$type=ticker$snippet=hide$cate=0

काँग्रेसची फरफट

देशात काँग्रेसची सत्ता अवघ्या तीन राज्यांत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत भागीदार आहे; परंतु काँग्रेसला स्वतः च्या ताब्याती...


देशात काँग्रेसची सत्ता अवघ्या तीन राज्यांत आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत भागीदार आहे; परंतु काँग्रेसला स्वतः च्या ताब्यातील सत्ता नीट अंतर्विरोधामुळं टिकविता आली नाही. दोन किंवा अधिक पक्षांची सत्ता असताना तर त्यात समन्वय असावा लागतो. काँग्रेसला समन्वयानं राजकारण करता येत नाही. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील सत्ता काँग्रेसनं गमाविली असली, तरी काँग्रेसला अजूनही शहाणपण आलं नाही. सत्तेत एकापेक्षा अधिक पक्ष सहभागी झाले असतील, तर सत्ता टिकविण्याची जबाबदारी सर्वंच पक्षांची असते. 

    


महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेसची सातत्यानं फरफट होत आहे. काँग्रेसची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. आपल्याला विश्‍वासात घेतलं जात नसल्याचं शल्य काँग्रेसजणांना बोचतं आहे. या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असलं, तरी ते काँग्रेसइतकंताणलेलं नाही. काँग्रेस एकजीवानं सत्तेत सहभागी होत नाही. काँग्रेसच्या नेत्यांत एकवाक्यता नाही. माध्यमांतही चांगल्या कामानं काँग्रेसचं नाव घेतलं जात नाही. बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणत्याही मंत्र्यांच्या खात्याच्या चांगल्या कामाची कुठंही नोंद दिसत नाही. काँग्रेसच्या नेत्यांत समन्वय नाही आणि तेच सरकारमध्ये समन्वय नसल्याची आणि विश्‍वासात घेतलं जात नसल्याची ओरड करतात. उलट, काँग्रेसचेच नेते आपल्या सहकार्‍यांना आणि सरकारमधील प्रमुखांना विश्‍वासात न घेताच परस्पर घोषणा करून टाकतात. त्यात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा समावेश आह.े सरकार चालविण्याची जबाबदारी सत्तेत सहभागी झालेल्या तीनही राजकीय पक्षांची असताना काँग्रेस मात्र वारंवार आम्हाला गृहीत धरून नका, असं सांगत आहेत. आता काँग्रेसच्या हातचं हे हत्यारही निष्प्रभ ठरलं आहे. थोरात यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन गैरसमज दूर करायचं आणि नेत्यांनी पुन्हा गैरसमजातून वाद ओढवून घ्यायचा, असं चाललं आहे. कोरोनाबाबतचे सर्व विषय जरी आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित असले आणि त्याबाबतचे निर्णय जरी आरोग्यमंत्री राजेश टोपे जाहीर करीत असले, तरी एकूणच कोरोनाबाबत सुरुवातीपासून मुख्यमंत्री लक्ष घालीत असल्यानं टोपे महत्त्वाच्या निर्णयाचे सूतोवाच करतात आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं जाहीर करतात. असा समंजसपणा दाखविला, तर फारसे वाद होत नाहीत. खरंतर टोपे यांना जास्त श्रेय घेता आलं असते; परंतु तसं ते करीत नाहीत. राज्यात मदत व पुनर्वसन खात्याला अलिकडच्या काळात फार महत्त्व आलं आहे. अगदी दहावी, बारावीच्या परीक्षेपासून लोकल सुरू करण्यापर्यंतचे विषय त्यात यायला लागले आहेत. असं असलं, तरी राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आहेत. त्यांना विश्‍वासात घेऊन काँग्रेसच्या मंत्र्यांनी कारभार करायला हवा; परंतु तसं न करता काँग्रेसचं वागणं मात्र नाचता येईना अंगण वाकडं अशा प्रकारातील आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचं तत्वतः ठरलं होतं; परंतु त्याअगोदर पंधरा दिवस टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. या पार्श्‍वभूमीवर अचानक टाळेबंदी जवळपास पूर्ण उठवण्याचा निर्णय वडेट्टीवार यांनी कसा जाहीर केला, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी ’लॉक’ केला. त्याचं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टाळेबंदी करायची असली, आणि उठवायची असली, तरी 48 तास अगोदर नागरिकांना पूर्वकल्पना द्यायची असते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची मंत्र्यांना कल्पना नसावी. त्यामुळं त्यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली. अगोदर ठरल्याप्रमाणं ठाकरे त्याची घोषणा करून नंतर सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार होती. वडेट्टीवार यांनी मात्र श्रेयवादाच्या नादात अगोदरच घोषणा केली. त्यामुळं काँग्रेस या सरकारमध्ये वैतागली आहे का? आणि वडेट्टीवार यांचे परस्पर अनलॉकचा निर्णय जाहीर करणं हे काँग्रेसचं बंड आहे का, असे प्रश्‍न उपस्थित होतात. एकीकडं काँग्रेसचे नेते बंडाची भाषा करीत असले, तरी दुसरीकडं मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसच्या