$type=ticker$snippet=hide$cate=0

ड्रॅगनचा कावेबाजपणा

जीवनात कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हटलं जातं. मानवी जीवनातील हे कटूसत्य राष्ट्रांच्या बाबतीतही खरं असतं. गोड बोलत झुलवत ठेवून प...

जीवनात कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हटलं जातं. मानवी जीवनातील हे कटूसत्य राष्ट्रांच्या बाबतीतही खरं असतं. गोड बोलत झुलवत ठेवून पाठीत खंजीर खुपसणारी विकृती जगात असते. चीनमध्ये ही विकृती पुरेपूर भिनली आहे. मदत करण्याच्या नावाखाली मांडलिक बनवायचं, कौतुक करताना दुसरीकडं तिरकस चाली खेळायच्या, ही चीनची व्यूहनीती असते. तिचा भारताला वारंवार प्रत्यय येत आहे. 


शेजारी कोण असावा, हे आपल्याला ठरविता येत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. जे माणसाच्या बाबतीत तेच देशांच्या बाबतीतही खरं असतं. काही माणसांचं बोलणं आणि वागणं यांच्यात एकवाक्यता नसली, तर आपण त्यावर विश्‍वास ठेवीत नाही. चीनची उक्ती आणि कृती नेहमी वेगवेगळी असते. त्यामुळं त्याच्या कोणत्याही भुलभुलैय्यांना बळी पडायचे नसतं. चीनचं बोलणं आणि वागणं यातही फरक असतो. त्यामुळं त्यानं भारताबरोबर कितीही मैत्रीचा दावा केला, हात पुढं केला, तरी आपण सावधच राहायचं असतं. अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर झुलत असताना डोकलाममध्ये चीन घुसखोरी करीत होता. तीन महिने आपल्याला ही घुसखोरी मोडीत काढण्यात गेली. लडाखमध्ये केलेलं अतिक्रमण हटविण्यासाठी एक वर्ष केलं. त्यात आपल्या सैनिकांचा बळी जावा लागला. आताही ब्रिक्स परिषदेत भारताचं चीन कौतुक करीत असताना, भारताने केलेल्या सूचना उचलून धरीत असताना भारताच्या सीमेजवळ पायाभूत सुविधा निर्माण करायच्या, हा चीनचा कुटील डाव आहे. अरुणाचल प्रदेशात भारताच्या हद्दीत एक गाव वसविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही त्याच भागात चीन पायाभूत सुविधा निर्माण करून लष्कराच्या हालचाली गतीमान कशा करता येतील, याची व्यूहरचना करीत आहे. पाकिस्तानला मदत करण्याच्या नावाखाली भारतावर अंकुश ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर चीन नाराज झाला आहे. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याने पाकिस्तानच्या मदतीने लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. आता श्रीनगर आणि लेहपासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर शिनजियांग प्रांतात दहा हजार पाचशे फुटांपेक्षा जास्त उंचीवर सर्वांत मोठं विमानतळ बांधलं आहे. या विमानतळावर चीननं आपलं लढाऊ विमान आणि वाहतूक विमान उतरवून त्याची चाचणी केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात चीननं पाकिस्तानला आश्‍वासन दिलं होतं, की हे विमानतळ एका वर्षात पूर्ण केलं जाईल, जे गिलगिट-बाल्टिस्तानमधील भारताच्या कोणत्याही हालचालीचा प्रतिकार करेल. गिलगिट बाल्टिस्तान हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. तिथं चीनला प्रचंड विरोध होत आहे. पाकिस्तानविरोधातही या भागात कायमच नाराजी असते. पाकिस्तानला चीननं दिलेल्या कर्जाच्या बदल्यात या भागातील खनिज संपत्ती आपल्याला मिळावी, असा चीनचा प्रयत्न आहे. पाकिस्तानविरोधात तिथं काही बंड झालं, तर ते मोडीत काढता यावं, यासाठी शिनजियांग प्रांतातील विमानतळ असल्याचं सांगितलं जात असलं, तरी प्रत्यक्षात त्याचा वापर भारताविरोधात होण्याची जास्त शक्यता आहे. हे विमानतळ पाकव्याप्त काश्मीरच्या अगदी जवळ आहे. येथून चीन केवळ पाकव्याप्तच काश्मीरवरच नव्हे, तर लडाख आणि उत्तर-पश्‍चिम भारतावरही सहज आक्रमण करू शकतो. चीननं हे विमानतळ ताशकरगन इथं बनवलं आहे. ते धोरणात्मक दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. येथून पाकिस्तान सीमा म्हणजेच खुंजेराब केवळ 120 किलोमीटर अंतरावर आहे आणि सर्वांत जवळच चीनचे प्रमुख विमानतळ काशगर येथून 230 किलोमीटर अंतरावर आहे. ताशकरगन हे चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ आहे आणि ’चिनी इकॉनॉमिक कॉरिडॉर’वरील काराकोरम महामार्गावर आहे. या पार्श्‍वभूमीवर या विमानतळाचं भौगोलिक महत्त्व लक्षात यायला हरकत नाही. 2020 पासून जेव्हा भारतानं रेडिओ प्रसारणात गिलगिट-बाल्टिस्तानची हवामानविषयक माहिती देशाच्या विविध भागांसह प्रसारित करण्यास सुरुवात केली, तेव्हा चीननं पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी या विमानतळाचं काम वेगात केलं. या विमानतळापासून लेह फक्त 455 किलोमीटर आणि श्रीनगर फक्त 413 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे इथून चिनी लढाऊ विमानं भारतीय सैन्याच्या कोणत्याही कारवाईला सहज लक्ष्य करू शकतात. या उंचीवर कमी हवेच्या घनतेमुळं, लढाऊ विमानानं पूर्ण शस्त्रं घेऊन लांबपर्यंत हल्ले करणं शक्य नाही, म्हणून जवळपास एअरबेस ठेवल्यानं हल्ल्याला मदत होते. इथली हवाई पट्टी 3800 मीटर लांबीची आणि रुंदी 45 मीटर आहे. त्यामुळं मोठी विमानंदेखील इथं सहज उतरू शकतात. चीननं अलीकडंच