$type=ticker$snippet=hide$cate=0

जिल्हाधिकार्‍यांची पोलखोल ‘दिव्य ज्ञानी’ चा कांगावा

सरकारचा दोष कुणाची सुपारी घेऊन प्रशासनाच्या माथी मारत आहेत? दुसर्‍या लाटेचा प्रभाव देशभर रामदास ढमाले/अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...

सरकारचा दोष कुणाची सुपारी घेऊन प्रशासनाच्या माथी मारत आहेत? दुसर्‍या लाटेचा प्रभाव देशभर

रामदास ढमाले/अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटी माहिती देऊन नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जखमेवर मीठ चोळले असा हास्यास्पद निष्कर्ष वर्तवणारे मराठीतील तथाकथित ’दिव्यज्ञानी’ स्वतःचीच बडवून घेत आहेत. ते सोयीस्कररित्या केंद्र आणि राज्य सरकारच्या गैरव्यवस्थापनाचा दाोष जिल्हाधिकार्‍यांच्या माथी मारत आहेत. त्यांच्या नावाखाली कोणाच्या बचावाची सुपारी घेतली हे यथावकाश स्पष्ट होईलच; पण तत्पूर्वी कोरोना महामारीची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयावह होती, याची अनुभूती नगरकरांनाच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांना आलेली आहे.


    कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अगदी भल्याभल्यांचे अंदाज आणि नियोजन कोलमडवले. अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यास अपवाद नसल्याने त्यांनाही हुंदके द्यावे लागले, हे तमाम भरतीयांनी पाहले आहे. मोदी यांच्याकडून जे जे झाले, तेच जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्याकडून घडले असावे. फरक एवढाच आहे, की नेत्यांना भावनिक व्हावे लागते आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना सकारात्मक राहावे लागते, म्हणून जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक माहिती देण्याचा प्रयोग केला, एवढाच याचा अन्वायार्थ निघतो. तो जर कौतुकास्पद ठरला असेल, तर जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीचा पोलखोल करून दूषणे देण्यात काय हशील?

    करोनाच्या दुसर्‍या लाटेचा संसर्ग केवळ अहमदनगर जिल्हयातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातच वाढला. त्याला वैद्यकीय साधन-सुधिांबरोबरच औषधांच्या पुरवठ्याचा अभाव कारणीभूत होता. अहमदनगरपेक्षाही शेजारच्या बीड, नाशिक, औरंगाबाद, पुण्याची अवस्था भयावह होती. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगरचे जिल्हाधिकारी निष्क्रिय कसे ठरू शकतात? हा ओढून-ताणून काढलेला निष्कर्ष दिसतो तो एकतर्फी ठरतो. वास्वितकतः राज्य सरकार हतबल होते आणि केंद्राचे धोरणही तत्कालीन स्थितीत धरसोडीचे होते. महाराष्ट्रात किमान पारदर्शकता होती. ती उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये अभावानेच दिसली. राष्ट्रीयस्तरावर अवलाकन केले, तर महाराष्ट्र आणि अहमदनगरला कोरोनासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या जात होत्या, त्या कौतुकास्पदच. ही बाब ‘मराठी’ तल्या ’दिव्यज्ञान’ पाजळणार्‍यांना निर्विवादपणे मान्य करावे लागेल.

    कोरोनाच्या युद्धात प्रारंभी खासगी रुगणालयावर कोणतेही सरकारी नियंत्रण नव्हते, म्हणून त्यांनी आपत्तीत संधी शोधल्या आणि अनेक महिने इच्छेनुसार पैसे कमवल्याचे किस्से उघड झाले. जे इतरत्र घडले तेच कमी-अधिक प्रमाणात नगरला घडले. त्यावर सरकारने नियंत्रण आणल्यावर नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचा बगडा उचलला. त्यामुळे त्यांचे भागीदार बगलबच्चे कदाचित दुरावले गेले. याची वकिली करण्यातूनच ही ’दिव्यज्ञानी’ची मोहीम तर नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकते. खासगीवाल्यांचे औषधे, ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटीलेटरचे दर सर्वसामान्यांची झोप उडविणारे होते. रेमडेसिव्हिर इंजेक्शनने तर धुमाकूळ घातला. त्या तुलनेत नगर जिल्हयात सरकारी पातळीवर अडचणी जरुर होत्या; पण गैरव्यव्यवस्थापन हमखासच नव्हते. रेमडिसिव्हिर आणि ऑक्सिजन मिळत नव्हते. हा दोष एकट्या जिल्हा प्रशासनाचा कसा असू शकतो? जे राज्य सरकारला जमत नव्हते. केंद्र हातवर करत असताना जिल्हाधिकार्‍याकडून त्या अपेक्षा धरण्यात काय हशील; पण या ’दिव्यज्ञानीं’नी जे ओढून-ताणून जिल्हाधिकार्‍यांवर आसूड ओढला; मात्र रेमडसेव्हिर इंजेक्शन ज्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आणली त्याविरुद्ध मोहीम चालवून आपल्या ’दिव्यज्ञाना’चा झगमग का केला नव्हता. सरकारी दवाखान्यपेक्षा खासगीत मृत्यूदर कसा होतो ते स्पष्ट करा.


