$type=ticker$snippet=hide$cate=0

आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उ...

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. नगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही अधिकार्‍यांनी आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर नाराजी व्यक्त केली आहे तसेच मुंबईतील भाजप पक्षश्रेष्ठींनीही त्यामुळे या भेटीची दखल घेऊन शहरातील पक्षाच्या व मनपातील पदाधिकार्‍यांना त्याचा जाब विचारल्याचे समजते. मात्र, पक्ष पदाधिकार्‍यांकडून याचा इन्कार केला जात आहे. 


    मागच्या आठवड्यात गांधी मैदानातील भाजपच्या कार्यालयात महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्यासह काही नगरसेवक व पक्ष पदाधिकारी असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आ. जगताप या कार्यालयात आले. अर्धातास थांबून नंतर ते निघून गेले. त्यावेळीच राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या कार्यालयात गेल्याच्या या वृत्ताची जोरदार चर्चा शहरात होती. मनपाच्या माध्यमातून शहरात कोणती विकास कामे करता येतील, याबाबतची चर्चा त्यावेळी जगतापांशी झाल्याचे भाजप पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. तर खुद्द जगतापांनी मात्र या भेटीवर काहीच भाष्य केले नव्हते. पत्रकारांनी विचारल्यावर, तुम्हाला तर माहीतच आहे ना, की सध्या शहरात काय चालू आहे ते...असे संदिग्ध, पण आगामी महापौर निवडणुकीच्यादृष्टीने सूचक वक्तव्य करून संभ्रम वाढवला होता. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील संघ परिवारातून मात्र आ. जगतापांना भाजप कार्यालयात बोलावण्याच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे व ती मुंबईतील पक्षश्रेष्ठींपर्यंतही गेल्याने त्यांनीही त्याचा जाब शहरातील व मनपातील आपल्या पदाधिकार्‍यांना विचारल्याचे समजते. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आहे व भाजप विरोधात असून, सत्ताधारी संधी मिळेल तेथे भाजपला व केंद्रातील मोदी सरकारला टार्गेट करीत आहेत. अशा स्थितीत स्थानिक राजकारणाचा विषय असला तरी भाजप-राष्ट्रवादीच्या सार्वजनिक भेटीचे व मैत्रीचे चुकीचे संदेश पक्ष समर्थकांमध्ये जात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढे अशा भेटी टाळण्याची तंबीही दिली गेल्याचे सांगितले जाते.

तेव्हा मैत्री कशी चालली?

अडीच वर्षांपूर्वी जेव्हा भाजपने राष्ट्रवादीची साथ घेऊन महापालिकेत पहिल्यांदा महापौरपद-उपमहापौरपद व अन्य पदे मिळवून सत्ता मिळवली, तेव्हा ती मैत्री कशी चालली, असा सवाल काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. त्या मैत्रीचा परिणाम त्यांना (राष्ट्रवादी) भोगावा लागला. आपल्याला (भाजप) काहीही तोशीस लागली नाही. मनपा सत्तेतही ही मैत्री आतापर्यंत टिकली आहे. त्यामुळे स्थानिक मनपा राजकारणातील मैत्रीतून जगतापांची ती भाजप कार्यालय भेट होती, असेही समर्थन पदाधिकार्‍यांकडून होत आहे.

Name

] ब्रेकिंग,11,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangali,1,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,75,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11716,औरंगाबाद,394,क्रीडा,681,दखल,808,देश,4760,नगर,4,नाशिक,850,पुणे,1047,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18666,ब्रेकिंग Latest News Maharashtra sangali,1,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16232,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4535,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1768,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा
आ. जगतापांच्या भाजप कार्यालय भेटीवर परिवार नाराज? ; भाजप श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याची चर्चा
https://pbs.twimg.com/profile_images/1182966861274550273/rclf8kQt_400x400.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_17.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_17.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content