$type=ticker$snippet=hide$cate=0

लस उपलब्ध नसल्याने नगरसेवक अस्वस्थ ; नागरिकांकडून विचारणा

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना प्रतिबंधात्मक लस मागील चार दिवसांपासून नगर शहरात उपलब्ध नसल्याने मनपाची लसीकरण केंद्रे बंद आहेत. पण यामुळे लसीकरणास...

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना प्रतिबंधात्मक लस मागील चार दिवसांपासून नगर शहरात उपलब्ध नसल्याने मनपाची लसीकरण केंद्रे बंद आहेत. पण यामुळे लसीकरणासाठी पुढाकार घेणारे नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. नागरिकांकडून त्यांना वारंवार विचारणा होत असल्याने गुरुवारी स्थायी समिती सभेत या नगरसेवकांनी मनपा आरोग्य अधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांना धारेवर धरले. शहरातील लसीकरण नियमितपणे सुरू राहण्यासाठी मनपा प्रशासनाद्वारे गांभीर्याने प्रयत्न केले जात नाहीत, असा दावाही नगरसेवकांनी केला. 


मनपाद्वारे सुरुवातीला सात आरोग्य केंद्रे व आयुर्वेद महाविद्यालयात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत शहरातील 83 हजार नागरिकांना लसीचा डोस दिला गेला आहे. मनपाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकड़ून लस उपलब्ध होते. गुरुवारी दुपारी अवघ्या 1800 कोविशिल्ड व 800 कोव्हॅक्सिन लस मनपाला उपलब्ध झाल्याने शुक्रवारी त्या शहरातील लसीकरण केंद्रात दिल्या जाणार आहेत. पण मागील तीन-चार दिवसात लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद राहिली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत लसीकरण महत्त्वाचा घटक असल्याने नगरसेवकांनी भांडून व वारंवार पाठपुरावा करून आपापल्या भागात नवी लसीकरण केंद्रे सुरू करून घेतली. यावरून नंतर राजकारणही रंगले. मनपा प्रशासनाने फक्त राष्ट्रवादी व भाजपच्याच नगरसेवकांना लसीकरण केंद्रे दिली व शिवसेना नगरसेवकांना डावलले असल्याचा आरोप झाला तसेच सेनेच्या नगरसेवकांनी मनपाने विकत लस द्यावी व त्यांच्याद्वारे ती नागरिकांना मोफत दिली जाईल, असेही सुचवले गेले होते. अशा सगळ्या पार्श्‍वभूमीवर लस उपलब्ध होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला जाब विचारला. नगरसेवक प्रकाश भागानगरे, रवींद्र बारस्कर, श्याम नळकांडे, वंदना ताठे आदींनी नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाने लस उपलब्ध नसल्याचे व कधी येणार आहे याची माहिती देणारे बोर्ड लसीकरण केंद्रांवर लावले नसल्याने नागरिकांना हेलपाटे पडले व त्यांच्याकडून नगरसेवकांना वारंवार विचारणा होत असल्याची भावना मांडली गेली. अखेर यापुढे लस जशा उपलब्ध होतील, तसे त्यांचे समान पद्धतीने सर्व केंद्रांवर वाटप केले जाईल तसेच लस उपलब्ध झाल्यावर पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतलेल्यांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जाईल व नंतर 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण करण्याची ग्वाही मनपा प्रशासनाद्वारे दिली गेली.


ऑक्सिजन कॉन्स्टे्रटरची लायब्ररी

मनपाद्वारे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची लायब्ररी सुरू करण्यात येणार असून, 150 सिलेंडर यात असणार आहेत. नागरिक वाचनालयातून जशी पुस्तके नेतात, तसे त्यांना ऑक्सिजन सिलेंडर घरी दिले जाणार आहे. ते त्यांनी वापरल्यावर परत द्यायचे आहे, तसेच सावेडी कचरा डेपोमध्ये 125 जंबो सिलेंडर क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून, ते येत्या दोन महिन्यात सुरू होईल, असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. मनपाने आयुर्वेद रुग्णालयात 24 बेड, जैन पितळे वसतीगृहात 74 बेड व पॉलिटेक्नीक महाविद्यालयात 60 बेडची रुग्णालये सुरू केली आहेत व घर घर लंगर सेवेच्या सहकार्याने 20 बेडचे लहान मुलांसाठी रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तसेच दिव्यांगांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरणाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आल्याने तसा प्रस्ताव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


मनपा करणार बुथमध्ये दुरुस्ती

येथील बुथ हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला लेडीज होस्टेल असून, तेथे 70 बेडची सुविधा करता येणार आहे. मात्र, या होस्टेल इमारतीची डागडुजी मनपाने करून देण्याची गरज हॉस्पिटलद्वारे मांडली गेली आहे. त्यास महापौर बाबासाहेब वाकळे व स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी मान्यता दिली असून, तसा प्रस्ताव बुथद्वारे मनपाला देण्याचे सांगितले आहे.


Name

] ब्रेकिंग,10,] ब्रेकिंग,879,Agralekh,3,baramati,2,breking,1,desh,2,IPL 2020,19,kolhapur,10,kolhapur Latest News Maharashtra,2,Latest News,6015,Latest News Maharashtra sangli,11,Latest News Maharashtra satara,62,Latest News Maharashtra satara ब्रेकिंग,2,Latest News Maharashtra sangli,8,Latest News Maharashtra sangli breaking,1,Latest News Maharashtra satara,24,letest News,607,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,449,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,95,satara,327,satara.,9,solapur,3,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,209,अहमदनगर,11676,औरंगाबाद,392,क्रीडा,681,दखल,805,देश,4753,नगर,4,नाशिक,848,पुणे,1037,बीड,1455,बुलडाणा,47,बुलढाणा,878,ब्रेकिंग,18597,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,14,ब्रेकिंग Latest News Maharashtra satara,3,ब्रेकिंग न्युज,144,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,183,महाराष्ट्र,16157,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4512,विदेश,670,संपादकी,2,संपादकीय,1762,सातारा,3230,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: लस उपलब्ध नसल्याने नगरसेवक अस्वस्थ ; नागरिकांकडून विचारणा
लस उपलब्ध नसल्याने नगरसेवक अस्वस्थ ; नागरिकांकडून विचारणा
https://gumlet.assettype.com/esakal/2021-05/a12d1e42-4a5a-4a48-af3e-85848a3145a0/covishild.jpg?q=100&dpr=1.0&w=400
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_82.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/06/blog-post_82.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content