$type=ticker$snippet=hide$cate=0

समाजमाध्यमांना वेसण घालण्याचा प्रकार

कोणीही गुलामासारखं वागलं, तर ते सत्ताधीशांना हवं असतं. गुलामानं मान वर करून बोललं, की ते सत्ताधीशांना जड जातं. माध्यमांनीही आपल्याच कलानं चा...

कोणीही गुलामासारखं वागलं, तर ते सत्ताधीशांना हवं असतं. गुलामानं मान वर करून बोललं, की ते सत्ताधीशांना जड जातं. माध्यमांनीही आपल्याच कलानं चाललं पाहिजे, आपलाचा उदोउदो केला पाहिजे, असं सत्ताधार्‍यांना वाटत असतं. माध्यमांनी टीका केली, की देशद्रोही अशी संभावना करण्याकडं अलिकडच्या राज्यर्कत्यांचा ठाम ग्रह आहे. आता तर ज्या समाजमाध्यमांचा वापर करून सत्तेत आले, त्याच समाजमाध्यमांनी आरसा दाखवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यावर अंकुश आणण्याचं  पाऊल सरकार उचलत आहे. 


    सत्तेत कोणीही असले, तरी त्यांना स्वायत्त, स्वतंत्र विचाराची माध्यमं नको असतात. त्यात ज्यांचं कूळ आणि मूळ दोन्हीही भारतात नाही, ती तर नकोच असतात. इंदिरा गांधी यांच्याविरोधात माध्यमं तुटून पडत. आणीबाणीच्या काळात त्यांच्यावर नियंत्रणं आणल्यानं अनेक वृत्तपत्रं अग्रलेखाची जागा निषेध म्हणून मोकळी सोडत. माध्यमांवर नियंत्रण आणणं, म्हणजे एकप्रकारे त्यांचा गळा घोटण्याचाच प्रकार होता. सध्याचे सत्ताधारी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावानं गळा काढीत. आताच्या सरकारमध्ये सहभागी असलेले अनेक जण त्या वेळी वृत्तपत्रात होते. एकाधिकारशाहीच्या दिशेनं वाटचाल सुरू असली, की माध्यमांचं स्वातंत्र्य खुपायला लागतं. स्वतंत्र वृत्तपत्रं एकाधिकारशाहीला अडचणीची ठरत असतात. त्यामुळं अशा माध्यमांना आळा घालण्याचं काम संबंधित देशातील सरकारं करीत असतात. माध्यमांची मुस्कटदाबी करायला लागतात. ज्यांनी माध्यमांच्या मुस्कटदाबीच्या विरोधात आंदोलनं केली, त्यांचंच सरकार असताना आता माध्यमांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. सत्तेच्या वळचणीला गेलं, की माध्यमं डोईजड वाटायला लागतात. त्यांनी केलेली टीका सहन होत नाही. जाहिराती किंवा अन्य आमिषांच्या नावाखाली माध्यमांच्या मालकांवर दबाव आणून आपल्याविरोधात लिखाण करणार्‍या संपादकांना घरी बसविलं जातं. त्यात आता काही लपून राहिलेलं नाही. माध्यमांची साखळी मालकी असणारे अनेक जण तर सरकारच्या दावणीला बांधले गेले आहेत. आता पारंपरिक माध्यमांपेक्षाही समाजमाध्यमांचा प्रभाव जास्त आहे. याच समाजमाध्यमांचा वापर काँग्रेस सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी करण्यात आला. त्या जल्पकांच्या फौजा निर्माण करण्यात आल्या. ही समाजमाध्यमं जोपर्यंत आपल्या ओंजळीनं पाणी पितात, तोपर्यंत ती चांगली आणि जनमत लक्षात घेऊन ही माध्यमं रोखठोक भूमिका घ्यायला लागली, की ती देशद्रोही असं एक समीकरण तयार झालं आहे. चुकीचं, अमानवी, भडकाऊ असे काहीही टाकलं, तरी ते चालून जातं, असं जोपर्यंत होत होते, तोपर्यंत या माध्यमांचा गवगवा केला जात होता. अखेर ही माध्यमं चालविणार्‍या कंपन्यांनाही समाजमनाची दखल घ्यावी लागते. सातत्यानं चुकीचं सांगत राहिलं, तर ते खरं वाटण्याचा संभव असतो; परंतु समाजमाध्यमांनाही जनतेची दखल घ्यावी लागते. चुकीचं निदर्शनास आणून देऊनही दखल घेतला नाही, तर समाजमाध्यमांची विश्‍वासार्हताच धोक्यात येण्याची शक्यता आहे. जनता पर्याय