अध्यक्ष  सोनिया गांधी यांच्यांशी चांगला संवाद आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला बाजूला टाकलं जातं. महत्वाच्या निर्णयांतून बेदखल केलं जातं, या प्रकारचं असमाधान यापूर्वीही या पक्षाच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी व्यक्त केलं आहे; पण गेले काही दिवस काँग्रेसच्या नेत्यांकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक पवित्रा जाहीरपणे घेतला जातो. याचा अर्थ काँग्रेस काही संदेश देऊ पाहतं आहे का? हे असंच चालू राहिलं, तर टोकाची भूमिका घेऊन सरकार धोक्यात आणू शकतं का? असे प्रश्‍न निर्माण होतात. त्याची उत्तरं नकारार्थी आहेत; परंतु सत्तेत आम्हीही सहभागी आहोत, हे जाणवून देण्यासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांना अशी आक्रस्ताळी भूमिका घ्यावी लागते. टाळेबंदीच्या घोषणेनंतर सरकारनं निर्णयाला स्थगिती दिली, त्यानंतर वडेट्टीवार यांची बाजू सांभाळण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली. वडेट्टीवार आणि काँग्रेसनं आता सारवासारवीची भाषा केली असली, तरीही ती केवळ अनवधानानं केलेली चूक नाही असं म्हटलं जात आहे. कोरोनाच्या महाराष्ट्रातल्या व्यवस्थापनाची सूत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं आहेत. तेच सगळे निर्णय जाहीर करतात; पण त्यामुळंच केवळ ठाकरे यांच्या भोवतीच सगळी सूत्रं केंद्रीत झाली आहेत का, असा प्रश्‍नही विचारला जातो. त्या श्रेयामध्ये काँग्रेसलाही वाटा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी उठवण्याची घोषणा करण्यापूर्वीच वडेट्टीवारांनी ती केली. यापूर्वीही पहिल्या लाटेनंतर मुंबईच्या लोकल सर्वांना खुलं करण्याबाबतचा एक निर्णय वडेट्टीवार यांनी अगोदरच माध्यमांमध्ये जाहीर केल्यानंतर अशी स्थिती आली होती. यापूर्वीही काँग्रेसच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटी मिळत नाहीत, त्यांची कामं होत नाहीत, अशा  नाराजीच्या बातम्या आल्या होत्या. वडेट्टीवारांच्या घटनेवर स्पष्टीकरण देताना थोरात यांनी विसंवाद नाही असं म्हटलं असलं, तरी तो चर्चेतून दूर करता येईल असं म्हटलं. याचा अर्थ विसंवाद आहे, असा होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत जर काही विसंवाद दिसला असेल, तर एकदा मुख्यमंत्र्यांसोबत जर त्यांची भेट घालून दिली आणि व्यवस्थित पद्धतीनं चर्चा झाली, तर सगळे प्रश्‍न संपू शकतात. आम्ही लवकरच तशा प्रकारची भेट घेऊ, असं थोरात म्हणाले. याचा अर्थ असाही होतो, की विसंवाद नाही हे काँग्रेसचे नेते स्पष्टपणे नाकारत नाहीत. काँग्रेसचे अन्य नेतेही सरकारविरोधात वा सरकारमधल्या सहकारी पक्षाविरोधात आक्रमक होतात. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी काही दिवसांपूर्वी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूनं भूमिका घेतली. भाजपसोबत सरकार असल्यापासून शिवसेनेचा या प्रकल्पाला असलेला हा विरोध जगजाहीर आहे. मग काँग्रेसनं अचानक वेगळी भूमिका का घ्यावी? हा सरकारला संदेश होता की शिवसेनेला? देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट काँग्रेसच्या पचनी पडली नाही आहे. त्यामुळंच हे सरकार चालवणं केवळ आमची जबाबदारी नाही हा गर्भितार्थ स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाला पाठीमध्ये सुरा खुपसण्याची सवय नाही. त्यामुळं सरकार पाच वर्षं टिकावं हीच आमची भूमिका आहे, असं सांगायचं आणि दुसरीकडं सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा द्यायचा, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. लोककल्याणाचं काम व्हावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम चालावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळं आम्ही जे लढू ते समोरून लढू. पाठीमागून सुरा खुपसायची सवय आम्हाला नसल्यानं सरकार टिकवायचं, की नाही हे त्यांच्या हातात आहे. कोणाला जबरदस्तीनं धरून-बांधून आणून तर आम्ही सरकार बनवलं नाही, असं म्हणत पटोल यांनी काँग्रेसची आक्रमता दाखविली आहे. 


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: काँग्रेसची फरफट
काँग्रेसची फरफट
https://1.bp.blogspot.com/-sIfUsx0ym2s/YLuKXcFMvvI/AAAAAAABql4/Qj3DRwd9-PknHAtJhAOiSxIDJnx6j-QNACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-sIfUsx0ym2s/YLuKXcFMvvI/AAAAAAABql4/Qj3DRwd9-PknHAtJhAOiSxIDJnx6j-QNACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_06.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_06.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content