$type=ticker$snippet=hide$cate=0

मोठ्या व्यक्तींचे पायही मातीचेच

ज्यांचं आदर्श म्हणून नाव घ्यावं, त्यांचं आयुष्यच सामान्यांसारखं आहे, असं जेव्हा कळतं, तेव्हा बसणारा धक्का मोठा आहे. विद्यार्थ्यांना, तरुणांन...

ज्यांचं आदर्श म्हणून नाव घ्यावं, त्यांचं आयुष्यच सामान्यांसारखं आहे, असं जेव्हा कळतं, तेव्हा बसणारा धक्का मोठा आहे. विद्यार्थ्यांना, तरुणांना आदर्श म्हणून ज्यांची नावं सांगायची, ज्यांच्या प्रेरक कथा सांगायच्या, त्यांचं चरित्र जेव्हा नंतर कळतं, तेव्हा आदर्शांचा मुखवटा गळून पडतो. आदर्श तरी कुणाचा घ्यायचा, असा प्रश्‍न निर्माण होऊन जीवनात एक पोकळी तयार होण्याची शक्यता असते. 


    बिल गेटस् यांचं नाव घेतलं, की सर्वांसमोर येतं, ते त्यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचं नाव. त्यांनी कमविलेला नफा. त्यांचं गरीबांविषयीचं प्रेम. त्यांच्या कर्तृत्व आणि दातृत्वाची कायम चर्चा होत राहिली. जगभरातील युवकांपुढं त्यांचा आदर्श सांगितला जायचा. त्यांच्या प्रेरक कथा अनेकांना प्रेरणादायी वाटायच्या; परंतु गेल्या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात त्यांचा घटस्फोट आणि तो किती महागडा आहे, याचीही चर्चा रंगली. त्यांना कंपनीच्या संचालक मंडळातून काढलं, की त्यांनी ते सोडलं यावरूनही वाद झाला; परंतु या सर्वांच्या मुळाशी त्यांनी लपवून ठेवलेलं एक प्रेमप्रकरण असल्याचं जेव्हा समजलं, तेव्हा माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याचे पाय मातीचेच असतात, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. पाश्‍चात्य जगतात विवाहबाह्य संबंध, ’लिव्ह इन रिलेशनशीप’ याला मान्यता असते. गरीबानं केलं, तर त्याला लफडं म्हणतात आणि श्रीमंतानं केलं, तर त्याला प्रेम म्हणतात. मोठ्यांच्या प्रेमप्रकरणाची केवळ चर्चा होते; परंतु त्यांना त्याची किंमत फार मोजावी लागत नाही. आर्थिक नुकसान होत असलं, तरी त्यानं त्यांचं फार काही बिघडत नाही. अमेेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिटंन यांची प्रकरणं गाजली. ट्रम्प यांच्या पत्नीनं आता घटस्फोटाची तयारी केली आहे. क्लिटंन यांच्या पत्नी हिलरी यांनी मात्र पतीला माफ केलं, तरी बराच काळ त्यांच्या प्रकरणाची चर्चा झाली. तशीच चर्चा गेल्या दीड महिन्यांपासून जगात प्रदीर्घ काळ सर्वांत श्रीमंत राहिलेल्या बिल गेटस् यांच्या घटस्फोट आणि त्यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीतील बडतर्फीची. ’मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेटस् कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडले, तेव्हा एका 20 वर्षे जुन्या अफेअरसंबंधीच्या तक्रारीबद्दल त्यांची चौकशी सुरू होती, असं समोर आलं. गेटस् यांच्या वागणुकीबद्दलच्या तक्रारी आल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली होती. या वृत्ताला या टेक कंपनीनं दुजोरा दिला;पण गेटस् यांच्या पायउतार होण्याचा या चौकशीशी काहीही संबंध नसल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी 27 वर्षांच्या वैवाहिक जीवननानंतर घटस्फोट घेतल्यानंतर या चौकशीची बातमी समोर आली आहे.