शोधत असते. तसं होऊ नये, असे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, व्हॉटस्अ‍ॅपसारख्या समाजमाध्यामांना वाटत असेल, तर त्यात चुकीचं काही नाही. त्यातून त्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍यांची अशी खाती बंद केली, तर गळा काढण्यासारखं काहीच नाही. भारतीय जनता पक्षाच्या समाजमाध्यमप्रमुखांसह अन्य अनेक नेत्यांची खाती बंद करण्यात आली. हे भारतातच झालं असं नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांची खाती दोन वर्षांसाठी बंद केली गेली. त्यामुळं ही माध्यमं पक्षपातीपणे असे निर्णय घेतात, असंही म्हणता येत नाही. समाजमाध्यमं देशात येऊन दोन दशकं तरी  झाली. मुझफ्फनगरची दंगल भडकावण्यासाठी बलुचिस्तानच्या क्लिप टाकून त्या उत्तर प्रदेशातील असल्याचं भासवण्यात आलं. सत्ता आल्यानंतर त्यातील आरोपीवरचे गुन्हे मागे घेण्यात आले. म्हणजे सोईचं असेल, तेव्हा समाजमाध्यमांचा वापर करायचा आणि सोईचं नसलं, तर त्यांच्यावर बंधनं आणायची, अशी सध्याच्या सत्ताधार्‍यांची कार्यपद्धत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी 26 मे 2021 रोजी नवीन माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यमं नीतीमत्ता संहिता) नियम 2021 लागू झाले. हे नियम लागू होण्यास काही तास राहिले असताना ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी येणार अशा बातम्यांचा पूर सोशल नेटवर्किंग साइट्सवर आला होता. नवीन आयटी नियमांची पूर्तता बहुतेक मोठ्या सोशल नेटवर्किंग साइट्सनी तोपर्यंत केलेली नव्हती. नवीन नियमांच्या पूर्ततेसाठी पावलं उचलत असल्याची घोषणा 26 मेनंतर काही प्लॅटफॉर्म्सनी केली; मात्र किमान एका प्लॅटफॉर्मनं तरी आयटी नियम, 2021मधील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं. गेल्या काही काळापासून भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवीन स्वरूप देऊन अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जात आहे. अर्थात आयटी नियमांचे प्राथमिक उद्दिष्ट साध्य झालं आहे. म्हणजेच भारत सरकारला मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांविरोधातील लढा हळूहळू तीव्र करत नेण्यासाठी आवश्यक असं धारदार हत्यार या नियमांच्या रूपानं प्राप्त झालं आहे. प्लॅटफॉर्म्सवर बंदीची शक्यता किंवा ट्विटर आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात चाललेला वाद या सगळ्या एका मोठ्या कथानकाची महत्त्वाची उपकथानकं आहेत. फेसबुकचा वापर राजकीय आशयाद्वारे यूजर्सच्या प्रोफायलिंग व हाताळणीसाठी होत आहे, हे कॅम्ब्रिज अ‍ॅनालिटिकामार्फत उघड झाल्यापासून भारत सरकारनं अनेक मोठ्या इंटरनेट मध्यस्थांसोबत चर्चांचा सपाटा लावला आहे. 2018 मध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेतील भाषणातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना इशारा दिला होता. हे प्लॅटफॉर्म्स आपला वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी होऊ देऊन स्वत:ची जबाबदारी व बांधिलकी टाळू शकत नाहीत, असा इशारा प्रसाद यांनी दिला होता. या प्लॅटफॉर्म्सनी योग्य व त्वरित कार्यवाही केली नाही, तर त्यांच्यावर गुन्ह्याला चिथावणी देण्यासंदर्भातील कायदाही लावला जाईल, अशा भाषेत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना धमकावलं होतं.


