$type=ticker$snippet=hide$cate=0

महाविकास आघाडीकडून मराठा व ओबीसींवर अन्याय ; आ. पाचपुतेंनी केली टीका

अहमदनगर/प्रतिनिधी-राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे विकृतीने आलेले आहे. मराठा व ओबीसी समाजावर मोठा अन्याय करीत आहे. त्यामुळे मराठा व ओबीसींन...


अहमदनगर/प्रतिनिधी-राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे विकृतीने आलेले आहे. मराठा व ओबीसी समाजावर मोठा अन्याय करीत आहे. त्यामुळे मराठा व ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे व यासठी आता आरपार लढाई देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी येथे केले. 


राज्य सरकारने ओबीसी अरक्षणाबाबत योग्य कारवाई न केल्याने राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्यातील ओबीसी समाजावर हा मोठा अन्याय झाला असल्याचा दावा करून या निषेधार्थ जिल्हा भाजपाच्या जिल्हा ओबीसी आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेण्यात आला व धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आ. पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, युवराज पोटे, ज्ञानेश्‍वर काळे, नारायण धोंगडे, आशा वाघ, संगीता घोडेकर, बाळासाहेब गाडेकर, अशोक गोरे, सचिन भैरवकर, सचिन पारखी, अनिल गट्टाणी आदींसह भाजपाच्या ओबीसी आघाडीचे तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना चित्ते म्हणाले, लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, न्यायालयाच्या या आदेशाला आता जवळपास पंधरा महिने उलटून गेले आहेत, तरीही राज्य मागासवर्गीय आयोगाचे अधिकृत गठण झालेले नाही. भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्यावतीने अनेक वेळा राज्य सरकारला पत्र दिले. मात्र, या सरकारला ओबीसी समाजाबद्दल काहीही देणे-घेणे नसल्याने ओबीसींचे हित ते पाहत नाही. राजकीयदृष्ट्या ओबीसींना संपवण्याचे कट आघाडी सरकारने केला असल्याने भाजप आता शांत बसणार नाही. आजच्या आंदोलनाने संघर्षाची ठिणगी पडली आहे. लवकरच हे आंदोलन विराट रूप घेईल व ओबीसी समाजाला हक्काचे राजकीय आरक्षण परत मिळवेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.माजी आ. मुरकुटे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र, राज्य सरकारने मराठा व ओबीसींबाबत चुकीचे निर्णय घेतल्याने अडचणीत आणले आहे. या उदासी सरकारने दोन्ही समाजांचे आरक्षण संपुष्टात आणले आहे, असा आरोपही त्यांनी केला.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: महाविकास आघाडीकडून मराठा व ओबीसींवर अन्याय ; आ. पाचपुतेंनी केली टीका
महाविकास आघाडीकडून मराठा व ओबीसींवर अन्याय ; आ. पाचपुतेंनी केली टीका
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSaPOCAyvyIbVpihpVm9kxwkc10pDinFe6ze3G6stLZhBFgY1EkEKu7V70_BoUzvbg4S1A&usqp=CAU
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_18.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_18.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content