$type=ticker$snippet=hide$cate=0

नगरची बाजारपेठ बंदच, फक्त किराणा-भुसार व भाजीपाला-फळांना परवानगी

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्ह्यात व शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूदर मात्र कमी होत नसल्याने कोरोना निर्बंध अजूनही जारी आहेत....

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्ह्यात व शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूदर मात्र कमी होत नसल्याने कोरोना निर्बंध अजूनही जारी आहेत. मात्र, स्थानिक महसूल व मनपा प्रशासनाने किराणा व भुसार मालासह भाजीपाला मार्केटला रोज काहीकाळासाठी व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. पण त्यांनाही दर रविवारी सुट्टी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, अन्य बाजारपेठ मात्र बंदच राहणार असल्याने या व्यावसायिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 


    नगरसह जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना निर्बंध लागू आहेत. सलून, कपडे, दागिने, भांडी, मोबाईल, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्टेशनरी, प्लास्टिक, मिठाई, फॅशन असे जवळपास सर्वच प्रकारचे व्यवसाय बंद आहेत. फक्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये व औषध दुकाने आणि दूध विक्रीला मुभा देण्यात आली होती. मागील महिन्यात तर अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, पशुखाद्य, अंडी व मांस विक्री, खते-बी बियाणे या दुकानांवरही बंदी होती. काही काळानंतर पशुखाद्य तसेच बी-बियाणे-खते व कीटकनाशके विक्रीला मुभा दिली गेली. पण यामुळे किराणा व भाजीपाला व्यावसायिकांसह नागरिकही अस्वस्थ होते. भाजीपाला व किराणा दुकानांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने लपूनछपून त्यांचे व्यवहार सुरू होते व त्यामुळे अव्वाच्या सव्वा किमतीत ग्राहकांना वस्तू घ्याव्या लागत होत्या. या पार्श्‍वभूमीवर किमान किराणा व भुसार व्यवहार तसेच भाजीपाला व्यवहार सुरू करण्याची मागणी होत होती. जिल्ह्यात सगळीकडे हे व्यवसाय सुरू आहेत, पण नगर शहरातच बंद आहेत, असे दावेही केले जात होते. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांद्वारेही किराणा व भाजीपाला विक्री सुरू ठेवण्याच्या मागणीचा पाठपुरावा प्रशासनाकडे सुरू होता. त्यामुळे 1जूनपासून नव्याने निर्बंध जारी करताना किराणा विक्रीला परवानगी देताना भाजीपाला व फळांच्या द्वारविक्रीला परवानगी दिली गेली होती. अशी परवानगी दिल्यावर मग या किराणा व्यावसायिकांना व किरकोळ भाजी विक्रेत्यांना ठोक स्वरुपात किराणा व भाजीपाला मिळण्यासाठी आडते बाजार व मार्केट यार्डचा भाजीबाजार सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी सायंकाळी आडते बाजार व मार्केट यार्ड परिसराची पाहणी केली व कोरोना निर्बंध पाळण्याच्या अटींवर हे दोन्ही बाजार खुले करण्यास परवानगी दिली. त्यानुसार बुधवारपासून या दोन्ही बाजारांत व्यवहार सुरू झाले. खूप दिवसांनी येथील व्यवहार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी बरीच गर्दी झाली होती. पण जसजसे मालाचे वितरण होत जाईल, तशी गर्दी कमी होईल, असा विश्‍वास व्यावसायिकांकडून व्यक्त झाला.

निर्बंधांसह बाजार झाले खुले

1)अहमदनगर जिल्ह्यातील ठोक विक्रीची किराणा, भुसार दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ही दुकाने शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यत बंद राहतील.

2) अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डातील फक्त भुसार मालाचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि, मुख्य यार्डामध्ये फळे व भाजीपाला यांचे व्यवहारास प्रतिबंध राहील. 3) नेप्ती उपबाजार याठिकाणी फळे, भाजीपाला व कांदा यांचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात तसेच उपबाजार नेप्ती याठिकाणी शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यत व्यवहार बंद राहतील.