 


सोशल मीडियाची तुलना वर्तमानपत्रांसोबत करत प्रसाद म्हणाले होते, की वर्तमानपत्रातून प्रक्षोभक लेखन प्रसिद्ध होतं, तेव्हा वर्तमानपत्रं जबाबदारी टाळू शकत नाहीत. प्रसाद यांच्या भाषणानंतर मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे अनिर्बंध अधिकार छाटण्यासाठी अनेक धोरणात्मक प्रस्ताव ठेवले गेले. जगभरातील यूजर्स डेटा निर्माण करतात, प्लॅटफॉर्म कंपन्या या डेटाचं विश्‍लेषण व प्रक्रिया त्यांच्या देशातील कायद्याप्रमाणं करतात, त्याचा आर्थिक लाभांश खिशात घालतात आणि ते ज्या देशांमध्ये काम करतात. तेथील नियमांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचं हे वर्तन भूतकाळात वसाहतवादाचे संप्रेरक म्हणून काम केलेल्या खासगी कंपन्यांसारखंच आहे. वरकरणी ही धोरणं मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या हातातून नियंत्रण काढून घेण्यासाठी आखल्यासारखी वाटतात; पण बारकाईनं बघितलं, की प्रत्यक्षात या नियमांचं उद्दिष्ट हे नियंत्रण यूजर्सकडे देणं हे नाही, तर ते अधिकार सरकार व मोठ्या स्थानिक कंपन्यांना देणं हे आहे. भाजप प्रवक्त्याच्या ट्विटवर ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ असं लेबल ट्विटरनं लावल्यामुळं सध्या चाललेल्या पोलिस तपासात अडचणी निर्माण होतील, असा दावा सरकारनं केला आहे. तथ्यांची पडताळणी करणार्‍या वेबसाइटने केलेल्या तपासाच्या आधारावर ट्विटरनं या ट्वीटला लेबलिंग केल्याचं दिसतं. हे ट्वीट फेरफार केलेलं अर्थात मॅनिप्युलेटेड आहे असं या वेबसाइटनं केलेल्या तपासात आढळून आलं होतं. हा निर्णय सामूदायिक नियमांशी सुसंगती राखून करण्यात आलेला आहे, याची खात्री पटवण्यासाठी ट्वीटरनं वापरलेल्या प्रक्रियांबाबत पुरेशी पारदर्शकता न राखली जाणं हा कंटेटच्या नियमनातील महत्त्वाचा अडथळा आहे. समाजमाध्यमांकडं बरेच अधिकार आहे आणि त्यांची कार्यपद्धती अपारदर्शक आहे. त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करणारे निर्णय ते का व कसे घेतात हे तक्रारदार, प्रतिवादी तसंच सामान्य जनतेलाही समजू शकत नाही. अर्थात सरकारचे दावेही त्यांच्या स्वत:च्या नियमांशीच विसंगत आहेत. 

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: समाजमाध्यमांना वेसण घालण्याचा प्रकार
समाजमाध्यमांना वेसण घालण्याचा प्रकार
https://1.bp.blogspot.com/-HnUHQJbIwKg/YL4LpmNX2aI/AAAAAAABqok/obHvp1xSMGgX_c5X6Xg1ALErnYWIDUB_QCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-HnUHQJbIwKg/YL4LpmNX2aI/AAAAAAABqok/obHvp1xSMGgX_c5X6Xg1ALErnYWIDUB_QCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_08.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_08.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content