$type=ticker$snippet=hide$cate=0

विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र ; शरद पवार यांचे संकेत

मुंबई/प्रतिनिधीः राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिव...

मुंबई/प्रतिनिधीः राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो असे कोणाला पटले नसते असे म्हटले आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले असून पुढील पाच वर्षे हे सरकार टिकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दि


नानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो असे कोणला पटले नसते; पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असे कौतुक पवार यांनी केले. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरू होती, अशी आठवण करून देताना हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे टिकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली, असे सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असे सांगत पवार यांनी या वेळी टीकाकारांना उत्तर दिले. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही; पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्‍वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचे राज्य आले, त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला, तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो, तुम्ही विचार करा; पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली, तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे पवार म्हणाले. देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. 1977 मध्ये जनता पक्षाचा प्रयोग झाला; पण दोन वर्षांत तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले; पण राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली. सहकार्‍यांच्या कष्टाने, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्‍वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो; पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नाही, असे सांगून ते म्हणाले, की काही लोक गेले; पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रिमंडळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत. महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्‍वास देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले. राजकारणात नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभे राहिले पाहिजे. लोकांचे प्रश्‍न सोडण्यासाठी सत्ता महत्वाची आहे; पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याचे शंभर टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणार्‍या सामान्यांचे असून त्यांची बांधीलकी कायम ठेवली पाहिजे.

शिवभोजन थाळीसंंबधी होती शंका

कोरोना संकटातून बाहेर पडताना अनेक उपक्रम राबण्यात आले. शिवभोजन थाळीसारखा एक उपक्रम हाती घेतला. तो उपक्रम राबवण्यासंबंधी चर्चा झाली, तेव्हा माझ्याही मनात शंका होती; पण ते काम अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे, असे पवार यांनी सांगितले. संकटात आपण थांबलो नाही, तर कोरोनाला सामोरे गेलो. शिवभोजन थाळीसारखे कार्यक्रम राबवले. मोफत धान्य शेवटच्या लोकांपर्यंत जातील, याची काळजी घेतली, असे सांगत त्यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नसल्याचे म्हटले आहे.

सत्ता एकाच ठिकाणी राहिली की होते भ्रष्ट

मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्‍न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातात गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असे पवार म्हणाले.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र ; शरद पवार यांचे संकेत
विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र ; शरद पवार यांचे संकेत
https://images.news18.com/ibnlokmat/uploads/2019/03/sharad-pawar7-1.jpg?impolicy=website&width=496&height=330
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_158.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_158.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content