$type=ticker$snippet=hide$cate=0

कोवळ्या कळ्यांचा हुंदका

देश आर्थिक महासत्ता होण्याच्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात ज्या देशातील महिला आणि बालके सुरक्षित नाहीत, त्या देशाला महासत्ता म...

देश आर्थिक महासत्ता होण्याच्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात ज्या देशातील महिला आणि बालके सुरक्षित नाहीत, त्या देशाला महासत्ता म्हणण्याचा अधिकार नाही. महिला आणि बालविकास विभागासाठीची तरतूद दरवर्षी कमी कमी केली जात असते. ही तरतूद ही अन्यत्र वळविली जाते. गेल्या वर्षापासून तर कोरोनाकडे सर्व लक्ष लागले असताना इतर आजारांकडे मात्र दुर्लक्ष झाले. कोरोनाच्या काळात मुलींची लग्ने कमी वयात लग्न केली गेली. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर झाला. कुपोषणाचा प्रश्‍न दरवर्षी चर्चिला जातो. ठराविक साच्याची उत्तरे मिळतात. यंत्रणा हलल्याचा देखावा तयार होतो आणि काही दिवसांनंतर पुन्हा जैसे थे पदावर येते.


     राज्य कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार पुन्हा पुन्हा व्यक्त केला जातो आणि आकडे फेकून त्यावर मल्लीनाथी केली जाते; परंतु दरवर्षी मेळघाट आणि आदिवासी पट्यात पुन्हा कोवळ्या पानगळीचा मुद्दा उपस्थित होतो. डॉ. अभय बंग यांनी त्यावर मोठे काम केले. कोवळी पानगळ नावाचे पुस्तक लिहिले; परंतु समस्येच्या मुळाशी सरकार गेलेले नाही. राज्याला आम्ही प्रगतीच्या नव्या शिखरावर नेत असल्याची टिमकी प्रत्येक सरकार वाजवत असले, तरी कुपोषणामुळे होणारी ही कोवळी पानगळ कधी थांबणार, या प्रश्‍नाचे आश्‍वासक उत्तर मात्र मिळत नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव इथेही जाणवतो. सामाजिक कार्यकर्त्यांनी आजवर या प्रश्‍नाचे सामाजिक, आर्थिक कंगोरे मांडत कारण आणि उपायही सांगितले आहेत; मात्र सरकारी यंत्रणेची कार्यपद्धती आजही तीच आहे. लहान मुलांच्या पोषणातील मागासलेपण म्हणजेच कुपोषण. कुपोषणाचा संबंध पूर्वी आर्थिक गरिबी, अन्नाच्या कमतरतेशी जोडला जायचा. आज ते कारण जवळपास नाही. डॉ. बंग यांच्या मते मुलांच्या संगोपनाबाबत दिसणारे ज्ञानकुपोषण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील विसंगतीत कुपोषणाच्या समस्येचे मूळ शोधावे लागेल. स्त्री शारीरिक दृष्टीने कुपोषित असेल तर तिचे बाळही कुपोषित जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. भारतीय स्त्रीचे सरासरी वजन 45 किलो आढळते. मुलांना कधी, काय आणि किती वेळा खाऊ घालायचे, याचे पुरेसे ज्ञान आपण आजही देऊ शकलेलो नाही. साध्यासाध्या जंतुदोषांमुळे मुलांची वाढ खुंटून ते पोषणाच्या बाबतीत मागे पडतात. वैज्ञानिकदृष्ट्या मूल जन्माला आल्यापासून नव्वद टक्के कुपोषण हे पहिल्या चोवीस महिन्यांतच होते. कुपोषण शरीरात प्रस्थापित झाल्यानंतर वयाच्या तिसर्‍या वर्षानंतर मूल अंगणवाडीत जाते. त्यामुळे अंगणवाडीतील पोषक आहाराचा फायदा होत नसल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांकडून वारंवार मांडले गेले आहेत, तरीही अंगणवाडीची केंद्रीकृत रचना न बदलण्याचा सरकारचा हट्ट कायम आहे.