बिल गेटस् यांनी 2000 मध्ये एका महिला कर्मचार्‍यासोबत खासगी नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आपल्याकडं 2019 साली आल्याचं ’मायक्रोसॉफ्ट’ या सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. संचालक समितीनं या तक्रारीची दखल घेत बाहेरच्या एका कायदेविषयक कंपनीची मदत घेत सखोल चौकशी सुरू केली. ही तक्रार दाखल करणार्‍या कर्मचार्‍याला या संपूर्ण चौकशीदरम्यान ’मायक्रोसॉफ्ट’नं पाठिंबा दिला, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं;पण बिल गेटस् ही चौकशी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळातून पायउतार झाल्यानं या चौकशीतून कोणताही निष्कर्ष काढता आला नाही. बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन करत असलेल्या समाजकार्यासाठी जास्त वेळ देता यावा, यासाठी आपण संचालक मंडळातून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचं गेल्या मार्चमध्ये गेटस् यांनी म्हटलं होतं. तीन महिन्यांनंतर त्यांची पुन्हा संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी त्यांनी लिहिलं होतं, की मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा अर्थ मी कंपनीपासून दूर जातो आहे, असा होत नाही. मायक्रोसॉफ्ट कायमच माझ्या आयुष्यभराच्या कामाचा महत्त्वाचा भाग असेल. कंपनी करत असलेल्या प्रगतीमुळं मला आधीपेक्षा अधिक सकारात्मक वाटत असून याचा जगालाही फायदा होईल.

गेटस् यांचं महिला कर्मचार्‍यासोबतच वागण अयोग्य होतं आणि त्यासाठी त्यांनी पायउतार व्हावं असा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळानं घेतला होता. जवळपास 20 वर्षांपूर्वी हे अफेअर झालं होतं आणि ते परस्परसंमतीनं संपुष्टात आलं होतं आणि संचालक मंडळातून बाहेर पडण्याच्या बिल यांच्या निर्णयाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. समाजकार्यासाठी जास्त वेळ देण्याबद्दल ते गेल्या अनेक वर्षांपासून बोलत होते, असं सांगितलं गेलं. कंपनीच्या परस्परविरोधी वक्तव्यानं गोंधळ आणि संभ्रम निर्माण होत आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स या जोडप्यानं काही दिवसांपूर्वी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. या दोघांनी विविध कार्यांसाठी जगभरात अब्जावधीच्या देणग्या दिल्या असून घटस्फोटानंतरही या फाऊंडेशनसाठी एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मालमत्ता आणि प्रॉपर्टीचं विभाजन कसं करायचं, याचा निर्णय या दोघांनीही विभक्त झाल्याचं जाहीर करण्यापूर्वी घेतल्याचं अमेरिकन माध्यमांनी म्हटलं. 65 वर्षांचे बिल गेट्स हे जगातले चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ’फोर्ब्स’नुसार त्यांची संपत्ती 124 अब्ज डॉलर्स आहे. आता जगातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी असणार्‍या मायक्रोसॉफ्टची त्यांनी 1970च्या दशकात स्थापना केली. इथं ते 2008 सालापर्यंत पूर्ण वेळ कार्यरत होते. वॉशिंग्टन, फ्लोरिडा आणि वायोमिंगमध्ये या जोडप्याच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टी आहेत. त्यांचं वॉशिंग्टनमधलं तलावाच्या किनारी असणारं मॅन्शन 127 दशलक्ष डॉलर्स मूल्याचं असल्याचा अंदाज आहे. लग्नानंतर 27 वर्षांनी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. जोडपं म्हणून आम्ही यापुढं आयुष्य व्यतीत करू शकत नाही, असं या दांपत्यानं संयुक्त निवेदनात म्हटलं होतं. खूप विचार करून आणि नात्याबाबत बोलल्यानंतर आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्याला कारण गेटस् यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पुढं आलं आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मोठ्या व्यक्तींचे पायही मातीचेच
मोठ्या व्यक्तींचे पायही मातीचेच
https://1.bp.blogspot.com/-xsjyoeJztG0/YKZRMTiPY3I/AAAAAAABqU4/yZzrldOmWt4_dJzXkP7ItqRx7xpIgsK3gCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-xsjyoeJztG0/YKZRMTiPY3I/AAAAAAABqU4/yZzrldOmWt4_dJzXkP7ItqRx7xpIgsK3gCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_665.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_665.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content