$type=ticker$snippet=hide$cate=0

राज्यात रोहिणीची समाधानकारक हजेरी ; मॉन्सूनही दोन-तीन दिवसांत धडकणार

मुंबई, पुणे/ प्रतिनिधीः अखेर केरळात नैऋत्य मोसमी वार्‍याचे आगमन झाले आहे. केरळातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळात मॉन्स...


मुंबई, पुणे/ प्रतिनिधीः अखेर केरळात नैऋत्य मोसमी वार्‍याचे आगमन झाले आहे. केरळातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळात मॉन्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वार्‍यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


एककीकडे राज्यात नैऋत्य मोसमी वार्‍याच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होत असताना, मागील काही दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसाने जोर धरला आहे. पुढील 24 तासांत केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण कर्नाटकमध्ये मॉन्सून दाखल होईल. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात 48 तासांत पाऊस पडणार अशी भविष्यवाणी वेधशाळेने केली. भारतात चौदा हवामान केंद्रे आहेत. यापैकी साठ टक्के हवामान केंद्राच्या क ार्यक्षेत्रात दोन दिवसांत अडीच मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे, असे वेधशाळेने सांगितले. अरबी समुद्रातील स्थिती बघता 48 ते 72 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी व्यक्त केला. उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळेल. शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस वेळेवर पडणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. त्यांनाही पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळेल. केरळमधील पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, कोझीकोड, कन्नूर आणि कासरगोड आठ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी ’यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातही मॉन्सून दाखल झाला आहे. दक्षिणेतील वार्‍याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता; पण त्यानंतर आता मोसमी वार्‍यांनी वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून अरबी समुद्रातील काही भागासह गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.  मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा येऊन शहरांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागात नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच या पावसाने काही ठिकाणी शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरात तुफान पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढग दाटून आले होते. हलक्या सरीही कोसळत होत्या; पण दुपारी तीन नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक जिल्ह्यात आज अनेक भागात माऽन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील काही भागात तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते. कालसुद्धा तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने कांद्यासह अन्य पिकांना त्याचा फटका बसला. धुळे जिल्हातील साक्री तालुक्यामध्ये तब्बल एक तास वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे बर्‍याच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तासभर चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतास तळ्याचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले आहे. गडचिरोली शहरात मॉन्सूनपूर्व रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहरातील वातावरण थंड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली आहे. चिपळूण, खेड, दापोलीमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला आहे. पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा आला आहे तर बळीराजा सुखावला आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मॉन्सूनपूर्व पाऊस मुसळधार झाला. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेली शेतकर्‍यांची हळद आणि इतर शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीने रिकामे आणि बांधकाम सुरू असलेले सुरक्षित गाळे उपलब्ध करून दिले नाही, म्हणून हे नुकसान झाले असून या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.


नांदेडमध्ये शेतीमाल भिजल्याने मोठे नुकसान

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मॉन्सूनपूर्व मुसळधार पाऊस बरसला. पावसाची तीव्रता एवढी होती, की नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेला हळद आणि इतर शेती उत्पन्न माल अक्षरशः पावसात भिजला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिकामे गाळे असताना ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून न दिल्यामुळे वर्षभर राबराब राबणार्‍या शेतकर्‍यांच्या घामाचे उत्पन्न मातीमोल ठरले. त्याचप्रमाणे बाजार समितीतील शेतकर्‍यांचा आलेला माल ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले गाळे, काही व्यापार्‍यांनी अनधिकृतपणे ताब्यात घेऊन त्यांचे गोदाम बनवल्यामुळे शेतकर्‍यांना माल उघड्यावर टाकावा लागत आहे.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: राज्यात रोहिणीची समाधानकारक हजेरी ; मॉन्सूनही दोन-तीन दिवसांत धडकणार
राज्यात रोहिणीची समाधानकारक हजेरी ; मॉन्सूनही दोन-तीन दिवसांत धडकणार
https://wpcdn.us-east-1.vip.tn-cloud.net/www.myneworleans.com/content/uploads/2021/04/r/y/gettyimages-1257951336.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_266.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_266.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content