प्रतिके निर्मितीत सर्वंच जिल्हाधिकार्‍यांचे योगदान

राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार ही नगर जिल्हयातील गावे देशपातळीवर गेली अनेक वर्ष चमकत आहेत. त्यातही त्रुटी असू शकतात; पण ती उभी करण्यात अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांचे योगदान निर्विवाद आहे; पण त्यात नेत्याचा नव्हे, तर आतापर्यंतचा सर्वच जिल्हाधिकार्‍यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या सहयोगामुळेच ही प्रतिके उभी राहू शकली. त्यात माजी जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील यांचे योगदान मोठे आहे; पण त्यांना अशाच प्रवृत्तींनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला होताच. तत्पूर्वी अनिलकुमार लखीना जिल्हाधिकारी असताना, त्यांचा ’लखीना पॅटर्न’ देशभर गाजला. त्यातही अनेक त्रुटी होत्या. त्या वेळी त्यांना पद्मश्री मिळाली. त्याचे टाक आणि बोरु घासून अनेकांनी कौतुक केले. आज या लखीना पॅटर्नचे नगर जिल्हयात अस्तित्व जाणवत नाही. मग इतर ठिकाणी अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे?. त्या तुलनेत कलेक्टर नानासाहेब पाटील यांनी जी आर्दगावे उभी करण्यात योगदान दिले ती प्रतिके आजही टिकून आहेत. पण त्याच नानासाहेब पाटील यांच्यावर टीका झाली त्यांना असेच टीकेचे लक्ष्य केले होते. हा पुर्व इतिहास दुर्लक्षन करुन चालता येणार नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील यांच्या प्रमाणेच विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना टिका टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे.

छिद्रान्वेषी पत्रकाराची ’दिव्यज्ञानी’ मालिका

खरे तर पंतप्रधानांना एकदा जिल्हाधिकारी खोटी माहिती देतो आणि पंतप्रधान त्याचे कौतुक करतात ही बाब कदापी संभवत नाही. पंतप्रधान कार्यालयाकडे चौकशीची प्रचंड यंत्रणा असते, ते अशा कोण्या लुंग्या सुंग्याचे कौतुक करीत नसतात, हे ’दिव्यज्ञानीं’नी लक्षात घ्यावे. पंतप्रधानांपाठोपाठ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन केले, हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. वास्तवता नेमकी काय हे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर माहीत असते, म्हणूनच स्थानिक विरोधीपक्ष भाजपसह सत्तारुढ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जिल्हाधिकार्‍यांना दूषणे दिली नाहीत अथवा या ’दिव्यज्ञानीं’च्या मालिकेला प्रतिसाद अथवा समर्थन दिले नाही. म्हणूनच सत्ताधार्‍यांच्या डोक्यावर झापड भाजप नेते मूग गिळून गप्प अशी शेरेबाजी करायला विसरले नाहीत. वास्तविक वस्तुस्थिती नाकारून छिद्रान्वेषी पत्रकाराला काय वाटते ही कधीच महत्त्वाचे नसते. एक तर ते वृत्तपत्राच्या धोरणानुसार अथवा स्वतःच्या छुप्या हितानुसार लिहित असतात. त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे सध्या नगरच्या एका खर्डेघाशी करणार्‍या पत्रकारांवरुन ’दिव्यज्ञानीं’नी लक्षात घ्यावे. त्याच्या पत्रकारितेचे माहात्म्य या पेक्षा वेगळे नव्हते. प्रश्‍न ओढून ताणून खर्डेघाशीचा नाही. महामारीमध्ये यंत्रणेवर दोषारोप करण्याचा आहे. खासगी पेक्षा सरकारी यंत्रणेने रुग्णसेवेचे चांगले काम केले, म्हणून लढे शिपाई नाम सरदारकर या उक्ती प्रमाणे जिल्हाधिकार्‍यांना श्रेय मिळणारच ते पंतप्रधान मोदी यांनी कलेक्टर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना दिले. एवढाच याचा अन्वयार्थ आहे.

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,56,Latest News Maharashtra sangli,5,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,20,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11610,औरंगाबाद,391,क्रीडा,681,दखल,801,देश,4748,नगर,4,नाशिक,847,पुणे,1022,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18509,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,12,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,142,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16050,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4490,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1753,सातारा,3229,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: जिल्हाधिकार्‍यांची पोलखोल ‘दिव्य ज्ञानी’ चा कांगावा
जिल्हाधिकार्‍यांची पोलखोल ‘दिव्य ज्ञानी’ चा कांगावा
https://gumlet.assettype.com/esakal/import/s3fs-public/news-story/cover-images/3_E0_A4_A1_E0_A5_89._20_E0_A4_B0_E0_A4_BE_E0_A4_9C_E0_A5_87_E0_A4_82_E0_A4_A6_E0_A5_8D_E0_A4_B0_20_E0_A4_AD_E0_A5_8B_E0_A4_B8_E0_A4_B2_E0_A5_87.jpg?q=100&dpr=1.0&w=400
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_578.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_578.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content