$type=ticker$snippet=hide$cate=0

कानउघाडणीनंतरचे शहाणपण

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत घेतलेल्या अतार्किक निर्णयामुळे तसेच जबाबदारी ढकलण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर ...

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत घेतलेल्या अतार्किक निर्णयामुळे तसेच जबाबदारी ढकलण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांपुढच्या सर्वांचेच लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला. हे कानउघाडणीनंतर आलेले शहाणपण आहे. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असताना केंद्र सरकार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर जबाबदारी ढकलून मोकळे झाले. 


    शिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी संस्थांना लसीचे दर वेगवेगळे ठरविले. 45 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस; पण 18-44 या वयोगटाचे सशुल्क लसीकरण हे केंद्राचे धोरण मनमानी आणि अतार्किक आहे, असे कठोर ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने 31 मे रोजी केंद्रावर ओढले होते. आतापर्यंतची लसखरेदी, भविष्यातील खरेदी, उपलब्धता आदींसह लसधोरणाबाबत संपूर्ण तपशील दोन आठवडयांत सादर करावा, असे निर्देशही न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केंद्राला दिले होते. त्याची मुदत 14 जूनला संपण्याआधीच केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वाच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवे धोरण 21 जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे. असे असले, तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. एक मे ते 20 जून या काळात राज्यांना जादा दराने घ्यावी लागलेली लस, त्यासाठी सामान्यांच्याच खिशावर पडलेला बोजा, 18 ते 44 वयोगटातील लोेकांना विकत घ्यावी लागलेली लस याची भरपाई केंद्र सरकार कशी करणार आहे, हा प्रश्‍न मोदी यांच्या घोषणेनंतरही अनुत्तरीत आहे. केंद्राच्या लसीकरणाच्या दुहेरी धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडयात ओढलेले कठोर ताशेरे आणि राज्यांच्या वाढत्या दबावानंतर आता केंद्राने ‘एक देश, एक लसीकरण’ धोरण स्वीकारले आहे. आता राज्यांना लसखरेदी करावी लागणार नसून, लसनिर्मितीपकी 75 टक्के लसमात्रा केंद्र सरकार लस उत्पादकांकडून थेट खरेदी करेल व ती राज्यांना वितरित करेल. उर्वरित 25 टक्के लसमात्रा खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून खरेदी करता येतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले. विद्यमान विकेंद्रित धोरणानुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वर्षे वयोगटातील व्यक्तींचे केंद्राकडून मोफत लसीकरण केले जाते. 18-44 या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी राज्य सरकारांना लसउत्पादकांकडून लसखरेदी करावी लागते. देशांतर्गत लसनिर्मितीतील 50 टक्के वाटा केंद्र सरकार खरेदी करत असून उर्वरित 25 टक्के लसमात्रा प्रत्येकी राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना खरेदी करता येतात; पण आता फक्त केंद्र सरकार लसखरेदी करणार असल्याने राज्यांना जागतिक निविदेद्वारे वा अन्य राज्यांशी स्पर्धा करून जास्त किमतीला लसखरेदी करावी लागणार नाही. त्यामुळे राज्यांच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भारही वाचू शकेल. त्याअगोदर राज्यांनी वेगवेगळ्या लसींच्या खरेदीच्या जागतिक पातळीवर निविदा मागविल्या होत्या; परंतु कंपन्यांनी भरलेल्या निविदांत त्रुटी होत्या. तसेच काही कंपन्यांनी काही राज्यांना लस द्यायला नकार दिला होता. केंद्र सरकारने अगोदर लसीकरणाचे केंद्रीकरण केले; परंतु नंतर संविधानात आरोग्य हा विषय राज्यांच्या अखत्यारित असल्याने कोरोनासंदर्भातील धोरण-नियम ठरवण्याचे अधिकार राज्यांना का दिले जात नाहीत, अशी विचारणा सातत्याने केली गेल्याने अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला असे स्पष्टीकरण केंद्राने दिले; परंतु ते पटण्यासारखे नव्हते. राज्यांनी लसीकरणाची जबाबदारी पुन्हा केंद्राने घेण्याची मागणी केल्यामुळे लसीकरण धोरणाचा फेरविचार केला गेल्याचा युक्तिवाद मोदी यांनी केला असला, तरी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने मारलेल्या थपडांचे वळ अजून केंद्र सरकारच्या गालावर दिसतात. नव्या केंद्रीभूत धोरणामुळे देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेवर केंद्राचे नियंत्रण असेल. प्रत्येक राज्याला लसमात्रांचा किती कोटा वितरित केला जाईल याची माहिती राज्यांना आगाऊ दिली जाणार असून दोन आठवडयाच्या कालावधीत केंद्र व राज्य सरकारे मिळून लसीकरणाचे नवे निकष निश्‍चित करतील, अशी माहिती मोदी यांनी दिली.


देशात डिसेंबपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. सात कंपन्या लस उत्पादन करत असून परदेशी लसींच्या खरेदीलाही वेग आल्याचे मोदी यांनी सांगितले. देशांतर्गत अन्य तीन लसींच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. देशात लसींचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कंपन्यांची उत्पादन क्षमता, त्यांना उपलब्ध होणारा कच्चा माल, नव्या येणार्‍या लसी यांचा हिशेब केला, तरी देशात एक कोटी वीस लाखांच्या वर डोस उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही. आतापर्यंत पाच महिन्यांत अवघ्या 13 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असताना राहिल्या सात महिन्यांत 87 टक्के नागरिकांचे लसीकरण कसे होणार, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे तर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि परवानगी देणार्‍या नियंत्रक संस्थांवरही ताशेरे ओढले होते आणि लसीकरणाबाबत नियम ताणून धरणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल का करू नयेत, असा संतप्त सवाल केला होता. मोदी यांनी एक चांगले केले, ते म्हणजे लसीकरणात नफेखोरी करणार्‍यांना चपराक बसविण्याचा निर्णय घेतला. तो यापूर्वीच घेतला गेला असता, तर चांगले झाले असते. उशिरा का होईना सरकारी दरापेक्षा फक्त दीडशे रुपये जादा आकारून खासगी रुग्णालयांत कोरोनाची लस देण्यात येणार आहे. लसीची पुरेशी उपलब्धता आणि त्याचे सुयोग्य वितरण केले, तरच देशात लसीकरणाचे उद्दिष्ट गाठता येईल. 

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कानउघाडणीनंतरचे शहाणपण
कानउघाडणीनंतरचे शहाणपण
https://1.bp.blogspot.com/-vu099gmFhi8/YL8i6WkuCjI/AAAAAAABqqY/zW69Zf9qM7E73yl_TNweHGl_MJmIa3iwACLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-vu099gmFhi8/YL8i6WkuCjI/AAAAAAABqqY/zW69Zf9qM7E73yl_TNweHGl_MJmIa3iwACLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_583.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_583.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content