$type=ticker$snippet=hide$cate=0

जिल्ह्यातील 9 हजार मुले कोविड संकटात ; जिल्हा रग्णालयात 100 खाटांचा स्वतंत्र विभाग होणार

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्ह्यात 18 वर्षाआतील तब्बल 9 हजार मुले-मुली कोविड संकटात आहेत. मे महिन्यातील 89 हजार पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येशी हे प...

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्ह्यात 18 वर्षाआतील तब्बल 9 हजार मुले-मुली कोविड संकटात आहेत. मे महिन्यातील 89 हजार पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येशी हे प्रमाण 11 टक्के आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र विभाग व त्यात 12 खाटांचा विशेष आयसीयु विभाग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.


    दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात 18 वर्षाआतील 8881 मुले कोरोनाबाधित असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी राज्याच्या आरोग्य विभागाने खुलासा देताना, महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही, असे स्पष्ट केले होते. पण यात नगर जिल्ह्यात 9416 रुग्ण 18 वर्षाआतील असल्याचेही नमूद केले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील 18 वर्षाआतील बालकांची कोविड स्थिती व्हीडीओ संदेशाद्वारे स्पष्ट केली व त्यात त्यांनी जिल्ह्यात असे 9 हजारावर रुग्ण असल्याचेही स्पष्ट केले.


 


जिल्ह्यात चिंतेची बाब-डॉ. भोसले


डॉ. भोसले यांनी यासंदर्भात सांगितले की, मे महिन्यात 89 हजार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळले. त्यात 18 वर्षाआतील रुग्णांची संख्या 9 हजार आहे. एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 11 टक्के आहे. त्याचा सीएफआर रेट कमी असला तरी 18 वर्षाखालील बालकांमधील कोरोना बाधा ही चिंतेची बाब आहे, असे सांगून ते म्हणाले, जिल्हा शासकीय रुग्णालयात बालकांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र विभाग केला जाणार आहे, यात 12 खाटांचा आयसीयु हा विशेष विभाग असणार आहे. टास्क फोर्सचीही निर्मिती आम्ही केली असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून रोज 20 हजारजणांचे टेस्टिंग होत आहे व त्याचा पॉझिटीव्हीटी रेट 4 टक्के येत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध जसे शिथील होतील, तशी ही संख्या वाढणार आहे. उद्योगधंदे सुरळीत सुरू व्हावेत म्हणून आपण लॉकडाऊन शिथील केले आहे. पण नागरिकांनी मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्स यांचे किमान येणार्‍या सहा महिन्यात काटेकोर पालन केले तरच तिसर्‍या लाटेपासून बचाव होऊ शकतो, असे सांगून ते म्हणाले, एका महिन्यात 18 वर्षाआतील 9 हजार बालके कोरोनाबाधित सापडले असले तरी त्यातील किती गंभीर आहेत, याची तपासणी अद्याप केलेली नाही. मार्च-एप्रिल-मे महिन्यातील लग्न समारंभांतील उपस्थिती तसेच बाहेर खेळायला जाण्यामुळे मुलांमध्ये ही बाधा झाली असावी. त्यामुळे मुलांनीही घराबाहेर पडू नये तसेच मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझेशनचे नियम पाळले पाहिजे, कोरोनाचा स्ट्रेन बदलत असल्याच्या टास्क फोर्सच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन नियम पालन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.


--


चौकट


 


महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये


कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही


 


आरोग्य विभागाचा खुलासा


 


अहमदनगर/प्रतिनिधी (मुंबई) : महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.


राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसर्‍या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.


एकूण कोरोनाबाधीतांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण असे आहे- नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे- शून्य ते पाच- 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे- 2.4 टक्के, बारा ते सतरा- 4.1 टक्के व एकूण 7.8 टक्के. नोव्हेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे- 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे- 2.1 टक्के, बारा ते सतरा वर्षे- 3.5 टक्के व एकूण 6.9 टक्के). डिसेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे-1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे- 1.9 टक्के, बारा ते सतरा वर्षे- 3.3 टक्के व एकूण 6.3 टक्के). जानेवारी 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे- 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे-1.7 टक्के, बारा ते सतरा वर्षे- 3.2 टक्के व एकूण 6.0 टक्के). फेब्रुवारी 2021 (शून्य ते पाच वर्षे- 1.18 टक्के, सहा ते अकरा वर्षे- 2.00 टक्के, बारा ते सतरा वर्षे- 4.08 टक्के व एकूण 7.26 टक्के). मार्च 2021 (शून्य ते पाच वर्षे-1.10 टक्के, सहा ते अकरा वर्षे-2.04 टक्के, बारा ते सतरा वर्षे-3.64 टक्के, एकूण 6.78 टक्के). एप्रिल 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे- 1.42 टक्के, सहा ते अकरा वर्षे-2.62 टक्के, बारा ते सतरा वर्षे-4.34 टक्के, एकूण 8.38 टक्के) या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे.


 


नगर जिल्ह्यात 9416


अहमदनगर जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती काहीशी अशीच आहे. मार्च 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 188 रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या 1.01 टक्के होते, सहा ते दहा वर्षे वयोगटातील 270 रुग्ण, एकूण प्रमाण 1.45 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 1173 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.28 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 1631 रुग्ण एकूणात प्रमाण 8.74 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 18 हजार 669). एप्रिल 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 757 रुग्ण, एकूण रुग्णांच्या 0.98 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1510 रुग्ण, एकूणात प्रमाण 1.95 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 5340 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.90 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 7607 रुग्ण एकूणात प्रमाण 9.83 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 77 हजार 344). मे 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1076 रुग्ण एकूण रुग्णांच्या 1.33 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1918 रुग्ण, एकूणात प्रमाण 2.37 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 6422 रुग्ण, एकूणात प्रमाण 7.95 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 9416 रुग्ण एकूणात प्रमाण 11.65 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 80 हजार 785). यावरून हे दिसून येते की 18 वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जिल्ह्यातील 9 हजार मुले कोविड संकटात ; जिल्हा रग्णालयात 100 खाटांचा स्वतंत्र विभाग होणार
जिल्ह्यातील 9 हजार मुले कोविड संकटात ; जिल्हा रग्णालयात 100 खाटांचा स्वतंत्र विभाग होणार
https://www.paho.org/sites/default/files/styles/flexslider_full/public/2020-03/blue-covid-banner.jpg?h=96546727&itok=xDLAoRJF
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/9-100.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/9-100.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content