आपलं सर्वांत आधुनिक लढाऊ जे-20 आणि सर्वांत मोठं वाहतूक विमान वाय -20 इथं उतरवलं होतं. हे विमानतळ सध्याच्या होतान, काश्गर आणि न्यागरी-गुरगुन्सा विमानतळांपेक्षा भारताच्या अगदी जवळ आहे. फक्त पन्नास हजार लोकसंख्या असलेलं ताशकरगन हे एक लहान शहर आहे. ते पाकव्याप्त काश्मीरच्या अगदी जवळ असल्यानं, चीन त्याला मोठा सैन्य तळ म्हणून विकसित करीत आहे. यामागील चीनचा हेतू म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून कोणतीही कारवाई होण्याची शक्यता ओळखणं, याशिवाय अफाट खनिज संपत्ती लुटणं असा आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सोनं, युरेनियम व्यतिरिक्त गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये मॉलीबडेनमचा साठा आहे. मालिडेनम एक दुर्मिळ खनिज आहे, ज्याचा वापर टाकी तसंच अंतराळ विज्ञानासाठी अत्यंत मजबूत स्टील बनविण्यासाठी केला जातो. पाकव्याप्त काश्मीरमधील हुंझा नगरमध्येही युरेनियमचा साठा आहे. पाकिस्ताननं येथील खाणी सुमारे 2000 चिनी कंपन्यांना उत्खनानासाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. याचा अर्थ मातीमोल भावानं खनिजं लुटून त्यातून स्वतः चं हीत साधण्याचा चीनचा प्रयत्न आहे. गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. तणाव निवळण्यासाठी लष्करी पातळीवरील चर्चेत सैन्य माघारीबाबतही निर्णय झाला. लडाख पूर्व भागात चीननं माघार घेतली असल्याचं म्हटलं जात असलं, तरी ईशान्य भारताच्या सीमेजवळ हालचाली सुरू आहेत. चीननं अरुणाचल सीमेपर्यंत येण्यासाठी एक महामार्ग बांधला आहे. तिबेटच्या दक्षिण पूर्व भागाला हा महामार्ग जोडला जाणार आहे. हा महामार्ग भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. या महामार्गात दोन किलोमीटर लांबीचा बोगदादेखील आहे. हा महामार्ग जगातील सर्वांत खोल दरी घाट असलेल्या जांग्बो ग्रँडपासून सुरू होत असून बाइबंग काउंटीमध्ये संपतो. हा भाग अरुणाचल प्रदेशमधील बिशिंग गावातील सीमेजवळ आहे. बिशिंग गाव अरुणाचल प्रदेशच्या गेलिंग सर्कल भागात येतं. चीन भारताच्या अरुणाचल प्रदेशवर दावा सांगतो. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून वारंवारपणे करण्यात येतो. हा महामार्ग चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. या महामार्गाद्वारे चीन तिबेटमधील इतर शहरांना जोडणार आहे. हा महामार्ग सुरू झाल्यामुळं तिबेटमधील शहरी भागातील निंगची आणि सीमेजवळील गावांमधील अंतर कमी होणार असून आठ तासांमध्ये हे अंतर पार करता येणार आहे. त्याशिवाय चीनच्या यारलुंग जांग्बो जलविद्युत प्रकल्पात हा महामार्ग मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. तिबेटमधील यारलुंग जांग्बो नदी ही भारतात प्रवेश केल्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी बांगला देशामध्ये प्रवेश करते. या महामार्गाचं काम 16 मे रोजी पूर्ण झालं होतं. हा महामार्ग निर्धारीत केलेल्या मुदतीच्या 228 दिवसांआधीच बांधून पूर्ण झाला. याआधी चीननं भारताच्या सीमेलगतच्या मेडोग आणि निंगची दरम्यान 2114 मीटर लांबीचा बोगदा आणि 67.22 किमीचा रस्तादेखील तयार केला आहे. दुसरीकडं युद्ध सरावाच्या नावाखाली चीननं मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं आणि सैन्यांची जमवाजमव सुरू केली आहे. अशातच मागील काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांची हालचाल वाढली आहे. चीनकडून चर्चेच्या माध्यमातून तणाव निवळला जाऊ शकतो, असं म्हटलं जात असताना दुसर्‍या बाजूला सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या या कावेबाजपणाला लक्षात घेऊन भारतीय लष्कर आणि हवाई दलही सतर्क झालं आहे. चीनच्या जे-10, जे-11 यासारख्या लढाऊ विमानांनी सीमानजीकच्या भागातील आकाशात दिसत आहे. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या मिग-19, सुखोई एसयू 30, एमकेआय आणि ’टँक किलर’अपाचे यांनीही आकाशात गस्त घालणं सुरू केलं आहे.


Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11716,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,808,देश,4760,नगर,4,नाशिक,850,पुणे,1047,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18666,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16232,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4535,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1768,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ड्रॅगनचा कावेबाजपणा
ड्रॅगनचा कावेबाजपणा
https://1.bp.blogspot.com/-fS_RzY1s8sM/YLoZW_oNysI/AAAAAAABqjo/MBH_Rtd7nCY0mLf-UKp9qTvT9CKhE8-rwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-fS_RzY1s8sM/YLoZW_oNysI/AAAAAAABqjo/MBH_Rtd7nCY0mLf-UKp9qTvT9CKhE8-rwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_05.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_05.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content