$type=ticker$snippet=hide$cate=0

पोलिस अधिकार्‍यांचा धोबीघाट ; परमबीरांवर साडेतीन कोटींच्या वसुलीचा आरोप

मुंबई /प्रतिनिधी: राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी तडजोडीसाठी दबाव आणल्याचा आरोप करून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी स...


मुंबई /प्रतिनिधी: राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी तडजोडीसाठी दबाव आणल्याचा आरोप करून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सीबीआयकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे पांडे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. एवढेच नव्हे तर या प्रकरणात पांडे यांची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.  दरम्यान, एका बुकीने लेटरबाँब टाकून परमवीर यांनी तीन कोटी 45 लाख रुपयांची वसुली केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे पांडे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून परमवीर यांची चौकशी करण्यास नकार दिला आहे. 


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगण्यावरूनच पांडे यांनी सिंग यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनिल देशमुख प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर यांची चौकशी करण्यास समर्थ नसल्याचे पांडे यांनी सरकारला कळवले आहे. त्यांनी तसे सरकारकडे स्पष्ट केले आहे. सिंग आणि पांडे यांचे व्हॉट्सअ‍ॅप आणि फोनवरील संभाषण उघड झाले आहे. पांडे यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारविरोधातील तक्रार कोणत्याही परिस्थिती मागे घ्या, असे सांगत पांडे यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप सिंग यांनी या पत्रात केला आहे. एकटी व्यक्ती सगळ्या यंत्रणांच्या विरोधात लढू शकत नाही. जर कुणी लढलेच तर तो यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रार मागे घ्या, असे पांडे मला म्हणाले. त्यावर माझ्या वकिलाशी सल्लामसलत केल्याशिवया मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असे मी त्यांना सांगितले. तेव्हा असे न केल्यास तुम्हाला अनेक प्रकरणात अडकवले जाईल. राज्य सरकारकडून क्रिमिनल अफेन्स दाखल केल्या जातील, त्यामुळे तुम्हाला अनेक चौकशांना सामोरे जावे लागेल. जर तुम्ही तक्रार मागे घेतली, तर या प्रकरणात मी तुम्हाला सर्वोतोपरी मदत करेल. वरिष्ठ म्हणून माझा सल्ला ऐका. अन्यथा तुम्ही खूप अडचणीत याल, असा सल्ला पांडे यांनी मला दिला होता, असे सिंग या पत्रात म्हणतात.

पांडे यांनी 15 एप्रिल रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून मला बोलावून घेतले होते. पांडे यांच्याशी माझी जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर मी थेट माझ्या वकिलाकडे गेलो, असेही सिंग यांनी म्हटले आहे. सिंग यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट आणि फोनवरील संभाषणाच्या आधारे सीबीायकडे पांडे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय पांडे यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे सिंग यांच्या विरोधात एका पाठोपाठ एक लेटरबॉम्ब समोर येत आहेत. क्रिकेट बुकी सोनू जलाल याने परमबीर यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीर यांनी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालने केला आहे. जलानने याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. जलाल याने लिहिलेल्या पत्रामध्ये परमबीर यांनी 2018 मध्ये तीन कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली होती, असा आरोप केला आहे. मोक्का ा गुन्हा लावून खंडणी वसूल केल्याचे या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या पत्रामध्ये प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर यांच्यावर वसुलीचे आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई करा; पण आम्हाला न्याय द्या, असे पत्रात म्हटले आहे.

सीआयडीकडे तपास वर्ग

या प्रकरणाची गृहखात्याने तत्काळ दखल घेतली असून पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता परमबीर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौकशीसाठी दुसरा अधिकारी

पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सिंग यांची चौकशी करण्यास पांडे यांनी असमर्थता दाखवली. ठाकरे सरकारने सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पांडे यांच्याकडे परमबीर यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती; मात्र आता पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल.



Name

] ब्रेकिंग,9,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,1,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,6,Latest News Maharashtra satara,12,Latest News Maharashtra sangli,1,Latest News Maharashtra satara,6,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,208,अहमदनगर,11177,औरंगाबाद,381,क्रीडा,681,दखल,773,देश,4653,नाशिक,836,पुणे,925,बीड,1452,बुलडाणा,46,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17931,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,122,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,181,महाराष्ट्र,15319,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4316,विदेश,666,संपादकी,2,संपादकीय,1693,सातारा,3224,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पोलिस अधिकार्‍यांचा धोबीघाट ; परमबीरांवर साडेतीन कोटींच्या वसुलीचा आरोप
पोलिस अधिकार्‍यांचा धोबीघाट ; परमबीरांवर साडेतीन कोटींच्या वसुलीचा आरोप
https://img.theweek.in/content/dam/week/news/biz-tech/param-bir-singh-amey.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_978.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/05/blog-post_978.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content