$type=ticker$snippet=hide$cate=0

पवार-फडणवीस यांची भेट आणि त्यामागचं इंगित

कुणी कुणाला कधी भेटावं, त्यात काय चर्चा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. सामान्य माणसांच्या भेटीची चर्चा होत नाही; परंतु राजकीय नेत्यां...

कुणी कुणाला कधी भेटावं, त्यात काय चर्चा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. सामान्य माणसांच्या भेटीची चर्चा होत नाही; परंतु राजकीय नेत्यांच्या भेटी त्यांच्यापुरत्या, त्यांच्या पक्षापुरत्या मर्यादित राहत नाहीत. जनता अशा भेटीवर चर्चा करीत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या न झालेल्या भेटीचं कवित्व आता चर्चिलं जात आहे. 


सध्या देशभर भाजपविरोधी वातावरण आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीतून लगेच राजकीय अर्थ काढणं चुकीचं असलं, तरी दोन मुरब्बी राजकारण्यांच्या भेटीत केवळ तब्येतीची चौकशी आणि हवापाण्याच्या गप्पा नक्कीच झाल्या नसतील. पवार-फडणवीस भेटीअगोदर भारतीय जनता पक्षाच्या बैठकीतही पवार यांच्या भेटीचा कानोसा लागला नाही, यावरून फडणवीस यांनी ही भेट किती गोपनीय ठेवली होती, हे लक्षात यायला काहीच हरकत नाही. पवार आजारातून उठल्यानंतर त्यांची भेट घेणार्‍यांत खासदार संजय राऊत, संभाजीराजे आणि फडणवीस या तिघांचाच समावेश आहे. त्यातही राऊत-पवार यांच्यात वारंवार भेटी होत असतात, त्यामुळं त्यांच्या भेटीची फारशी चर्चा होत नाही. संभाजीराजेही मराठा आरक्षणाच्या निमित्तानं भेटले. त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यानं पवार यांच्या भेटीविषयीची फारशी चर्चा होऊ शकली नाही. त्यातही त्या दोघांची भेट अवघी 13 मिनिटांची होती. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यात ज्या पवार यांचा मोठा वाटा आहे, त्या पवार यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले नाहीत, तर स्वतः पवार हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले. बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेते पवार यांच्या भेटीसाठी गेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अन्य नेते पवार यांच्या तब्येतीची चौकशी करीत असताना राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना ती करावीशी वाटली नाही. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्यानं आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करणारे, सचिन वाझे प्रकरणात थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यापर्यंत प्रकरण लावून धरणारे फडणवीस पवार यांची भेट घेतात. त्यातून एक वेगळा संदेश जातो. महाविकास आघाडीतील नेते पवार यांची भेट घेत नसताना फडणवीस आवर्जून भेट घेतात. त्यातून राजकारण करताना विरोध करणं आणि ज्येष्ठ नेत्यांच्या आजारपणात माणुसकीच्या भावनेतून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून भेटीला जाणं ही आपली संस्कृती असल्याचं फडणवीस यांनी आपल्या कृतीतून दाखवून ठाकरे यांच्यापेक्षा आपण वेगळं आहोत, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

