$type=ticker$snippet=hide$cate=0

दैनिक लोकमंथनच्या वृताची दखल; घाणबी येथील आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू

पाटण / संजय कांबळे : वनकुसवडे  डोंगरपठारावरील घाणबी, ता. पाटण येथील आरोग्य उपकेंद्र डॉक्टरांअभावी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद होते. त्याम...



पाटण / संजय कांबळे : वनकुसवडे  डोंगरपठारावरील घाणबी, ता. पाटण येथील आरोग्य उपकेंद्र डॉक्टरांअभावी गेल्या कित्येक वर्षांपासून बंद होते. त्यामुळे परिसरातील जनतेची मोठी गैरसोय होती.

घाणब आरोग्य उपकेंद्राबाबतचे वृत्त सर्वप्रथम दैनिक लोकमंथनमधून प्रसिध्द झाले होते. नागरिकांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्याशी भेट घेवून आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. सत्यजितसिंह पाटणकर यांनी तालुका आरोग्य विभागाला घाणबीतील उपकेंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्यानंतर याची तात्काळ दखल घेत आरोग्य विभागाने घाणबीतील उपकेंद्र सुरू केल्याने परिसरातील रुग्णांची सोय झाली आहे. त्यामुळे घाणबीसह परिसरातील लोकांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना धन्यवाद दिले आहेत.

पाटण तालुक्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी त्याकाळी डोंगरपठारावरील दुर्गम ठिकाणी वसलेल्या जनतेच्या आरोग्याची हेळसांड होवू नये. त्यांना स्थानिक ठिकाणीच चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून पाटण तालुक्यात विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे 13 व 63 आरोग्य उपकेंद्रे सुरू केली. याद्वारे स्थानिक जनतेला आरोग्य सुविधा मिळत गेल्या. आजही या आरोग्य केंद्रांमार्फत स्थानिक जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उपकेंद्रांवर डॉक्टरसह आरोग्य कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त असल्याने काही उपकेंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे तेथील नागरीकांना पाटण याठिकाणी पायपीट करून आरोग्याच्या सुविधा घ्याव्या लागत आहेत. यामध्ये डोंगर पठारावरील जनतेचा वेळ व पैसा देखील वाया जात आहे.

तालुक्यातील वनकुसवडे पठारावरील घाणबी येथील आरोग्य उपकेंद्र डॉक्टर व कर्मचार्‍यांविना गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत होते. त्यामुळे येथील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दैनिक लोकमंथनमधून प्रसिध्द झाल्यानंतर येथील जागृत नागरीकांनी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेवून उपकेंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तसे निवेदनही पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानुसार सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका आरोग्य विभागाशी चर्चा करून हे उपकेंद्र तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याची आरोग्य विभागाने गांभिर्याने दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील, डॉ. ए. एस. खंडागळे, पर्यवेक्षक मुसा चाफेरकर, श्रीमती एम. व्ही. पाटोळे, एस. एम. पोळ, संग्राम पाटणकर, ग्रामसेवक यु. व्ही. झांबरे आदी आरोग्य विभागाच्या टीमने घाणबी उपकेंद्रास भेट देवून पाहणी केली. यावेळी सोमवार ते गुरूवार याठिकाणी ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. तसेच इतर दिवशी लसीकरण, कोरोना टेस्टींग व नागरीकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी घाणबीचे सरपंच प्रकाश सपकाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष नारायण सपकाळ, रमेश शिंदे, राजेश शिंदे, माजी सरपंच आनंदा सपकाळ, गणपत यादव, सतीश सपकाळ, मधुकर कदम यांच्यासह घाणबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

घाणबी येथील आरोग्य उपकेंद्र डॉक्टर अभावी बंद असल्याने डोंगर पठारावरील जनतेची गैरसोय होत आहे. याची दखल घेत दैनिक लोकमंथनने सर्वप्रथम आवाज उठवून पाटण तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ चक्रे फिरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निकाली निघल्याबद्दल ग्रामस्थांनी दैनिक लोकमंथन चे आभार मानले.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दैनिक लोकमंथनच्या वृताची दखल; घाणबी येथील आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू
दैनिक लोकमंथनच्या वृताची दखल; घाणबी येथील आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू
https://1.bp.blogspot.com/-6T52zYkSHZ4/YKUac5gQAoI/AAAAAAABqTc/32p8y0y8r3M_12o9ceWl0D9e76k3utpFQCLcBGAsYHQ/s320/19-6.jpg
https://1.bp.blogspot.com/-6T52zYkSHZ4/YKUac5gQAoI/AAAAAAABqTc/32p8y0y8r3M_12o9ceWl0D9e76k3utpFQCLcBGAsYHQ/s72-c/19-6.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_721.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_721.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content