$type=ticker$snippet=hide$cate=0

कोण होणार महापौर ? शेंडगे वा भाकरे...कोणीही द्या ; शिवसेना नगरसेवकांनी सोपवला श्रेष्ठींवर निर्णय

अहमदनगर/प्रतिनिधी- मनपाच्या आगामी महापौरपदासाठी शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे वा रिता भाकरे यापैकी कोणीही उमेदवार द्या, अशी भूमिका शिवसेनेच्या स...


अहमदनगर/प्रतिनिधी- मनपाच्या आगामी महापौरपदासाठी शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे वा रिता भाकरे यापैकी कोणीही उमेदवार द्या, अशी भूमिका शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी एकमुखाने घेतली आहे. मुंबईतील पक्षश्रेष्ठींनी याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असेही आवर्जून स्पष्ट केले गेले आहे. 


अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या नगरच्या नवव्या महापौरपदाची निवडणूक येत्या 15 दिवसात अपेक्षित आहे. शिवसेनेकडून ही निवडणूक लढवली जाणार असून, त्यांच्याकडे या प्रवर्गातील तीन महिला उमेदवार आहेत. यापैकी केडगावच्या शांताबाई शिंदे यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता सेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे व बोल्हेगाव येथील रिता भाकरे यांची नावे स्पर्धेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत रविवारी यश ग्रँड हॉटेलमध्ये नगरसेवक व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी शेंडगे व भाकरे यांच्यासह शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदींसह अन्य नगरसेवक उपस्थित होते.

मध्यंतरी सातपुते, कदम यांच्यासह अनिल शिंदे व संजय शेंडगे यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत माजी आमदार (स्व.) अनिल राठोड समर्थक नगरसेवक संतप्त झाले होते. त्यांनी भाकरे यांचे नाव पुढे आणले होते. मुंबईतील श्रेष्ठींशीही याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर मग श्रेष्ठींद्वारेच दोन्ही गटांना कानपिचक्या दिल्या गेल्याने उसळू पाहणारा वाद थांबला. या पार्श्‍वभूमीवर रविवारी कोरगावकर यांनी दोन्ही गटांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी दोन्ही गटांकडून शेंडगे वा भाकरे यांच्यापैकी कोणीही उमेदवार दिला जावा व त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींनीच घ्यावा, असे सुचवले. त्यानुसार आता कोरगावकर हे दोन्ही नावांचा प्रस्ताव मुंबईत पक्ष श्रेष्ठींसमोर मांडणार आहेत व उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच होणार आहे.

मुंबईला सर्वांना बोलावणार

शिवसेनेकडून दोन नावांचे प्रस्ताव पक्षश्रेष्ठींसमोर जाणार असले तरी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाचे काय मत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न श्रेष्ठींकडून होणार असल्याने या आठवड्यात बहुदा शिवसेनेच्या सर्व 23 नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलावून त्यांची बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. तशी माहिती नगरसेवकांना देण्यात आली असून, या बैठकीच्यादृष्टीने तयारीत राहण्याचेही सांगण्यात आल्याचे समजते.

सर्व पर्याय खुले

राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी नगरच्या स्तरावरही एकत्र येऊन महापौर करण्याची गरज आहे. पण या तिन्ही पक्षांकडे उमेदवार असल्याने व तिन्ही पक्षांना उमेदवारीची आस असल्याने एकीकडे एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू ठेवताना तिन्ही पक्षांनी अन्य सर्व पर्यायही खुले ठेवले आहेत. राष्ट्रवादीकडे रुपाली पारगे व काँग्रेसकडे शीला चव्हाण असे उमेदवार आहेत व या तिन्ही पक्षांना महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनी आपल्याला साथ द्यावी, अशी अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असून, भाजपकडे उमेदवार नसला तरी 15 नगरसेवकांचे संख्याबळ निर्णायक  भूमिका बजावू शकत असल्याने यावेळच्या महापौर निवडणुकीत फोडा़फोडीही रंगते काय, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.




Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कोण होणार महापौर ? शेंडगे वा भाकरे...कोणीही द्या ; शिवसेना नगरसेवकांनी सोपवला श्रेष्ठींवर निर्णय
कोण होणार महापौर ? शेंडगे वा भाकरे...कोणीही द्या ; शिवसेना नगरसेवकांनी सोपवला श्रेष्ठींवर निर्णय
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/ahmednagar-corporation_20171242108.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_403.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_403.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content