4) संगमनेर बाजार समितीच्या मुख्य यार्डात भुसार व कांदा या शेतमालाचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. उपबाजार वडगांव पान याठिकाणी फळे व भाजीपाला यांचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच संगमनेर बाजार समितीच्या मुख्य यार्डात व उपबाजार वडगांव पान याठिकाणी शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यत व्यवहार बंद राहतील.

5) नमूद कृषी उत्पन्न बाजार समित्या व उपबाजार समिती व्यतिरित अहमदनगर जिल्ह्यातील इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या व उपबाजार समित्या यांना सर्व शेतमालांचे व्यवहार सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. या कृषी उत्पन्न बाजार समित्या व उपबाजार समित्यांमध्ये शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यत व्यवहार बंद राहतील.

6) कोविड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेविअरचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकान-आस्थापना कोविड -19 ही आपत्ती घोषित असेपर्यंत बंद करण्यात येईल. या आदेशात नमूद नसणार्‍या इतर सर्व तरतुदींसाठी यापूर्वीचे आदेश लागू राहतील.


...तर, तडजोड व मध्यस्थी करणार नाही

आडते बाजार, डाळ मंडई, मार्केट यार्ड व इतर परिसरातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांनी कोविड नियम पाळून व्यवसाय करण्याची सूचना आडते बाजार मर्चंटस असोसिएशनने केली आहे. अहमदनगर शहरातील घाऊक (ठोक) अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणारे (तेल, साखर, गुळ, सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, गरा, मैदा, आटा, बेसन, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्य वगैरे) व्यापारी आपली दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडून व्यापार करू शकतील. असा आदेश प्रशासनाने काढलेला आहे. रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. सर्व व्यापार्‍यांनी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, दुकानांमध्ये गर्दी होऊ न देणे, आपल्याकडे येणारी वाहने ही एकेरी वाहतुकीचा अवलंब करून आणणे, येणार्‍या वाहनास जास्त वेळ थांबू नये, एका वेळेस एकच वाहन आणणे, मोठी वाहने (ट्रक्स/टँकर) कोणीही दुकानासमोर लावू नये, अकरा वाजे नंतर कोणीही दुकानात थांबू नये (दुकान वाढवणे व घर आणि दुकान एकाच ठिकाणी असले तरी) तसेच कोणी व्यापारी नियम मोडत असल्यास त्याला नियम पाळण्याविषयी समज देणे, असे सर्व कोरोना नियम पाळणे सर्व व्यापार्‍यांना बंधनकारक राहील. कोणत्याही व्यापार्‍याने नियम मोडल्यास व ते शासनाच्या निदर्शनास आल्यास त्याचा परिणाम बाजारपेठ परत बंद होऊ शकते, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला आहे. त्यामुळे सर्व व्यापारी नियमांचे पालन करतील अशाप्रकारची ग्वाही असोसिएशनमार्फत प्रशासनास लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व व्यापार्‍यांनी नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहील. नियम मोडणार्‍या व्यापार्‍यांवर प्रशासनाने कारवाई केल्यास असोसिएशन कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा मध्यस्थी करणार नाही, असे असोसिएशनने आवर्जून स्पष्ट केले आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: नगरची बाजारपेठ बंदच, फक्त किराणा-भुसार व भाजीपाला-फळांना परवानगी
नगरची बाजारपेठ बंदच, फक्त किराणा-भुसार व भाजीपाला-फळांना परवानगी
https://gumlet.assettype.com/deshdoot%2F2020-07%2F104db470-c12f-45f3-aaa1-1bdb048a3f2f%2Fimages.jpeg?auto=format%2Ccompress&fit=max&format=webp&w=100&dpr=2.6
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_449.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_449.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content