासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे वक्तव्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजन सुविधा असणार्‍या बेड्सची संख्या वाढवण्यासंदर्भातही न्यायालयाने भाष्य केले आहे. उच्च न्यायलयामध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार 22 एप्रिल सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान संतोष कुमार हा 64 वर्षीय रुग्ण शौचालयामध्ये गेला होता; मात्र तिथे तो बेशुद्ध होऊन पडला. कनिष्ठ डॉ. तुलिका या त्या वेळी रात्रपाळीमध्ये काम करत होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेशुद्धावस्थेतच संतोष यांना स्ट्रेचरवरुन रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मृत्यू झाला. अहवालानुसार मुख्य डॉ. अंशु यांची त्या दिवशी रात्रपळी होती; मात्र अंशु रुग्णालयामध्ये नव्हते. सकाळी दुसर्‍या एका डॉक्टरने हा मृतदेह शवागृहात ठेवण्यास सांगितले; मात्र मेलेली व्यक्ती कोण आहे यासंदर्भातील माहिती घेण्यात आली नाही. त्यामुळेच संतोष यांचा मृतदेह बेवार असल्याची मानण्यात आले. रात्री कामावर असणार्‍यांनाही या व्यक्तीची माहिती दिली नाही. त्यामुळे या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यस्कार करण्यात आले. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अशा पद्धतीने काम करत असतील आणि त्यांच्या कामात एवढा बेजबाबदारपणा असेल तर हे गंभीर आहे. हे असे वागणे सामान्य लोकांच्या आयुष्यासोबत खेळण्यासारखे आहे. राज्य सरकारने या प्रकरणासाठी जबाबदार असणार्‍यांविरोधात कठोर करावाई करणे आवश्यक आहे, असे म्हटले.


 


इतकेच नाही तर पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालासंदर्भात बोलताना उच्च न्यायालयाने शहरातील आरोग्य व्यवस्था आणि उपलब्ध सुविधा या अपुर्‍या असल्याचे मत नोंदवले. गावांमध्ये सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये जीवनावश्यक उपकरणांची कमतरता आहे. ग्रामीण भागामध्ये चाचण्यांच्या संख्या वाढवाव्यात आणि तेथील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी असे निर्देश राज्य सरकारला न्यायालयाने दिले आहेत. लसीकरणासंदर्भात बोलताना उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या धार्मिक संघटनांना दान देत प्राप्तिकर सूट मिळवणार्‍या मोठ्या व्यवसायिकांना लसींसाठी पैसे दान करण्यास सांगता येऊ शकते. प्रत्येक नर्सिंग होममधील बेड्ससाठी ऑक्सिजनची व्यवस्था करता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 20 हून अधिक बेड असणार्‍या नर्सिंग होममधील 40 टक्के बेड्स हे अतिदक्षता विभागात आणि 30 पेक्षा अधिक बेड्स असणार्‍या नर्सिंग होममध्ये प्रत्येक बेडसाठी ऑक्सिजन सुविधा सक्तीची केली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर मतदारसंघाचे भाजप आमदार राकेश राठोड यांनी मुख्यमंत्री योगी सरकारवच टीका करून घरचा आहेर दिला आहे. राज्यात कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या परिस्थितीबद्दल कुठे बोलल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर यांचा एक व्हिडिओ ’सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सरकार आपल्या आमदारांचेदेखील ऐकत नसल्याचे सांगितले. आमदारांची लायकी काय आहे? आम्ही जास्त बोललो तर देशद्रोहाचा गुन्हा आमच्यावरही दाखल होईल, अशा भाषेत त्यांनी सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा पंचनामा केला. आम्ही तर हेच म्हणणार, की यापेक्षा चांगले काहीच होऊ शकत नाही. आम्ही हे नक्की सांगू शकतो, की जे सरकार म्हणते तेच योग्य आहे. आमदारांची लायकी काय आहे? आम्ही जास्त बोललो तर आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आमच्यावरही दाखल होईल. तुम्हाला वाटते का आमदार आपले म्हणणे सरकारसमोर मांडू शकतात?, असा सवाल करून ठाकरे यांनी योगी सरकारमध्ये आमदारांच्या शब्दाला, म्हणण्यालाही जणू काहीच किंमत नाही, हे सूचित करतात. सीतापूर येथील ट्रॉमा सेंटर हे 2016 साली तयार करण्यात आले होते; मात्र अद्याप ते सुरू करण्यात आले नाही. ट्रॉमा सेंटर सुरू झाले असते तर रुग्णांना आयसीयूची सुविधा तिथेच मिळाली असती, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर राठोड यांनी तुम्हाला वाटते का आमदार आपले म्हणणे सरकारकडे मांडू शकत असतील? असे विचारून हतबलता व्यक्त केली. 

Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11717,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,809,देश,4762,नगर,4,नाशिक,850,पुणे,1049,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18673,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,145,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16240,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4538,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1771,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: रामभरोसे आरोग्यसेवा
रामभरोसे आरोग्यसेवा
https://1.bp.blogspot.com/-sil26t4Dx-Y/YKVAFZVbJYI/AAAAAAABqUU/leifBIMvMjwHsvc4PjLaxH4DDk2WbX_rgCLcBGAsYHQ/s320/images.jpg
https://1.bp.blogspot.com/-sil26t4Dx-Y/YKVAFZVbJYI/AAAAAAABqUU/leifBIMvMjwHsvc4PjLaxH4DDk2WbX_rgCLcBGAsYHQ/s72-c/images.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_571.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_571.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content