पवार यांनी स्वतः होऊन घेतलेल्या भेटीत सरकार चालविण्याची जबाबदारी एकट्या शिवसेनेची नाही, असा थेट इशारा ठाकरे यांनी दिला, त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव असताना फडणवीस-पवार यांची भेट झाल्यानं आणि त्याबाबत पवार काहीच बोलत नसताना फडणवीस यांनीच भेटीचा फोटो शेअर करण्यात वेगळाच अर्थ आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्या अहमदाबादेतील कथित भेटीचं वृत्त आल्यानंतर स्वतः पवार यांनी त्याबाबत काहीच भाष्य केलं नाही. शाह यांनी मात्र या भेटीचं गूढ आणखी वाढविलं. या परिस्थितीत फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतल्यानं शिवसेना आणि काँग्रेसवर दबाव वाढू शकतो. अगोदर न ठरलेल्या वा तशी कोणतीही शक्यताही नसताना अनपेक्षितरित्या घडलेल्या या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सचिन वाझे प्रकरणापासून महाराष्ट्रातील राजकारण पवार विरुद्ध फडणवीस असं झालं असताना या दोघांची भेट होणं हा राजकीय विश्‍लेषकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. फडणवीस थेट ’सिल्व्हर ओक’ला गेले. त्यांनी स्वत: ट्वीटमध्ये ही केवळ औपचारिक भेट होती असं म्हटलं आहे. म्हणजेच त्यातून वेगळा राजकीय अर्थ काढू नका असं त्यांना सुचवायचं आहे; पण महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची स्थिती बघता, या भेटीकडं राजकीय चष्म्यातून न पाहणं शक्य नाही. अजूनही देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असताना या दोघांत चर्चा होणं इतरांच्या कुतुहलाचा विषय आहे. दुसरीकडं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात राज्य सरकारला न्यायालयीन लढाईत अपयश आलं आहे. त्यामुळं या दोन्ही समाजांमध्ये असंतोष आहे. पदोन्नतीतल्या आरक्षण निर्णयावरूनही आघाडीतल्या पक्षांमध्येच बिनसलं आहे. काँग्रेसनं सरकारला अल्टिमेटम दिला आहे. संभाजीराजे यांनीही सात जूनची डेडलाईन दिली आहे. या सामाजिक गणितांमुळं राजकीय गणितंही बदलू शकतात. या पार्श्‍वभूमीवरही ही भेट पाहायला हवी. सोबत काहीच दिवसांपूर्वी ’लोक झोपलेले असताना महाराष्ट्राचं सरकार बदलेल,’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हणून एक वातावरणनिर्मिती केली आहेच. आम्ही पाडण्यापेक्षा हे सरकार त्याच्यातल्या विरोधाभासांनी पडेल असं फडणवीस सातत्यानं म्हणत आले आहेत; पण भाजपचे पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्यामुळं पाटील यांच्या सूचक विधानाकडं आजच्या भेटीनंतर पुन्हा लक्ष जात आहे. अजित पवार, जयंत पाटील यांनी काही निर्णयांवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उघड नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य सचिवांची नियुक्ती, जलसंपदा विभागाच्या फाईली अडवून ठेवणं, जलसंपदा खात्याच्या सचिवांना मुदतवाढ नाकारणं यामुळं दोन्ही पक्षांतील दरी वाढतं आहे. शिवाय संजय राठोड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली भूमिका आणि अनिल देशमुख प्रकरणात शिवसेनेनं घेतलेली भूमिका यावरून या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अढी आहेच. त्यामुळंच फडणवीस यांची भेट घेऊन पवार एका प्रकारचा दबाव वाढवत आहेत का, हा प्रश्‍न आहे.

मोदी यांनी पवारांना राजकीय गुरू म्हणणं, पवारांना मोदी यांनी भेट देणं, पवार यांच्या सूचनांचा विचार करणं आदी बाबी पाहता भाजप-राष्ट्रवादी एकमेकांवर कितीही टीका करीत असले, तरी दोन्ही पक्षांचे संबंध तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा प्रकारातील आहेत. 2014 मध्ये जेव्हा भाजप सत्तेपासून थोडा लांब होता, तेव्हा शिवसेनेवरचा दबाव वाढवत पवार यांनी भाजपाला पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळं आता पुन्हा एकदा शरद पवार शिवसेनेला एक संदेश देऊ पाहात आहेत का, असा सवाल केला जात आहे. या भेटीनंतर लगेचच काही निश्‍चित राजकीय हालचाली घडतील, असं म्हणता येत नसलं, तरीही पवार आणि त्यांच्यासारखं बेरजेचं राजकारण करायला फडणवीस तयार आहेत का, असा प्रश्‍नही आहे. पवार यांनी कायम बेरजेचं राजकारण केलं आणि त्यासाठी राजकारणात कुणाला कायमचा शत्रू मानलं नाही असं म्हटलं जातं. त्यामुळंच ते विविध आघाड्या आणि राजकीय शक्यता प्रत्यक्षात आणू शकले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कायम शत्रुत्वाची नाही. त्यामुळं फडणवील आणि पवार यांच्या भेटीकडंही त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. फडणवीसही त्याच दिशेनं जाऊन या भेटीनंतर आपण सगळ्या प्रकारच्या बेरजेला तयार आहोत, आपल्यात वितुष्ट नाही असा संदेश देऊ पाहत आहेत का, ही पण शक्यता अजमावली जाते. फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस केली असेल; पण त्याशिवाय काही मुख्य मुद्द्यांवर चर्चा नक्की झाली असेल. मराठा आरक्षणावर पुढची प्रक्रिया काय असू शकते, संभाजीराजे ज्या पद्धतीनं आक्रमक झाले. ओबीसींच्या आरक्षणाचा जो निकाल आला आहे आणि पदोन्नतीच्या आरक्षणात काँग्रेस जी आग्रही भूमिका घेतं आहे, याबद्दल नक्की बोलणं झालं असेल. 


Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11716,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,808,देश,4760,नगर,4,नाशिक,850,पुणे,1047,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18666,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16232,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4535,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1768,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पवार-फडणवीस यांची भेट आणि त्यामागचं इंगित
पवार-फडणवीस यांची भेट आणि त्यामागचं इंगित
https://1.bp.blogspot.com/-yfioFtBCg3I/YLYsEQ-aTLI/AAAAAAABqf4/jo-7Czj_C3owtEjDjXvZIk4fZTxUUdXNACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-yfioFtBCg3I/YLYsEQ-aTLI/AAAAAAABqf4/jo-7Czj_C3owtEjDjXvZIk4fZTxUUdXNACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_02.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_02.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content