$type=ticker$snippet=hide$cate=0

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर रिझर्व्ह बँकेची मात्रा

मुंबई/प्रतिनिधी :  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तीकांत दास यांनी अचानक संवाद साधून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उडी घेतली. काही निर्णय घेतले....

मुंबई/प्रतिनिधी :  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तीकांत दास यांनी अचानक संवाद साधून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उडी घेतली. काही निर्णय घेतले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बाजारात सुमारे 95 हजार कोटी रुपये कसे येतील, याची व्यवस्था केली आहे. पतधोरणात कोणताही बदल न होण्याचे संकेत दास यांनी दिले आहेत.


    दास म्हणाले, की कोविड निर्बंध आणि बंदी असूनही व्यवसाय तगून आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जाते. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्था सुधारायला लागली होती; परंतु दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा संकट निर्माण केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थाही दबावातून सावरताना दिसत आहे. चांगला मॉन्सून ग्रामीण भागातील मागणीला चालना देईल अशी अपेक्षा आहे. उत्पादन क्षेत्रात मंदी असली आणि एप्रिलमध्ये वाहन नोंदणींमध्ये घट झाली असली तरी ट्रॅक्टरच्या विक्रीत वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँक 35 हजार कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज खरेदी करणार आहे. सिक्युरिटीजच्या खरेदीचा दुसरा टप्पा 20 मे रोजी सुरू होईल. आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. लवकरच प्राधान्य क्षेत्रात कर्ज व प्रोत्साहन देण्याची तरतूद लवकरच करण्यात येणार आहे. राज्यांची ओव्हरड्राफ्ट सुविधा आता 34 दिवसांवरून 50 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांना जादा काळ पैसा वापरता येतील. संपूर्ण पुरवठा शृंखला कृषी क्षेत्राच्या बळावर अवलंबून असते. रिझर्व्ह बँक आपली संसाधने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वच मोर्चांवर वापरणार आहे. रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम म्हणजेच एमएसएमई उद्योगांसाठी एक-वेळ पुनर्रचना सुविधा पुनरुज्जीवित केली आहे. स्मॉल फायनान्स बँका लहान मायक्रो फायनान्स संस्थांना 500 कोटींच्या मालमत्ता आकाराने कर्ज देऊ शकतात. त्याचप्रमाणे केवायसी सुविधादेखील 31 डिसेंबरपर्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये केवायसी हा व्हिडिओ स्वीकारला जावा. सामाजिक अंतर भानाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. लघु वित्त बँकांना मदत करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्सची घोषणा केली गेली आहे. हा निधी ग्राहकाला 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वापरता येतो. या योजनेंतर्गत लस उत्पादक, वैद्यकीय सुविधा, रूग्णालये आणि रूग्णांसह संस्थांना बँका मदत करू शकतात. या कर्जाची परतफेड किंवा मुदतपूर्तीपर्यंत प्राधान्य क्षेत्राचे वर्गीकरण मिळेल. या योजनेंतर्गत बँका कोविड लोन बुक तयार करतील.

अगोदरच काही धोरणात्मक निर्णय

कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी जोरदार बंदोबस्त सुरू केला आहे. पेमेंट बँकेची ठेव मर्यादा एक लाख रुपयांवरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाइन बँकिंगला चालना मिळेल तसेच आर्थिक व्यवस्थेतील सेटलमेंटचा धोका कमी होण्यास मदत होईल. रिझर्व्ह बँक बाजारातील रोखीची कमतरताही कमी करेल. डिजिटल पेटंट कंपन्यांसाठी एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधादेखील आहे. रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सुविधांची व्याप्ती वाढविली आहे. रिझर्व्ह बँक आपल्या विविध साधनांद्वारे बाजारात पुरेसे तरलता समर्थन पुरवत राहील. रिझर्व्ह बँकेने नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँक आणि सिडबीसारख्या वित्तीय संस्थांना पन्नास हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याअंतर्गत नाबार्डला 25 हजार कोटी रुपये, राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेला दहा हजार कोटी रुपये आणि सिडबीला 15 हजार कोटी रुपये देण्यात आले.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर रिझर्व्ह बँकेची मात्रा
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर रिझर्व्ह बँकेची मात्रा
https://cdn.dnaindia.com/sites/default/files/styles/full/public/2019/12/05/884004-rbi-policy.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_837.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_837.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content