दीड तपापूर्वी डॉ. बंग यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या बालमृत्यू मूल्यांकन समितीनेदेखील याच विसंगतीवर नेमके बोट ठेवत ही योजना विकेंद्रित करून ती घरोघरी पोहोचवण्याचा उपाय सुचवला होता. त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. कुपोषणाची खरी आकडेवारी दाखवू नका, तीव्र कुपोषित मुलांना पटावरून काढून टाका, असा दबाव अधिकार्‍यांकडून येत असल्याची कबुली मध्यंतरी अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या आंदोलनाच्या काळात दिलेली आहे. दर दहा वर्षांनी होणार्‍या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात 2015-16 मध्ये महाराष्ट्रातील कुपोषणाचे प्रमाण जवळपास 34-35 टक्के असल्याचे आढळून आले होते. देशाचा विकास दर सात टक्के असल्याचे दावे होत असताना बालमृत्यूदर वर्षाला तीन ते चार टक्क्यांनी आणि कुपोषण एक टक्क्यानेच कमी होत असल्याचे वास्तव आहे. डॉ. बंग यांनी मांडलेल्या कोवळ्या पानगळीच्या अहवालाने विदर्भातल्या जंगलातील शापित नंदनवनाचे वास्तव समोर आले होते. या शापित वनात यात होरपळणार्‍या कोवळ्या पानगळीचे हुंदके मात्र आता कोरोनाच्या काळातही पुन्हा एकदा बेदखल होतात की काय असे चित्र निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात नागपूर विभागात दोन हजार 426 बालके जन्मल्यानंतर वयाचा पहिला महिनादेखील पाहू शकली नाहीत. याच कालावधीत 356 कोवळी बालके वर्षाच्या आत मरण पावली. बाळंतपणा दरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे जोखमीच्या गटातील 217 गरोदर मातांचा मृत्यू ओढवला. यातही राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 124 गरोदर स्त्रिया बाळंतपणानंतर चिमुकल्याचा चेहरा पाहण्यापुरतेदेखील जगू शकल्या नाहीत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर उपसंचालक कार्यालयाने घेतलेल्या नोंदीवरून हे वास्तव प्रकाशात येत आहे. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि सरकारी मनुष्यबळ कोरोनाच्या व्यवस्थापनात गुंतली आहे. यंत्रणेचे सगळे श्रम रुग्णांसाठी खाटा, ऑक्सिजन, इंजेक्शन आणि लसिकरणासाठी खर्च होत आहेत. त्यानुळे अकाली दगावणार्‍या कोवळ्या कळ्यांचा हुंदकाही कोंडला जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यापासून ते ग्रामीण भागातील आशा वर्कर सर्वच जण कोरोनात व्यस्त आहेत. दुर्गम भागातील शाळा, अंगणवाड्या, पोषण आहार केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे कमी वजनाची बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना मिळणारा पोषण आहारही बंद आहे. पोषण आहारच पोचत नसल्याने ग्रामीण भागातील कुपोषण आणखी गंभीर वळणावर असण्याची भीती व्यक्त होत आहे. कुपोषणमुक्ती हा प्राधान्याचा विषय असायला हवा; परंतु तसे न होता तो दुर्लक्षिण्यासारखा विषय झाल्याने भावी पिढी कुपोषित तयार होण्याची शक्यता आहे. केवळ एका राज्याचा विचार न करता देश कुपोषितमुक्त करण्याला प्राधान्य द्यायला हवे.

Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11716,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,809,देश,4760,नगर,4,नाशिक,850,पुणे,1047,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18666,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16232,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4535,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1769,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोवळ्या कळ्यांचा हुंदका
कोवळ्या कळ्यांचा हुंदका
https://1.bp.blogspot.com/-Yq2Wa_6U5PQ/YJfRuZ7LI3I/AAAAAAABqGU/LwXuMghpMQAXDa11V5wHnJoy1IbWlBVPwCLcBGAsYHQ/s320/images.jpg
https://1.bp.blogspot.com/-Yq2Wa_6U5PQ/YJfRuZ7LI3I/AAAAAAABqGU/LwXuMghpMQAXDa11V5wHnJoy1IbWlBVPwCLcBGAsYHQ/s72-c/images.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_621.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_621.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content