$type=ticker$snippet=hide$cate=0

दिल्लीवारीचा मतितार्थ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन, त्यांच्यांशी मराठा आरक्षणासह 12 विषयांवर चर्चा केली असली, तरी त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती दोलायमान आहे, अशा वेळी नवीन राजकीय समीकरणाला ही भेट पोषक ठरेल का, अशी चर्चा सुरू झाली असली, तरी त्यातून लगेच राजकीय अर्थ काढण्याची घाई करणे योग्य नाही. 


    कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशाची आर्थिक स्थिती अडचणीची आहे. आरक्षणाच्या मुद्यावर वेगवेगळे समाजघटक नाराज आहेत. त्यांचे मोर्चे सुरू झाले आहेत. त्याचा राजकारणासाठी उपयोग केला जात असला, तरी हे प्रश्‍न राज्याचे नसून केंद्राचे आहेत, हे दिल्लीवारीतून ठसविण्यात ठाकरे, पवार आणि चव्हाण यांना यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण, इतर मागासवर्गीयांचे आरक्षण याबाबत दिलेल्या आदेशाचा समान अर्थ काढला, तर कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असा होतो. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल, तर त्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल आणि ते केंद्र सरकारच्याच अखत्यारित आहे, हे मोदी यांच्या कानावर घालून महाराष्ट्रातील भाजपच्या टीकेतील हवा राज्य सरकारने काढून घेतली आहे. ठाकरे यांनी मोदी यांच्यांशी अर्धा तास एकांतात काय चर्चा झाली, यावर राजकीय मंथन सुरू झाले आहे. त्यावर पत्रकारांनी छेडले असता, ठाकरे म्हणाले, की आम्ही राजकीयदृष्ट्या त्यांच्याबरोबर नाहीत; पण त्याचा अर्थ असा नाही की आमचे नाते तुटले आहे. त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला नव्हतो गेलो. मी माझ्या या दोन सहकार्‍यांना म्हटले, की मला पुन्हा जाऊन त्यांना भेटायचे आहे, तर त्यात चुकीचे काय आहे? या वेळी 12 मागण्या पंतप्रधानांसमोर करण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यात मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण हे सुद्धा मुद्दे होते. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्‍नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. या भेटीत कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधान आहोत. या प्रश्‍नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्‍चितपणे करतील, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवत राज्यांना 102 व्या घटना दुरुस्तीनंतर असे आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचे म्हटले. त्यानंतर आता केंद्र सरकारच असे आरक्षण देऊ शकते, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्याच दरम्यान 13 मे रोजी 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार आहेत, असे म्हणत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली. केंद्राने याचिका दाखल केल्यानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू पुन्हा राज्याकडे टोलवला; पण मोदी यांची भेट घेऊन इंद्रा सहानी निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर आणलेली 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी घटना दुरुस्तीची मागणी करुन ठाकरे यांनी पुन्हा एकदा तो चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलावला आहे. केंद्र सरकारने मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकर्‍यात आरक्षणासंदर्भात न्याय मागण्या विचारात घेऊन भारतीय राज्य घटनेच्या कलम 15 (4) आणि 16 (4) मध्ये घटनात्मक दुरुस्ती करण्यासाठी पाऊले टाकावीत, जेणे करून इंद्रा सहानी प्रकरणामुळे 50 टक्के आरक्षणाचा मुद्दा शिथिल होईल, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. ओबीसी समाजाला पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळत होते; पण ते आता सर्वोच्च न्यायालयाने स्थागित केले. राज्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जवळजवळ 56 हजार जागांवर याचा परिणाम होईल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याआधी कठोर अनुभवजन्य संशोधन करा, असे न्यायालयाने म्हटले. त्यासाठी जणगनणेतल्या माहितीची आवश्यकता आहे. त्यामुळे हा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी 2021 च्या जनगणनेमध्ये ओबीसींचीही जनगणना करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. आता ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला जनगगणना आणि पर्यायाने मोदी सरकारकडे बोट दाखवता येणार आहे. शिवाय मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा प्रश्‍न महाराष्ट्राबरोबर इतरही राज्यांचा आहे, असे सांगत ठाकरे यांनी यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखे सर्वंकष धोरण ठरवण्याची मागणी करून हा विषयही केंद्राच्या कोर्टात टोलावला आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीचा मुद्दासुद्धा या वेळी मोदी यांच्याकडे मांडण्यात आला. 12 पैकी 11 मुद्दे हे सरकार आणि सामान्य लोकांशी संबंधीत होते; पण 12वा मुद्दा मात्र थेट महाविकास आघाडीच्या काळजाला हात घालणारा आहे. राज्यपाल-राज्य सरकारमधील संघर्ष मोदी यांच्या भेटीनंतर तरी कमी होतो का, हे पाहावे लागेल. अर्थात उच्च न्यायालयात राज्यपाल काय भूमिका घेणार, यावर 12 जणांचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुद्द्यावरून शिवसेना सतत राज्यपालांवर टीका करत आहे. पण ज्या आघाडीसाठी शिवसेना हे करत आहे, त्याआघाडीला मात्र ठाकरे यांनी एक मोठा संदेश दिला आहे, तो म्हणजे त्यांचे आणि मोदी यांचे नाते अतूट असल्याचा. कांजूरमार्गची जागा केंद्राने राज्याला देण्याचा आग्रह धरून ठाकरे यांनी फडणवीस यांनाही परस्पर शह दिल्याचे मानले जाते. 

Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,13,Latest News Maharashtra satara,66,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,3,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,26,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11695,औरंगाबाद,393,क्रीडा,681,दखल,806,देश,4757,नगर,4,नाशिक,850,पुणे,1040,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18630,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16194,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4524,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1764,सातारा,3231,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दिल्लीवारीचा मतितार्थ
दिल्लीवारीचा मतितार्थ
https://1.bp.blogspot.com/-6cvgmMM1Mjo/YMCrTcck69I/AAAAAAABqsQ/hFos0CmiPFstV1zzR5PFf_awkRVclEo4gCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-6cvgmMM1Mjo/YMCrTcck69I/AAAAAAABqsQ/hFos0CmiPFstV1zzR5PFf_awkRVclEo4gCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_750.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_750.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content